गाडीच्या गाडीवाना...

डॉ. आनंदा वारके's picture
डॉ. आनंदा वारके in जे न देखे रवी...
1 Apr 2009 - 3:47 pm

गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S

तुज्या गाडीचा गा बैल
बैलापाठी नक्षाची झुल

तुज्या गाडीचं गा चाक
चाक धावतया एकटाक

गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S

तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ
चाळ वाजत्यात खुळखुळ

तुज्या कपाळाचा गा घाम
घाम देतोया दाम

गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

1 Apr 2009 - 3:55 pm | सुनील

कविता म्हणून ठीकठाक वाटली तरी विडंबनकर्त्यांसाठी हा एक उत्तम कच्चा माल असेल, असा आपला माझा अंदाज!

बघू यात!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रम्या's picture

1 Apr 2009 - 4:12 pm | रम्या

प्रथेप्रमाणे आता लवकरच या कवितेच विडंबन यायला हरकत नाही!

आम्ही येथे पडीक असतो!

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 6:53 pm | क्रान्ति

गदिमांच्या "बैल तुझे हरणावानी गाडीवान दादा" या गाण्याची आठवण झाली. सुरेख कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

1 Apr 2009 - 6:58 pm | प्राजु

अगदी याच गाण्याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/