कसाब ने कोर्टात साक्ष फिरवली"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Apr 2009 - 1:13 pm

एक शंका.....
आज पेपर वाचताना बातमी वाचली कि "कसाब ने कोर्टात साक्ष फिरवली"
मला असे विचारायचे आहे कि. कसाब हा साधरण गुन्हेगार नाहि तर तो अतिरेकि आहे व त्याच्या साक्षिला महत्व आहे.आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे तर त्याचा सरकार का उपयोग करत नाहि..पोलिस त्याच्या कबुलि जबाबाच व्हिडिओ चित्रिकरण का करु शकत नाहित व साक्ष म्हणुन ते चित्रिकरण का दाखवु शकत नाहित??..या बाबत कायदा काय सांगतो? कुणी कायदा जाणणारा या वर मत देवु शकेल का?..ह्या पध्धतिने केस बरेच वर्षे चालेल..जरी फाशि झाली तरी तो सुप्रीम कोर्टात जाईल..मग तिथेहि फाशि कायम राहिलि तर राष्ट्र पति कडे दयेच अर्ज..तिथे गुरुचा नंबर २२ वा आहे मग याचा कधि नंबर येणार????? या देहि कसाबला लटलेले पहाण्याचे भाग्य नाहि असे वाटते

तंत्रविचार

प्रतिक्रिया

मनिष's picture

18 Apr 2009 - 3:14 pm | मनिष

पोलिसात दिलेला कुठलाही जवाब ग्राह्य धरला जात नाही.

सुनील's picture

18 Apr 2009 - 4:22 pm | सुनील

कसाबने साक्ष वगैरे फिरवली नसून पोलीसांपुढे दिलेला कबुलीजबाब अमान्य केला आहे, जे आजवरचा प्रत्येक आरोपी करीत आलेला आहे! त्यात वेगळे काहीही नाही.

जर आरोपीने पहिल्याच दिवशी कोर्टात आरोप मान्य केले, तर पुढील कामकाजाची आवश्यकताच उरणार नाही!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तिमा's picture

18 Apr 2009 - 6:22 pm | तिमा

आवो, त्यो कसाब टकुरं चालवत न्हाई, त्याचा वकील लई डेंजर मानूस वाट्तोया, त्यो ज्ये सांगंल त्यापरमानेच त्ये ब्येनं करनार बगा! आयला, सरकार्नी असला वकील द्येऊन आपल्याच पायावर धोंडा पाडलाय बगा!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|