प्रवीण महाजनचा "माझा अल्बम'

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
12 Apr 2009 - 1:26 pm

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण महाजन याच्या पुस्तकातील अंश लोकसत्तात वाचायला मिळाले. वाचून धक्का बसला. ही वस्तुस्थिती असेल काय, अशी शंकाही आली. सत्य काय ते प्रमोद आणि प्रवीण महाजन यांनाच माहिती असेल. आता प्रमोद महाजन नाहीत; पण प्रवीण आहे. त्याने आपली कैफियत मांडली आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4391117.cms
http://beta.esakal.com/2009/04/12113323/Home-Pravin-Mahajans-biograp.html

समाजबातमी

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

12 Apr 2009 - 1:38 pm | अविनाशकुलकर्णी

जेंव्हा सर्व आरग्यु मेंटस संपतात त्या वेळि माणसाला खालि पहाण्यास लावण्यासाठी चारित्र हनन चा सहारा घेतला जातो..प्रमोद जिंच्या वैयक्तिक आयुश्यावर शींतोडे उडवुन त्यांचे कार्य कमी दर्ज्याचे होणार आहे का?..आज आपण एका अतिशय बुध्धिमान, चांगले संघटन कौशल्य असलेला, पंत प्रधान होण्याच्या लायकिचा एक मराठी माणुस गमवला हि केवढी हानी आहे.तसेच महाजन कुटुंबाने एक कुटुंब वत्सल पिता, पति,मुलगा, मोठा भाउ गमावला आहे....अफाट वत्कृत्व ,बुध्धिमत्तेचि चमक,प्रमोद जि मधे होति..आजच्या घडीला सुषमा,मोदि, अरुण जेटली यांच्या बरोबरीने प्रमोद जी हवे होते..दिवंगत व्यक्ति च्या चारित्रा बद्दल,कहितरी लिहिणे, व वाद विवादाचि राळ उडवुन देणे व समाजाने हि अश्या वाद विवादात चविने भाग घेणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे का???महाराष्ट, व भारताने एक रत्न गमावले यात शंका नाहि..प्रमोद जी अमर रहे...

घोडीवाले वैद्य's picture

12 Apr 2009 - 1:46 pm | घोडीवाले वैद्य

प्रमोद महाजन यांची राजकीय वाटचाल निश्‍चित थक्क करणारी आहे. परंतु जो माणूस एखाद्याचा खून करून थेट पोलिस ठाण्यात हजर होतो तो खोटे बोलू शकेल, असे वाटत नाही. राजकारणासाठी दलाली करणे, बदफैली-बाहेरख्याली वागणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय?

टायगर's picture

12 Apr 2009 - 4:11 pm | टायगर

लोकसभा निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी बाहेर येणे, हा निश्‍चितच योगायोग असू शकत नाही. पुस्तिकेतील अंश केवळ लोकसत्ता दैनिकातच कसे येतात? या दैनिकाचे संपादक कुमार केतकर यांना प्रमोद महाजन यांच्याविषयी नक्कीच काहीतरी राग असावा. म्हणूनच त्यांनी एका मेलेल्या व्यक्तीला बदनाम करणारा पानभर मजकूर छापण्यास परवानगी दिली असावी. याबद्दल केतकरांचा निषेध; पण राजकारणातील गटारीतील घाणीने माखलेले लोक असतात. त्यांच्याविषयी सहजगत्या मजकूर छापून येत नाही. त्यात महाजन, पवार यांच्यासारख्या असामी असतील, तर कुणी वाईट शब्द उच्चारायलाही धजावणार नाही. तरीही कुमार केतकर यांनी एका आरोपीची बाजू धैर्याने मांडली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद!

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2009 - 6:36 am | भडकमकर मास्तर

लेख वाचला.
लेखाचे टायमिंग ( निवडणुका वगैरे)हा योगायोग नाही, या आपल्या मताशी सहमत आहे.
अगदी टायमिंग साधून हा लेख टाकला आहे....
अगदी काहीही असले तरी हे खुनाचे समर्थन होऊ शकते का?

अवांतर : ..एकाच वेळी एकाच माणसाचा निषेध आणि पुढच्याच वाक्यात त्याचेच कौतुक केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा....आपण निवडणुकांना उभे राहावे , अशी अवांतर विनंती.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यन्ना _रास्कला's picture

13 Apr 2009 - 5:52 am | यन्ना _रास्कला

वैर संपवायाचे अशी आपली सन्सक्रुति सांगते. महभारतात पण पांडंव व कौरव लष्करी इतमामाने मेलेल्या शत्रुंना चितेवर जाळत होते. प्रवीणला हे कोनी शिकवलेले दिसत नाय.

सन्दिप नारायन's picture

13 Apr 2009 - 9:51 am | सन्दिप नारायन

ही तर नाण्याची दुसरी बाजु.

संदीप

अविनाशकुलकर्णी's picture

13 Apr 2009 - 10:14 am | अविनाशकुलकर्णी

प्रविण महाजना नि प्रमोद महाजनावर केलेल्या आरोपानि मनांत अनेक प्रश्ण आले..
सार्व जनिक जिवनात कर्तुत्व त्वाला जादा महत्व द्यावे कि स्वछ्छ चारित्र्याला?
आजच्या बदलत्या मुक्त समाजजिवनात चारित्राच्या बाउ करुन एखाद्या तडफ दार व्यक्तिची कार क्षमता, हुशारी बघावि कि..चारित्र्य?

विशाल कुलकर्णी's picture

13 Apr 2009 - 10:36 am | विशाल कुलकर्णी

अविनाशजी, इथे सत्य काय आणि असत्य काय हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे मला तरी योग्य वाटत नाही.
<<सार्व जनिक जिवनात कर्तुत्वाला जादा महत्व द्यावे कि स्वच्छ चारित्र्याला?
आजच्या बदलत्या मुक्त समाजजिवनात चारित्राच्या बाउ करुन एखाद्या तडफ दार व्यक्तिची कार क्षमता, हुशारी बघावि कि..चारित्र्य?>>

हे तुमच्या माझ्यासाठी (एकंदरीत त्रयस्थ व्यक्तीसाठी) ठिक आहे. पण त्याचे परिणाम जर त्या व्यक्तीच्या जवळच्या माणसांवर होत असतील, झाले असतील तर त्या व्यक्तीसाठी हा मुद्दा लागु नाही होत.

व्यक्तिशः मी प्रमोदजींचा प्रचंड पंखा आहे, पण तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते कसे होते ही गोष्ट त्यांच्या जवळच्या लोकांखेरीज कोणीच सांगु शकत नाही. पण तरीही मला वाटतं की माणसाच्या मृत्यूबरोबर वाद संपायला हवेत. प्रमोदजींची आत्तापर्यंतची स्वच्छ कारकिर्द याप्रकारे डागाळण्यात जर फक्त राजकारण असेल तर ते निश्चितच घृणास्पद आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

चिरोटा's picture

13 Apr 2009 - 11:17 am | चिरोटा

सार्व जनिक जिवनात कर्तुत्व त्वाला जादा महत्व द्यावे कि स्वछ्छ चारित्र्याला?

स्वछ्छ आणि पारदर्शी चारित्र्याला प्रथम आणि कर्तुत्व त्वाला नन्तर्.मोहन्दास गान्धी याना जग महात्मा का म्हणत असे हे आता लक्षात आले असेल.
क्ष्^न + य्^न = झ्^न

मराठी_माणूस's picture

13 Apr 2009 - 11:19 am | मराठी_माणूस

एकदम बरोबर.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Apr 2009 - 12:59 pm | अविनाशकुलकर्णी

माझे यावर असे मत आहे..आज समाज जिवन स्त्रैण झाले आहे..पुर्विच्या स्त्री पुरुष स्म्बंधांच्या कल्पना व ९० नंतर मुक्त अर्थ व्यवस्था व इन्टरनेट चा प्रभाव वाढल्या नंतर च्या कल्पना यात जमिन अस्मानाचा फरक पडला आहे..त्या मुळे पुर्विच्या निति कल्प नेच्या फूटपट्या लावुन त्याचे मुल्य मापन करने योग्य होइल का???..आज प्रत्येक नेता हा आर्थिक व्यवहारात भ्रष्ट आहे..सार्वजनिक द्रव्याचा व संपत्तिचा तो अपहार करतो हे सा~या समाजाला माहित आहे व ते समाजाने मुकपणे स्विकारले पण आहे...नेत्याने जर एखाद्या स्त्री बरोबर संबंध ठेवले असतिल तर ते नक्किच त्या स्त्री च्या संमतिनेच ठेवले असतिल..त्या मुळे त्याचा परिणाम समाजावर न होता तो त्याच्या व्यक्तिगत व कौटूंबिक जिवनावर होत असतो..आपण जे महाजनांच्या बद्दल विचारले आहे त्या वर मला तो त्यांचा व्यक्तिगत व कौटुंबिक प्रश्ण वाटतो...[ते तसे होते कि नाहि हे मला महित नाहि व त्याला माझ्या द्रूश्टीने फारसे महत्वाचे हि नाहि] महाजन अतिशय बुध्धिमान, कुशल संघटक, फर्डे वक्ते होते व पंत प्रधान होण्यासाठी हा एकमेव मराठी योग्य नेता होता..पण ते आज आपल्यात नाहित..महाराष्ट्राचि,व भारताची हि फार मोठी हानि आहे..याचेच मोठे दु:ख्ख आहे....

चिरोटा's picture

13 Apr 2009 - 1:10 pm | चिरोटा

त्या मुळे पुर्विच्या निति कल्प नेच्या फूटपट्या लावुन त्याचे मुल्य मापन करने योग्य होइल का

सगळ्या नाहीत पण fundamental फूटपट्या लावल्याच पाहिजेत. ज्या अमेरिकेत आज आपण मुक्त जीवन बघतो तिकडे लग्नाची ५० वर्षे साजरी करणारी जोडपी पण बघतो.माझ्यामते राजकिय जीवनात असणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यात खासगी आणि सार्वजनिक बाबीत फरक फार असू नये. दारुबन्दी खात्याचा मन्त्री जर रात्री दारू ढोसत असेल किन्वा आरोग्य खात्याचा मन्त्री घरी गुटखा/मावा खात असेल तर काय अर्थ ऊरला? परत त्यात साधनशुचितेचा आव आणला तर लोकटीका होणारच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

वाहीदा's picture

13 Apr 2009 - 1:50 pm | वाहीदा

मला तर त्या माऊलीचेच वाईट वाटते ... उतार वयात तिला अजून किती मनस्ताप होणार ??आणी त्या माऊलीने अजून किती मानसीक द्रुष्टया सहन करावे ???... एका मुलाचा खुन अन तो ही आपल्याच एका दुसरया मुलाने करावा अन त्यानंतर येणारी ही अवहेलना ... sad simply sad !!
खुदा सब देखता है और मां का दिल सब जानता है !
तिने आपले दु:ख कसे हाताळले असेल याची कल्पना ही नाही करवत
देव तर तिचीच परिक्शा पहातो आहे :-(
~ वाहीदा

केवळ_विशेष's picture

14 Apr 2009 - 1:22 pm | केवळ_विशेष

मी लोकसत्ता मध्ये रविवारीच हा लेख वाचला होता.

प्रमोद महाजनांचं खाजगी आयुष्य कसंही होतं तरी त्यांच्या खूनानंतर प्रवीणचा लेख किंवा माझा अल्बम हे पुस्तक आणि प्रमोद महाजनांसदर्भातलं लिखाण म्हणजे मढ्याच्या टाळू वरचं लोणी खाण्यासारखं आहे...आणि सिंपथी गोळा करण्याचा आहे.

लेखात प्रवीण असं म्हणतोय की आम्ही सगळे 'वेठबिगार' होतो...
अरे चुतमारीच्या, तुला कळत होतं ना , तर मग तुला कष्ट करायला कोणी नको म्हणालं होतं का?

प्रमोद महाजनांनी त्याला अनेक उद्योग सुरू करून दिले होते पैकी टायर्स ची एजन्सी हा एक होता. पण ह्याचं कर्म असं की एवढं सगळं करूनही हा करंटाच. हा फोटोतही जरा सायकीक वगैरे वाटतो.

प्रमोद महाजनांबद्दल आदर वगैरे खूप पुढची गोष्ट झाली, पण तुमच्यात जे काही मतभेद असतील ते तुम्हीच सोडवायला हवे होतेत. खून केल्यानंतर उपरती होऊन फायदा काय?
झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवता आली नसती का?

आणि आता याचा गैरफायदा येत्या विधानसभा निवडणूकीत सगळे पक्ष उचलतील. आणि त्रास पुन्हा प्रमोद महाजनांच्या कुटुंबियांना.

त्या लेखात हा असंही म्हणतो की प्रमोद महाजनांच्या पत्नी पण या सर्व गोष्टींमुळे त्रासल्या होत्या. पण ही काय जाहीरपणे सांगण्याची गोष्ट आहे का? आणि आता सांगून काही फायदा आहे का?

हा बाबूजी आता काही १५-२० वर्ष बाहेर येत नाही. मग ही ओकारी काढायची गरज काय होती?

प्रमोद महाजनांनी जे काही कमावलं होतं ते स्वकष्टानी... याची जर अशी वेडझव्यासारखी वागणूक असेल तर कोण स्वकमाई अशी उधळेल?

त्यातून उच्च म्हणजे, प्रमोद महाजनांचे एक बंधू जे म न से त आहेत त्यांचं म्हणणं असं की त्या काळी आमच्या घरी काचेचे ग्लासच नव्हते (ज्यामुळे प्रमोद महाजनांच्या वडिलांचा मृत्यू झाला, धसका घेऊन) {काल परवाच्याच वर्तमान पत्रातून आलंय क्लॅरिफिकेशन }. अरे काय चाललंय काय? एक थुंकतो म्हणून दुसरा चढाओढीत आणखी थुंकतो! अरे तू गप्प बस ना. लोकांना काय फरक पडणार आहे या सगळ्यामुळे? आणि तुम्हाला तुमची प्रतीमा कोणासाठी आणि कोणापुढे स्वच्छ मांडायची आहे?

असो. बघत राहूया हा तमाशा!

अवांतरः- मला व्यक्तीश: केतकर हा माणूस अंमळ वेडझवा वाटतो.

चिरोटा's picture

14 Apr 2009 - 2:01 pm | चिरोटा

पास्चिमात्य देशात असलेली कॉनफेशनल कल्चरची पध्धत आपल्याकडे नाही.त्यात राजकारणी म्हणजे खाजगी गोष्टी लपवण्यात उस्ताद्.क्लिन्टन्-मोनिका प्रकरण चवीने चघळणारी आपली बरीचशी व्रुत्तपत्रे भारतिय राजकारण्याच्या लफड्यान्बाबत मात्र गप्प असतात.
बाई,बाटली आणि सत्ता हे भारतिय राजकारण्यान्चे week points मानले जातात्.केवळ प्रमोद महाजनच नाही तर अनेक सर्व पक्षीय राजकारणी लोकान्ची खाजगी लफडी बाहेर पडली तर लोकाना भोवळ यायची बाकी राहील.

आणि आता सांगून काही फायदा आहे का?

प्रविणने खून का केला हे अजुनही रहस्य आहे.त्याने दिलेली कारणे-प्रमोद्कडे कोट्यावधी रुपये होते.आणि तो मला पैसे देत नव्हता्. हे कारण पटण्यासारखे नाही. 'माझा अल्बम' मधून त्याला कदाचित काही वेगळे सान्गायचे असेल.

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मराठी_माणूस's picture

14 Apr 2009 - 2:20 pm | मराठी_माणूस

बाई,बाटली आणि सत्ता ......week points... ?
म्हणजे दर विकांताला लागणारे का (ह्.घ्या)