(म्हणू नका रे....)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
7 Apr 2009 - 2:39 am

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर रचना म्हणू नका रे....

भेटून ये तिच्या त्या भावा म्हणू नका रे
ही पैज जीव घेणी लावा म्हणू नका रे

गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे

ही कापते कशाने आहे अशी इमारत?
अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे

ती फुंकणीच होती, फेकून मारलेली,
(हातात बायकोच्या, पावा म्हणू नका रे)

दोन्ही करात आहे सामर्थ्य बायकोच्या,
धारिष्ट्य आज कुठले, दावा म्हणू नका रे

हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे
फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे

--केशवसुमार
( ०६ एप्रिल २००९,
चैत्र शुद्ध १२, शके १९३१)

विडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

7 Apr 2009 - 7:23 am | प्राजु

तुमची विडंबने वाचून खरंच निखळ करमणूक होते.
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे

ही कापते कशाने आहे अशी इमारत?
अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे

=)) =))

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सँडी's picture

7 Apr 2009 - 7:37 am | सँडी

गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे

मस्तच! :)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

क्रान्ति's picture

7 Apr 2009 - 7:58 am | क्रान्ति

=)) =)) मस्त!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

राघव's picture

7 Apr 2009 - 9:53 am | राघव

गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे

ही कापते कशाने आहे अशी इमारत?
अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे

ती फुंकणीच होती, फेकून मारलेली,
(हातात बायकोच्या, पावा म्हणू नका रे)

दोन्ही करात आहे सामर्थ्य बायकोच्या,
धारिष्ट्य आज कुठले, दावा म्हणू नका रे

हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे
फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे

अरे काय श्वास घ्यायलाही फुरसत देत नाहीत ब्वॉ.. हसुन हसुन धाप लागायची वेळ आलीये इथे. =))
तुमच्या मुळे अशा छान छान रचना वचायला मिळतात. धन्यवाद!

राघव

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2009 - 10:07 am | भडकमकर मास्तर

हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे
फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे

वावा..

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चंद्रशेखर महामुनी's picture

7 Apr 2009 - 2:11 pm | चंद्रशेखर महामुनी

हास्याचे धबधबे.............

परिकथेतील राजकुमार's picture

7 Apr 2009 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार

___/\___ अ प्र ती म !

फाजील परा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जागु's picture

7 Apr 2009 - 2:55 pm | जागु

=D> मस्तच.

चतुरंग's picture

7 Apr 2009 - 4:31 pm | चतुरंग

चावा आणि पावा खास आवडले! ;)

चतुरंग

अनिल हटेला's picture

7 Apr 2009 - 4:34 pm | अनिल हटेला

आवडले विडंबन !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पाषाणभेद's picture

7 Apr 2009 - 4:38 pm | पाषाणभेद

केशवकुमारांची आठवण झाली.
- पाषाणभेद

स्वाती दिनेश's picture

7 Apr 2009 - 4:40 pm | स्वाती दिनेश

लय भारी विडंबन,:)
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Apr 2009 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे
फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे

हाहाहा ... सहीच!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

कवटी's picture

7 Apr 2009 - 4:55 pm | कवटी

हुच्च!

कवटी

सुधीर कांदळकर's picture

7 Apr 2009 - 6:19 pm | सुधीर कांदळकर

दावा, मस्तच. खास वैशिष्ट्य म्हणजे शेवटीं घातलेली तारीख. इंग्रजी तसेंच मराठी.

झकासच.

सुधीर कांदळकर.

सूहास's picture

7 Apr 2009 - 6:58 pm | सूहास (not verified)

सुहास

आंबोळी's picture

7 Apr 2009 - 10:41 pm | आंबोळी

गुरुवर्य,
सा. न. (साष्टांग नमस्कार)
लै बेष्ट झालय विडंबन.

आंबोळी

मदनबाण's picture

8 Apr 2009 - 7:23 am | मदनबाण

गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे
व्वा. व्वाहव्वा...सही...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

दशानन's picture

8 Apr 2009 - 7:47 am | दशानन

बोल वाह वाह ! का वाजवू एक..... बोल लै भारी.... =))

केशवसुमार's picture

8 Apr 2009 - 5:01 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

संदीप चित्रे's picture

8 Apr 2009 - 6:48 pm | संदीप चित्रे

अर्थात खरंतर हे वे सां न :)