जे तनाला पाहिजे ते...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
4 Apr 2009 - 1:00 pm

आमची प्रेरणा अजब यांची रचना जे मनाला पाहिजे ते...

जे तनाला पाहिजे ते गिळत नाही
जे नको गिळण्यास पण ते टळत नाही...

एवढा सदर्‍यात ह्या मी तंग बसतो;
हाय मापाचा कुठेही मिळत नाही...

देह हा इतका भयंकर, वाढला पण
काय खातो 'अजब' मी ते कळत नाही...

रोज प्यालो, मद्य आणिक स्लिम टी ही
मेद माझे त्यांतही विरघळत नाही...

चालणेही खूप असते गावभर पण
वजन माझे हे कसे मग ढळत नाही...?

मान ही फिरते कुठे ह्या "केशवा"ची
वळत असतो हा तरी ही वळत नाही...

स्वप्न, आशा, ध्येय माझे वजन घटणे
मी उगाचच जीम मध्ये पळत नाही...

विडंबन

प्रतिक्रिया

चेतन's picture

4 Apr 2009 - 1:09 pm | चेतन

वजनदार विडंबन गुरुजी

चेतन

क्रान्ति's picture

4 Apr 2009 - 5:41 pm | क्रान्ति

भारी! जबरदस्त! १०० नंबरी विडम्बन!
>:D< क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2009 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालणेही खूप असते गावभर पण
वजन माझे हे कसे मग ढळत नाही...?

हा हा हा ! ओळी मनातल्या टंकल्या आहेत. :)

-दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 3:59 pm | सुधीर कांदळकर

धम्माल.

सुधीर कांदळकर.

सर्वसाक्षी's picture

5 Apr 2009 - 4:45 pm | सर्वसाक्षी

वा केशवशेठ,

भारी विडंबन. एकदम झकास.

स्वाती दिनेश's picture

5 Apr 2009 - 4:55 pm | स्वाती दिनेश

धमाल ,वजनी विडंबन! आवडले.
स्वाती

चतुरंग