अनंगरंग

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
14 Apr 2009 - 10:02 am

धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही - र्‍हुदयी या उधाणतो ।

स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।

उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।

झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।

विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
नाहूनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।

बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |

कविता

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

14 Apr 2009 - 4:51 pm | क्रान्ति

मोहक अनंगरंग. :)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

दवबिन्दु's picture

14 Apr 2009 - 4:55 pm | दवबिन्दु

रंगती कपोलही

कपोल म्हंजे गाल का? ते लाजुन लाल होतत म्हणुण तुमी अस लिहलय का?

उमेश कोठीकर's picture

14 Apr 2009 - 5:10 pm | उमेश कोठीकर

न्हाउनी प्रीतीत असे पाहिजे का? कविता छान.

संदीप चित्रे's picture

14 Apr 2009 - 8:17 pm | संदीप चित्रे

>> स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।

>> झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।

>> बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |

या ओळी छान जमल्या आहेत.

नाना बेरके's picture

14 Apr 2009 - 8:18 pm | नाना बेरके

आसं वर्नन करावं वाटतया ह्या कईतेचं.
फारच "अनंगरंगीली " कविता, मनास महिरुन गेली.

मनिषाताई . . . ग्रेट !

प्राजु's picture

14 Apr 2009 - 8:30 pm | प्राजु

झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।

सुरेख!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

14 Apr 2009 - 9:51 pm | बेसनलाडू

कविता आवडली. वृत्त/मात्रांकडे योग्य लक्ष दिल्यास गेयबाधा जाणवायची नाही, असे वाटते.
(आस्वादक)बेसनलाडू