आठवण.... !

चंद्रशेखर महामुनी's picture
चंद्रशेखर महामुनी in जे न देखे रवी...
31 Mar 2009 - 4:10 pm

आठवण.... !!

आठवणींनी तुझ्या साजणी..र्‍ह्दयाला ग पीळ पडे....
कशी ऐकीशी साद सखे परि... मी इकडे अन तु तिकडे...

हे गड्द जांभळे मेघ होउनी...वाटे यावे तव अंगणी...
रातराणीचा सुवास होउन.... मी गंधावे तव सदनी...
सागरास नदी मिळे कशी ग.. रिती-नीती चे बांध खडे
कशी ऐकीशी साद सखे परि... [१]

मेघ-वृक्ष अन पान-फ़ुले.. अवखळ निर्झर उंच कडे...
चंद्र-चांदण्या हे वारे.. मज भास दाविती तुझे गडे...
शोधि तुजला जीव खुळा बघ.. होउन पक्षी चोहिकडे
कशी ऐकीशी साद सखे परि... [२]

आज जरी तु दूर असे.. प्रिया न माझी मला दिसे...
ऐलतीरी मी उभा साजणी..मनी प्रितीचे गीत वसे...
ओठांवरचे भावतराणे.. सूर होउनी कानी पडे
अशी ऐकीशी साद सखे.. जरी मी इकडे.. अन तु तिकडे..
अशी ऐकीशी साद सखे जरी... [३]

- चंद्रशेखर...

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

1 Apr 2009 - 5:56 pm | प्राजु

पहिलं कडवं जास्ती आवडलं.

ऐकीशी.. की ऐकीसी?? :?

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/