(बुरुंडीतला जालिंदर) - विडंबन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
10 Apr 2009 - 4:10 pm

(आधार : दिव्यातला राक्षस )

आणखी एक जाळिंदरली

मिसळपावावरती वावरतांना,
जुना प्रसिद्ध दुवा मिळाला
काळजीपुर्वक बघता दुव्यामधुनी
जालिंदरजी हो निघाला
लिही लिही लिही....
पिवळे हास्य करुन म्हणाला
बोल मेरे बगलबच्चे,
कोण बनवू तुला
फुटकळ लेखक कधीच झालो
शोधतो संस्थळात नव्या कंपुला
कंपु शोधणे झाले मुश्किल
'जाज' जी, आता तुमचा हवाला
बेरकी हसले, हळुच म्हणाले
ले(ख)को, जुना जमाना गेला
असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक कंपुला
गुरु तुझा हा असा
असता का अफ़्रिकातील बुरुंडीत राहीला
मुंबै, पुणे नाहीतर
गेलाबाजार एखादा ठाण्याला
ए वन सर्व्हर (मराठी साईट होष्ट करायला) नसता का पाहिला.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (राजेंनी बहाल केलेले नाव)

अवांतरः " लिहिते व्हा.." पुस्तक भेटले तर सांगा.

विडंबन

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

10 Apr 2009 - 4:21 pm | भडकमकर मास्तर

विडंबणाची कन्सेप्ट बेष्ट आहे...
आवल्डी..

अवांतर : जालिंदरजींची स्वतःची वेबसाईट बनवण्याची इच्छा अपूर्णच राहिली , ही एक आठवण या निमित्ताने नमूद करू इच्छितो....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया's picture

10 Apr 2009 - 4:22 pm | अवलिया

असेच म्हणतो

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

10 Apr 2009 - 4:24 pm | निखिल देशपांडे

जालिंदर बाबा जोरातच आहेत मि पा वर विडंबन आवडले...
अवांतरः " लिहिते व्हा.." पुस्तक भेटले तर सांगा.
आम्हाला चालते व्हा सुध्धा चालेल...

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

दशानन's picture

10 Apr 2009 - 4:25 pm | दशानन

हा हा हा !

मस्तच !

>>>दगडफोड्या (बहाल केलेले नाव)

हे नाव आम्ही दिलं आहे हे विसरु नका साहेब ;)

>> जालिंदरजींची स्वतःची वेबसाईट बनवण्याची इच्छा अपूर्णच राहिली

ही इच्छा मी पुर्ण करु का ?
सगळ्या लेखकांनी परवानगी द्यावी त्यांचे लेखन (जालिंदर बदलचे) तिकडे टाकण्याची :D

अवलिया's picture

10 Apr 2009 - 4:26 pm | अवलिया

सगळ्या लेखकांनी परवानगी द्यावी त्यांचे लेखन (जालिंदर बदलचे) तिकडे टाकण्याची

दिली.... :)

--अवलिया

सूहास's picture

10 Apr 2009 - 4:40 pm | सूहास (not verified)

सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

विशाल कुलकर्णी's picture

10 Apr 2009 - 5:24 pm | विशाल कुलकर्णी

=)) =)) :)) :D
धन्य आहात प्रभु !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

रेवती's picture

10 Apr 2009 - 8:36 pm | रेवती

जालिंदरजींचे पट्टशिष्य होण्याचा मानस दिसतो आपला!
आपले जालिंदरजींबद्दलचे प्रेम आता सिद्ध झाले आहे.
गुरुजींबद्दल असलेल्या आपल्या प्रेमाला व गुरुजींना हवाई छत्रीतून सलाम.

रेवती

वाह वाह क्या बात है !
शोधतो संस्थळात नव्या कंपुला
कंपु शोधणे झाले मुश्किल
=)) =))
मस्त च जमले आहे !
आपल्याल पण तुमचे जुनेच नाव छान वाटते ... पाषाणभेदा !

पहाटवारा's picture

13 Apr 2009 - 10:12 am | पहाटवारा

तुमच्या लिखाणावर गुरुंच्या संस्थापीतांच्या विरोधातील चळ्वळिचा अंश जाणवतो !
धन्य तो गुरु अन धन्य तो शिष्य !