"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
16 Apr 2009 - 7:06 am

पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,

"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन)

आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते. तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर म्हणतो,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला 'घो' पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच ,जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

घो गेलो सकाळी की येतोलो रातचान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान

श्रीकृष्ण सामंत

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

16 Apr 2009 - 10:34 pm | लिखाळ

मस्त कल्पना .. छान कविता :)
-- लिखाळ.

यशोधरा's picture

16 Apr 2009 - 10:35 pm | यशोधरा

:)