समीक्षा: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
6 Apr 2009 - 6:10 pm

या चित्रपटाच्या जशा जाहिराती बघून उत्कंठा व अपेक्षा वाढत होती, त्याच प्रमाणे चित्रपट अपेक्षा पूर्ण सुद्धा करतो असे माझे मत आहे.
सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्‍या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!
महेश मांजरेकरने अतिशय छान कथा लिहिली आहे. तसेच त्याचा अभिनय आणि संवादफेकही अतिशय छान, प्रभावी आणि प्रेरक! शिवाजी महाराजांचे आडनांव भोसले , म्हणून तेच आडनांव मुद्दाम या सिनेमात वापरले आहे. उणीवा आणि फरक कळून येण्यासाठी.
सचिन खेडेकरने साकारलेला भोसले हा खरोखरच दाद देण्याजोगा आहे. त्याच्या अभिनयाबद्दल तर कसलेच दुमत नाही. या चित्रपटाचे जरी "लगे रहो मुन्नाभाई" आणि "रंग दे बसंती" शी साम्य वाटत असले तरी हा चित्रपट वेगळा आहे.
कथा थोडक्यात सांगायची झाली तर :
भोसले आडनावाचा हा माणूस (जो कोणत्याही मराठी मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असू शकतो) जवळ जवळ आत्मविश्वास गमावून बसला आहे. ९ ते ५ बँकेतली नोकरी करतो. कुणी काही अपमानास्पद बोललं तरी तो गप बसतो. उलटून उत्तर देत नाही. घोसालीया नावाचा बिल्डर त्याच्या मुंबईत असलेल्या वडीलोपार्जीत घरावर डोळा ठेवून असतो. तो साम, दाम, दंड आणि भेद या सगळ्या प्रकारांचा अवलंब करून ते घर बळकावण्याचा प्रयत्न करतो. भोसले दाद देत नाही, तेव्हा जीवावरही उठतो.....
भोसलेच्या मुलाला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे आहे पण ऍडमिशनसाठी पैसे नसतात. भोसले मुलासोबत त्याच्या कॉलेजमित्राला भेटतो (जो आता एक मोठा राजकारणी आणि शिक्षण सम्राट झालेला असतो) पण तो म्हणतो," अरे, समजा मी तुझ्या मुलाला फुकटात ऍडमिशन देईलही, पण नंतरचा खर्च तूला परवडणार आहे का? त्यापेक्षा बी.एस्.सी कर!"
त्याच्या मुलीलाही बॉलीवूड मध्ये अभिनेत्री बनायचे अस्ते, पण भोसले आडनावा मुळे फक्त तीला प्रवेश देण्याचे डायरेक्टर गीडवानी (उर्फ गायकवाड - कसे काय? ते चित्रपटातच बघा!) नाकारतो. बँक मॅनेजरही त्याला मराठी माणसाने अंथरून पाहून हात्-पाय पसरावे असा एकदा सल्ला देतो.
अशा प्रकाराने कंटाळलेला व उबग आलेला भोसले एकदा दारु पिऊन बार मालकाशी हमरी तुमरीवर येतो. ( तो बरेच पदार्थ मागवत असतो तेव्हा वेटर त्याला म्हणतो की आधी मेनू कार्ड बघा, अर्थात मराठी माणूस महाग पदार्थ खावू शकत नाही हा वेटरचा समज)
त्यामुळे त्याची पिटाई होवून तो बाहेर फेकला जातो. मग त्या रात्री स्वप्नात तो सगळ्या ऐतिहासिक महापुरुषांच्या पुतळ्यांजवऴ आपली व्यथा व्यक्त करतो आणि मोठ्ठ्याने ओरडतो ," मला मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते..."
आणि हा आवाज जातो प्रतापगडावरच्या शिवाजी महाराजांच्या कानांवर.. त्यांना हे सहन होत नाही... ते भोसलेला उचलून नेतात. भोसले परप्रांतियांविरोधातले रडगाणे गातो, पण शिवाजी महाराज त्याला म्हणतात की ते लोक जे करतात ते करायला तूला कुणी मना केलं होतं? तू ही काढ होटेल... वगैरे वगैरे.
येथून सुरू होतो... न्यूनगंडीत भोसलेचा पावरफुल भोसलेपर्यंतचा प्रवास. तो पडद्यावरच बघण्यात मजा आहे.
मग तो त्याच्या मुलाच्या एडमिशनचा प्रश्न, मुलीच्या बॉलीवूड प्रवेशाचा , तसेच घराचा प्रश्न कसा सोडवतो ते बघण्यात मजा आहे.
"वेडात दौडले वीर मराठे सात! फक्त सातच? बाकीचे कुठे गेले?" हा डायलॉग सुपर हीट.
शिवाजी महाराज दर वे़ळेस पडद्यावर दिसताच थिएटरमध्ये टाळ्यांचा गडगडाट आणि शिट्ट्या....
मकरंद अनासपुरेंच्या एकेक वाक्याला पुन्हा टाळ्या आणि शिट्ट्या....
सचिन खेडेकरच्या डायलॉग्स लाही टाळ्या आणि शिट्ट्या...
सगळीकडे हाऊस फुल...
सुखविंदर सिंगचे "हे राजे" हे गीत खुपच छान. भरत जाधव वर चित्रीत केलेला पोवाडा ही छान....
हा चित्रपट मराठी माणसांच्या उणिवा दाखवून देतो. त्या पटतातही. त्याचबरोबर तो योग्य उमेदवाराला मत देण्याचे महत्त्व पटवून देतो. भ्रष्टाचारावरही प्रहार करतो. बर्‍याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा विचार करायला लावतो. चित्रपट पाहील्यावरही एकेक प्रसंग आठवून आपण नव्याने नवा विचार करतो. हे या चित्रपटाचे यश.

एकच गोष्ट या चित्रपटात मात्र खटकते : भोसले ने निवडणूक लढवण्याचे ठरवल्यावर जसे इतर लोकांचा त्याचेवरचा विश्वास उडतो, तसाच शिवाजी महाराजांचा ही का उडतो? उलट, शिवाजी महराजांनी त्याला राज्य करण्यास उद्युक्त करायला हवे होते.

एकून चित्रपट खुपच छान. याबद्दल लिहावे तेवढे थोडेच. अगदी मेहेनत घेवून या चित्रपटाची पटकथा महेशने लिहिलेली दिसते. त्याचे शतशः अभिनंदन.
सगळ्यांनी चित्रपट जरूर बघावा... असे मला वाटते.
आपल्या या चित्रपटावरच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

मनिष's picture

6 Apr 2009 - 6:45 pm | मनिष

बघायचा आहे खरा....लवकरच बघेन!

सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्‍या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!

असे असेल तर फारच उत्तम! प्रमोज वरून तापलेल्या तव्यावर पोळी भाजायचा प्रयत्न वाटत होता, पण आता नक्कीच बघेन. महेश मांजरेकर शिवाजींच्या भुमिकेत बघायला जरा त्रास होईल खरा...चंद्रकांत/सुर्यकांत नंतर आत्ता फक्त अमोल कोल्हे आवडला शिवाजी म्हणून, बाकीच्यांची ही भूमिका करायची खरच योग्यता आहे का, असा प्रश्न उगाचच पडतो.

रेवती's picture

6 Apr 2009 - 6:57 pm | रेवती

चांगलं लिहिलं आहे समिक्षण.
वेळ मिळाल्यावर आधी चित्रपट बघणार.
धन्यवाद!

रेवती

मदनबाण's picture

6 Apr 2009 - 7:28 pm | मदनबाण

हम्म...पाहिला पाहिजे.

(मराठी माणसा जागा हो हे असं अजुन किती वेळा सांगायच?)
(मराठी)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

पक्या's picture

6 Apr 2009 - 9:59 pm | पक्या

समिक्षण आवडलं . धन्यवाद.
बघायला आवडेल सिनेमा. जालावर आहे का कुठे?

रेवती's picture

6 Apr 2009 - 10:37 pm | रेवती

मीही जालावरच शोधतीये, अजून सापडला नाही.
अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार असं दिसतय.
तू नळीवर फक्त ट्रेलर आहे.

रेवती

देवदत्त's picture

6 Apr 2009 - 11:09 pm | देवदत्त

इथे दिल्याप्रमाणे
"मराठीत प्रथमच 'यूएफओ तंत्रज्ञाना'च्या सहाय्याने हा चित्रपट एकाचवेळी तब्बल २०० चित्रपटगृहात झळकावून एक नवा विक्रम करण्यास सज्ज झाला आहे."
त्यामुळे जालावर लवकर मिळणे कठिण वाटते.

तुम्हाला हा सिनेमा पहायला उशीर होईल ह्याचे वाईट वाटते.
पण मराठी सिनेमाच्या (खरे तर सर्वच) प्रेक्षकाला चित्रपटगृहात आणण्याकरीता हे गरजेचे आहे आणि मला ते आवडले.

बाकी, सिनेमा चांगला आहेच. माझे त्याबाबतचे पूर्ण मत लवकरच लिहिन.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

7 Apr 2009 - 12:47 pm | घाशीराम कोतवाल १.२

निदान मराठी चित्रपट तरी थेटरात जाउन बगाया पायजे
कशाला हवा जालावर पायोरेटेड कॉपी जरा तरी खर्च करा ना
बाकि चित्रपट लय झकास आहे

*************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्राजु's picture

6 Apr 2009 - 10:35 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यन्ना _रास्कला's picture

7 Apr 2009 - 5:36 am | यन्ना _रास्कला

आणि आपल्या बरोबर एका अमराठी माणसाला पण पहायला नक्की घेऊन जा. कारण बऱयाच अमराठी लोकांना अजून शिवाजी कळलाच नाहीये.

तसे पाहिले तर बऱयाच मराठी लोकांना सुध्धा तो कळला नाहीये. ;)

सँडी's picture

7 Apr 2009 - 6:31 am | सँडी

समिक्षण एकदम मस्त केलयं आपण.
चित्रपट पाहिल लवकरच...

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

जयवी's picture

7 Apr 2009 - 11:27 am | जयवी

बघायलाच हवा आता तर.

अमोल केळकर's picture

7 Apr 2009 - 11:56 am | अमोल केळकर

आपल्या या सुंदर परिक्षणाने हा चित्रपट पहाण्याची उत्सुक्ता वाढली आहे.
धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

परिकथेतील राजकुमार's picture

7 Apr 2009 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार

छान समिक्षण. लवकरच बघणार आहे हा चित्रपट.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मि माझी's picture

7 Apr 2009 - 1:13 pm | मि माझी

>>>छान समिक्षण. लवकरच बघणार आहे हा चित्रपट.
असेच म्हणते..

मी माझी..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!

उमेश कोठीकर's picture

7 Apr 2009 - 1:15 pm | उमेश कोठीकर

बघितला. स्फूर्तीदायक आहे मराठी मनांसाठी.अर्थात थोडी अतिशयोक्ती आहे.सिनेमासाठी मुलीने वडीलांना आडनाव बदलण्याचा आग्रह करणे,एका भाषणात सरकारी अधिकार्‍याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा कायापालट होणे,मराठी पाऊल पडतेच कुठे? वगैरे.पण बाकी विषय छान. "हे राजे" गीत पण छान्.सचिन खेडेकर तर लाजवाब.बारीकसारीक लकबींसह मध्यमवर्गीय भिडस्त मराठी माणूस ते जागा झालेला बाणेदार मराठी गडी त्याने सुरेख उभा केलाय. पोवाडा तर वीररसाने ओथंबलेला.महेश मांजरेकरांचा शिवाजी खराखुरा वाटत नसला तरी टाळ्या घेऊन जातो.संवाद ही चित्रपटाची सगळ्यात प्रभावी बाजू आहे. रोमांच उभे राहतात. सिद्धार्थ जाधवचा गुंड उस्मान पारकर मात्र एकदम फुसका.पडद्यावर दिसल्याबरोबर लोक दचकण्याऐवजी हसू लागतात्.चाकोरीत अडकल्याचा परिणाम. मराठी टक्का उजळून आणि उधळून निघावा असा चित्रपट!

फ्रॅक्चर बंड्या's picture

7 Apr 2009 - 2:43 pm | फ्रॅक्चर बंड्या

सिनेमामधल्या पोवाड्यासाठी १ कोटी रुपये खर्च केला आहे....असे मी लोकसत्ता मधे वाचले...

जागु's picture

7 Apr 2009 - 3:03 pm | जागु

बघायला हवा लवकर.

मदनबाण's picture

7 Apr 2009 - 4:15 pm | मदनबाण

कालच आमच्या मातोश्री त्यांच्या १५ मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहुन आल्या होत्या...आज मी माझ्या मित्रा बरोबर हा चित्रपट पाहुन आलो...थिअटर हाऊस फुल होत.
चांगला मराठी चित्रपट...सुरुवात थोडी हळु आहे पण नंतर चित्रपट वेग धरतो.
प्रिया बापट कोळी नृत्यात चिकनी दिसते,सचिन खेडेकरांचा अभिनय अत्यंत सुंदर आहे.
रायबा (मकरंद शेट) ह्यांचे संवाद सॉलिइइइट आहेत.
दुसरे हिंदी चित्रपट मॉल मधे पाहण्यापेक्षा मराठी चित्रपट पाहिल्याचा जास्त आनंद वाटला.
मधे एकदा लाईट देखील गेले(महाराष्ट्रात चित्रपट पण सलग पाहता येत नाही नाहितर आपल शेजारच राज्य गुजरात पहा...)थॅक्स टु जनरेटर...पुढे चित्रपट व्यवस्थित पाहता आला.

मराठी माणसाने मराठी चित्रपट पाहिचे नाहित तर कोणी पाहिचे ?
तुम्ही देखील पहा. :)

(मराठी)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अनिल हटेला's picture

7 Apr 2009 - 4:51 pm | अनिल हटेला

जमेल तीतक्या लवकर पाहणार !! :-)

समीक्षण उत्तम झालये ,अपेक्षा वाढल्यात !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..