आणखी एक कविता पूर्ण करा

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जे न देखे रवी...
2 Apr 2009 - 11:22 am

आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता.
बघा ब्वॉ रिपेअर करता येते का ..

रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

2 Apr 2009 - 11:44 am | दशानन

रात्र झाली, दिप उजळले
आकाश झाले काळे |
सोनेरी परी हसे पहा; बोलली
पॅग भरा वेळी झाली |

sanjubaba's picture

2 Apr 2009 - 11:43 am | sanjubaba

रात्र झाली,दीप निवले
आकाश झाले काळे.....
लाजून चंद्र लपे हा
म्हणे,करा सुरू प्रेमचाळे.....

भुवरी ची ही चंद्रिका
चांदणीस सांगे गुज.....
वर्षावात या प्रेमसरीच्या
तुही अलवार भिज.......

संजूबाबा

मिसळभोक्ता's picture

2 Apr 2009 - 3:20 pm | मिसळभोक्ता

रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |

कवी अर्धवट वाटतोच आहे. पाऊणवट असता, तर असे लिहिले असते:

आकाशाने काजळ लावले
शायनिंगची संधी मिळाली
स्नो-पावडर फासून मग
चंद्रराव निघाले

दिसली पुढे एक चटक-मटक
धंद्याला चाललेली
लिप्ष्टिक करू का जरा मंद
चंद्रराव म्हणाले

भाड्या, त्याचे होतील पाचशे रुपये
चटक-मटक म्हणाली
स्वस्त प्रक्रणातून होणार्‍या रोगांनी
चंद्रराव गळाले

-- मिसळभोक्ता

नरेश_'s picture

2 Apr 2009 - 3:59 pm | नरेश_

आपल्या कवितेने आमचे ज्ञानभांडार समृद्ध केले.
तुमचे उपकार कसे फेडू ?

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

मूळः
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |

बिघडवलेले ;)
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे
गटारीचा चंद्र ... हसून बोले
काय राव किती पेग पिले...

घडवलेले
रात्र झाली, दीप निवले
आकाश अंधारमय झाले
अन् परत आकाश उजळले
जेव्हा माझ्या प्रियेचे हास्य उमलले
:D