पौर्णिमा..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
13 Apr 2009 - 7:35 am

हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का?

बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?

पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,
होऊन धार मजला, तू चिंब करशील का?

दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला
होऊन रातराणी श्वासात उरशील का?

भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया
ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का?

दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे
ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का?

हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे
घेऊन ते उराशी साकार करशील का?

- प्राजु

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

13 Apr 2009 - 7:48 am | विनायक प्रभू

भारी

अवलिया's picture

13 Apr 2009 - 7:49 am | अवलिया

वा ! सोमवार सकाळ साजरी झाली !
हा आठवडा छान जाणार हे नक्की !! :)

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

13 Apr 2009 - 7:52 am | निखिल देशपांडे

दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे
ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का?

वा प्राजुतै मस्तच कविता

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

दशानन's picture

13 Apr 2009 - 7:54 am | दशानन

सुंदर !

आता जरा व्यवस्थीत कळाले, एका शब्दामुळे अडखळलो होतो ;) कोण ती म्हणते आहे तोंडावर पडलो होतो =))

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 9:42 am | स्मिता श्रीपाद

बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?

मस्तच ग प्राजु ...

-स्मिता

आनंदयात्री's picture

13 Apr 2009 - 9:45 am | आनंदयात्री

पुरुषाच्या नजरेतुन लिहलेली कविता छानच. छान प्रयोग आहे हा.

उमेश कोठीकर's picture

13 Apr 2009 - 9:46 am | उमेश कोठीकर

वा, प्राजु. अवो एवढं मायेनं ईचारल्यावर नाय म्हनायला ती काय येडी का खुळी? अवो हातच काय तुमालाच धरल आख्खी .

अविनाशकुलकर्णी's picture

13 Apr 2009 - 9:57 am | अविनाशकुलकर्णी

करशील का?,होशील का?,धरशील का?,स्मरशील का?....बापरे..केव्हढे प्रश्ण?? प्रियकरगोंधळुनजाईल..प्रश्णांचि सरबत्ति ऎकुन......पण कविता छान आहे....

ठकू's picture

13 Apr 2009 - 2:24 pm | ठकू

भन्नाट आहे!

शाल्मली's picture

13 Apr 2009 - 4:39 pm | शाल्मली

कविता मस्तच आहे.

बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?

छानच!

--शाल्मली.

शितल's picture

13 Apr 2009 - 6:44 pm | शितल

प्राजु,
सुंदर काव्य रचना. :)

संदीप चित्रे's picture

13 Apr 2009 - 7:12 pm | संदीप चित्रे

>> बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?

या ओळी अगदी समर्पक आहेत.

क्रान्ति's picture

13 Apr 2009 - 7:45 pm | क्रान्ति

सुन्दर कल्पना, सुन्दर कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Apr 2009 - 8:13 pm | श्रीकृष्ण सामंत

सुंदर, अतिसुंदर काव्य.असे पुन्हा होणे नाही.
माझी आई डाळीची आमटी चवदार करायची.रोज मी तिला म्हणायचो,
"किती चवदार आमटी केलीस.अशी पुन्हा होणारच नाही."
पण पुन्हा केल्यावर तसंच वाटायचं
"अशी पुन्हा होणारच नाही."
तसंच तुझ्या कवितेचं आहे.असं मला वाटतं.
कवितेतला सजणा म्हणतो,
"दिवसा कैक वेळां वाचतो तुझीच गीते
अशीच अनेक गीते तू लिहशील का?"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2009 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवयत्रीची पुन्हा एक सुंदर कविता !

आणि सामंतसाहेबांचा तितकाच सुंदर प्रतिसाद.

-दिलीप बिरुटे

राघव's picture

14 Apr 2009 - 7:23 am | राघव

काय रोमॅण्टीक कविता/गझल आहे.. वाह! :X

बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?

पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,
होऊन धार मजला, तू चिंब करशील का?

हे खास आवडलेत!

राघव

वाव्वा! कल्पना छानच आहेत. कविता आवडली. रातराणी तर मस्तच आहे. पौर्णिमाही आवडली. मात्र वृत्तभंगाचे गालबोट लागून कविता गुणगुणताना अडखळलो :(
(आस्वादक)बेसनलाडू

चतुरंग's picture

14 Apr 2009 - 3:48 pm | चतुरंग

चतुरंग

घाटावरचे भट's picture

14 Apr 2009 - 12:17 pm | घाटावरचे भट

छान!

दवबिन्दु's picture

14 Apr 2009 - 5:11 pm | दवबिन्दु

हो मार डाला

प्राजु's picture

14 Apr 2009 - 6:07 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चंद्रशेखर महामुनी's picture

15 Apr 2009 - 11:31 am | चंद्रशेखर महामुनी

तुझ्या कविता नेहमिच सुंदर असतात... प्राजु... !!

स्वाती राजेश's picture

15 Apr 2009 - 5:48 pm | स्वाती राजेश

प्राजु मस्त कविता....

यावरून एक आठवण..
माझ्या मैत्रिणीला जेव्हा तीचा नवरा (लग्नाअगोदर) पाहायला आला होता. तेव्हा त्याने तिला एकामागोमाग एक असे एकूण ३०/३५ प्रश्न विचारले होते....
तिला वाटले कि, आपण नोकरीचा इंटरव्ह्यू देत आहोत.....
शेवटी विचारले तुला काही विचारायचे आहे का?..... :) तिने एकही प्रश्न विचारला नाही...... :)
आता विषय निघाला कि म्हणते...मला त्याच्या प्रश्नाची उत्तरे देऊनच कंटाळा आला होता.... :)