देवानी मुलींना असं का बनवलं?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
2 Apr 2009 - 10:30 pm

(विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन)
एका (म्हातार्‍या) कवी कडून
प्रेरणेतून प्रेरणा

देवाने मुलींना असं का बनवलं?
की बघताच ती मला आई सारखं वाटावं
सगळ्याच स्त्रीया मला आई सारख्या वाटतात
पण तिने कुणाही बाळाला मिठीत का घ्यावं?

कुणाचे डोळे,तर कुणाचे ओठ
प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण
प्रेमळ माझं मन,नाही आई म्हणत नाही
पहाताच तिला मन येतं भरून

कुणी हसून आपलंसं करतं
कुणी लाडावून हृदयाजवळ घेतं
प्रत्येकाची खूबी निराळीच असते
मग आपली आई कुठे आपलाजवळ उरते

कुणी अंगाई म्हणून झोपवतं
कुणी मांडीवर घेऊन शांत करतं
किती तर्‍हा झोपवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक चेहर्‍यात फसतं

सगळ्याच आया कमाल करतात
नको नको म्हणताना खाऊ देतात
कुणा कुणाचा खाऊ घ्यावा
एकसाथ सर्व आया अंतराला भावतात

श्रीकृष्ण सामंत.

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

3 Apr 2009 - 7:54 am | नरेश_

विडंबनापेक्षा, विडंबनाचे विडंबन आवडले.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

वेताळ's picture

3 Apr 2009 - 10:27 am | वेताळ

सुंदर कविता
वेताळ

योगी९००'s picture

3 Apr 2009 - 11:44 am | योगी९००

सामंत साहेब..मानलं तुम्हाला..

विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन असे वाटलेच नाही.

खादाडमाऊ