बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण....

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
30 Mar 2009 - 10:57 pm

आमची प्रेरणा भुषण कटककर यांची कविता जो जो प्रवेशला तो गालीब होत गेला....

झाले रवंथ चालू वाचक बरा निघाला
अंदाज आमचा हा भलता खरा निघाला

पाडा रटाळ, गझला, बकवास शब्द चोथा
नाचा जणू रसाचा मोठा झरा निघाला

बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण
ठाण्यामधील वेडा जो आगरा निघाला

वाटे कवी मला हा आहे बराच मोठा
चिरता फणस निराशा, फुसका गरा निघाला

जुळवून ठेवतो हा यमके मुळात सारी
होता प्रसूत हा अमुचा घाबरा निघाला

ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे
ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला

आवाज हा दुदंभी मी घाबरून उठलो
जवळून पाहिले तर हा पादरा निघाला

विद्वान "केशवा"ला म्हणती उगाच नाही?
अपुलाच फेडण्याला हा कासरा निघाला

विडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

31 Mar 2009 - 1:54 am | प्राजु

कोण म्हणतं गुर्जी फक्त दारू, बाई बाटलीवरच इडंबने करतात...??
हे वरचे वाचा... विडंबनाचा उत्तम नमुनाच आहे.
जय हो गुर्जी!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

31 Mar 2009 - 10:19 am | नितिन थत्ते

कोण म्हणतं गुर्जी फक्त दारू, बाई बाटलीवरच इडंबने करतात...??

मान्य. असेच दर्जेदार विडंबन येत राहू द्या.
खराटा
(रंग माझा वेगळा)

मुक्तसुनीत's picture

1 Apr 2009 - 7:00 pm | मुक्तसुनीत

असेच दर्जेदार विडंबन येत राहू द्या.

हेच म्हणतो.

चतुरंग's picture

31 Mar 2009 - 2:03 am | चतुरंग

ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे
ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला

आवाज हा दुदंभी मी घाबरून उठलो
जवळून पाहिले तर हा पादरा निघाला

लई खास!! ;)

चतुरंग

ऋषिकेश's picture

31 Mar 2009 - 5:41 am | ऋषिकेश

हा हा हा हा हा :))
ऋषिकेश

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2009 - 8:45 am | llपुण्याचे पेशवेll

झक्कास विडंबन.. सुंदर. बाई, बाटली, ती, तिचा बाप या सर्वांशिवायही विडंबन खास जमले आहे.
केसुंना दंडवत.
सकस विडंबने पाडणार्‍यांचे आणि न पाडणार्‍यांचे सर्वांचे आभार.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

दशानन's picture

31 Mar 2009 - 9:08 am | दशानन

=))

ज ब रा !

जय हो !

ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे
ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला

एकदम सही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झबरदस्त झांटम्याटीक! :-D

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

नितिन थत्ते's picture

31 Mar 2009 - 10:25 am | नितिन थत्ते

केशवसुमारांमुळे आमच्या सारख्यांना भूषण कटककर, पुलस्ति वगैरेंच्या मनोगतावरील उत्तम कवितांचा आस्वाद घेता येतो (म्हणजे सर्व कविता वाचून चांगल्या कोणत्या ते ठरवावे लागत नाही). त्याबद्दल केसुंचे आभार.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विसुनाना's picture

31 Mar 2009 - 11:05 am | विसुनाना

केसुंचे शब्द नेहमीच बरोबर असतात.
पण यावेळी मात्र 'कासरा' हा शब्द चुकीचा आहे असे वाटले.
शिवाय तो मक्त्याच्या काफियाच्या जागी असल्याने फारच महत्त्वाचा आहे.
चु.भू.द्या. घ्या.

कासरा = दोरखंड (विषेशतः पोहरा विहिरीत सोडण्यासाठी)
कासटा = कासोटा (धोतर अथवा नऊवारी साडी यांचे पार्श्वभागावरील 'कुलुप' :))

'कासोटा फेडणे' म्हणजे एखाद्याची लाज काढणे अशा अर्थी वाक्प्रचार आहे.
(ताई तेलीण मारिल सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा - एक ऐतिहासिक काव्य!)

अर्थातच केसुंना हा अर्थ अभिप्रेत नसेल तर माझा आरोप मी बिनशर्त मागे घेतो.

बाकी हझल/विडंबन आवडली हे नेहमीप्रमाणे वे.सां.न.ल....
(म्हणजे तसे मी क्वचितच सांगितले आहे. ;))

चेतन's picture

31 Mar 2009 - 11:45 am | चेतन

खतरनाक विडंबन गुरुजी

---^----

चेतन

अवांतर : हा ठाण्यातील वेडा कोण :?

जयवी's picture

31 Mar 2009 - 12:50 pm | जयवी

दंडवत हो गुरुजी.....!!

तुमके विडंबन मे बहोत दम है.... ;)

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 6:57 pm | क्रान्ति

खासच विडम्बन! केशवसुमारांनी केशवकुमारांची आठवण करून दिली!
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लिखाळ's picture

1 Apr 2009 - 7:11 pm | लिखाळ

मस्त विडंबन.
आगरा या शब्दाचा वापर लै भारी. दुदंभी आवाज पण मस्त :)

मूळ कवितेत आणि इथेही चरा शब्द समजला नाही.
नाचा या शब्दाचे तसेच. त्या नंतर उद्गारवाचक चिन्ह असते तर मला थोडा अर्थ लागला असता.
-- लिखाळ.

केशवसुमार's picture

4 Apr 2009 - 11:20 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.

(आभारी)केशवसुमार