नाहि बरे...

jenie's picture
jenie in जे न देखे रवी...
3 Apr 2009 - 11:56 am

अप्सारानी श्वापदाना भाळाणे नाही बरे..
माणसानी माणसाना टाळणे नाही बरे..

चुकवली जरी उत्तरे नशिबाने कधी..
वेदनानी वेदनाना जाळणे नाही बरे..

दाखावली 'करुणा' पारध्याने कधी..
हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे..

नाकारली जरी कवीता रसीकानी कधी..
अक्षरानी अक्षराना हेटाळणे नाही बरे..

ग्रिष्र्माच्या झेलुन ज्वाळा सावली झाले कधी..
श्रावणाच्या ऐनवेळीचे वागणे नाही बरे..

अज्ञाताच्या गर्दिला तु वाहतो श्रद्धांजली..
यादीत त्या नाव माझे गाळणे नाही बरे..

मेलो जरि असलो आम्ही कधी काळी ..
असे सहज आम्हाला तुम्ही विसरणे नाही बरे..

स्वर्गाच्या ऐवजी नरकत गेलो आम्ही कधी ..
नावाच्या अलीकडे 'स्व' लावणे नही बरे..

कविता

प्रतिक्रिया

चंद्रशेखर महामुनी's picture

3 Apr 2009 - 12:15 pm | चंद्रशेखर महामुनी

छान.. ! आहे... आवडली...

जागु's picture

3 Apr 2009 - 12:18 pm | जागु

वा खुप आवडली कविता.

प्रमोद देव's picture

3 Apr 2009 - 12:23 pm | प्रमोद देव

मात्र टंकलेखनाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका टाळता आल्या तर पाहा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2009 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मात्र टंकलेखनाच्या चुका टाळता आल्या तर पाहा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.
असेच म्हणतो.

वाहीदा's picture

3 Apr 2009 - 12:38 pm | वाहीदा

jenie , कवीता छान आहे .. टंकलेखनाची सवय लावावी मग हळू हळू तुम्हाला ही जमेलच
~ वाहीदा

jenie's picture

3 Apr 2009 - 2:34 pm | jenie

मी एक लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत केला होता, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते. आणि या पुढे टंकलेखनाचा सराव करेन.

अनिल हटेला's picture

3 Apr 2009 - 5:46 pm | अनिल हटेला

"दाखावली 'करुणा' पारध्याने कधी..
हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे.."
:-)

कविता आवडली !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु's picture

3 Apr 2009 - 8:55 pm | प्राजु

कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अविनाशकुलकर्णी's picture

4 Apr 2009 - 11:31 am | अविनाशकुलकर्णी

नाकारली जरी कवीता रसीकानी कधी..
अक्षरानी अक्षराना हेटाळणे नाही बरे..

कविता छान आहे...आवडली

क्रान्ति's picture

4 Apr 2009 - 5:36 pm | क्रान्ति

मलाही वरच्या दोन ओळी जास्त आवडल्या. कविता तर छानच आहे सगळी.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}