आय.सी.यू.---एक अनुभव,एक चिंतन!

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जनातलं, मनातलं
29 Mar 2009 - 3:20 pm

इंटेंसिव्ह केअर युनिट हे शब्दच फार अवघड आणि बोजड वाटतात नाही ? हे शब्द नुसते उच्चारले तरी सामान्य माणसाची छाती धडधडते,श्वास कोंडल्यासारखा वाटतो,उर धपापतो आणि उदगार निघतात,'अरे,बापरे,सिरियस कां ?'तर अश्या ह्या आय.सी.यू.मध्ये मी तीनवेळा जाऊन १०-१५ दिवस माझ्या धडधड्त्या हर्‍दयासहीत घालविले आहेत आणि तरीही त्यावर कांही लिहीण्याइतपत मी आज बरी आहे. त्याचीच ही कथा----
५सप्टेंबर १९८८--वय ३९वर्षे.-------माझे पति श्री.अशोक ह्यांचा नुकताच मृत्यू झालेला.!मन सुन्न करून टाकणारा सारेच जीवन उध्वस्त,उलथेपालथे करून टाकणारा.भविष्य अंधारमय भासविणारा.दोन मुलांची जबाबदारी,त्यांचे शिक्षण,करीयर सारेच अनिश्तित !मन गोंधळवून टाकणारे सर्व काही.मनातला हा क्षोभ मुलांसमोर काढावा तरी कसा,त्यांचा काय अपराध?ह्या जीवघेण्या कातरवाण्या अवस्थेचा एकच परिणाम-थोडी छातीत घुसमट! स्पेशालिस्टकडे जाऊन तपासणी केली.इ.सी.जी.काढ्ल्यावर ताबडतोब ऍडमिट होण्यास सांगितले आणि आय.सी.यू.मधील माझे पहिले वास्तव्य सुरु झाले.डॉक्टरांकडे हट्ट धरून संडास-बाथरूमला स्वतः उठून जायची परवानगी मिळविली.बाकी सर्व
ठीक! कारण आपल्याला काय झाले आहे आणि काय होऊ शकले असते हे कळतच नव्हते.तिसरया दिवशी जेव्हां फॅमिली डॉक्टर आले तेव्हां ते जावेला म्हणाले,'बरे झाले,त्या इथे दाखवायला आल्य्या! त्या दिवशी रात्रीच गोंधळ झांला असता! त्यांचे ह्रदय फक्त २५ ट्क्के काम करीत होते'' तेव्हां कुठे डोक्यात प्रकाश पडला.अज्ञानात सुख असते ते असे! हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितले होते,''बोलत्या व्हा! बोलत रहा.तुमच्या मनांत घुसमटणारे विचार बाहेर काढा.तुम्ही नक्की बरया होणार.''डॉक्टरांवर अत्यंत श्रद्धा,त्यांचाच आधार! मनात ठाम निश्यय केला,'ठीक आहे.पुन्हा अशी वेळ आणू द्यायची नाही.सांभाळायचे स्वतःला आणि मुलांना,त्यांना त्यांचे अधिकार मिळायलाच हवेत.तेव्हां
आता नो माघार !ते हि नो दिवसो गता: .गुड बाय मि.अशोक.आता तुमच्यासाठी रडणे नाही.मला आपल्या मुलांसाठी जगायचे आहे.''हाच विचार ठरवून आय.सी.यू.च्या बाहेर पडले. हा विचारांचा आणि डॉक्टरांच्या योग्य औषधोपचारांचा पॉझिटिव्ह परिणाम होता.डॉकटरांनाही लवकर बरे झाल्याचे सानंद आश्चर्य होते.त्यांच्या सल्ल्यानुसार २००३ पर्यत सर्व काही ठीक चालले होते.गोळ्या औषधे ह्यांचा मारा सुरूच होता.वरदा व अमेय पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत होते.दोघांनीही आपापले जीवनसाथी निवडले होते.चिंता करण्यासारखे काहीच नव्हते.
पण उगवला तो काळाकुट्ट दिवस-----ऑगस्ट२००३--वय-५४वर्षे.गणपती होऊन गेल्यामुळे,घरात खूपच काम झाल्यामुळे थकवा जाणवत होता.त्यातच शाळेत गेले.शाळेत थोडे छातीत दुखायला लागल्यामुळे लवकरच घरी आले.वरदाने माझी गंभीर अवस्था ओळखून प्रवीणच्या मदतीने मला आयकॉन हॉस्पिटलमध्ये नेले,अमेय व स्वप्नाही आले.डॉ,दिक्षितांनी तपासले आणि सर्वांच्याच विचारविनिमयाने अस्मादिक पुन्हा एकदा आय.सी.यू.मध्ये दाखल! सर्वजण चिंताग्रस्त,ताणलेले! स्वतःचा हटटीपणा व वैद्यकीय अज्ञान पुन्हा एकदा सिध्द!''मला येथे कशाला ठेवता? मला काहीही झालेले नाही.मला येथे रहायला आवडत नाही''वगैरे वगैरे भंपकबाजी आणि स्वतःला व इतरांना फसविण्याचा केविलवाणा प्रयत्न!!! पण घरच्याच चार डॉक्टरांनी तो हाणून पाडला.तिथे ८ दिवस राहून नंतर एशियन हार्ट इस्टिट्यूटमध्ये दाखल होऊन अँजिओग्राफीचा डॉ. राजीव कर्णिक यांचा सल्ला मानण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता. समोर मुलीचे लग्न दिसत होते.ब्लॉकेजेस कमी असतील तर एंजिओप्लास्टी, जास्त असतील तर बायपास हा भयंकर खर्चिक प्रवास! लग्नासाठी जमविलेला सर्व पैसा आपल्या आजारपणातच जाणार हा विचार सतत टेन्शन देणारा! पुन्हा एकदा मनाची तीच कुतरओढ! दुर्दैव असे की मला एकदाही मनमोकळेपणाने कोणासमोरही रडतासुद्धा येत नव्हते.पण ब्रेव्हो !एंजिओग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आला,पुढील सोपस्कार टळले.पुन्हा एकदा आय.सी.यू.तून जिंदादिल बाहेर !!
जुलै २००६--वय वर्षे ५७ पूर्ण-----आता मात्र हद्दच झाली.त्यानंतर २-३ वर्षे यूरिन स्टोनचा त्रास होत होता.दोन्ही बाजूला भरपूर स्टोनस् होते.युरॉलॉजिस्टला दाखविले होते.त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व काही ठीक चालले होते.भरपूर पाणी पित राहिल्यामुळे बबरेचसे खडे पडून जात असत.परंतु यावेळेस म्हण्जे २ जुलैला संध्याकाळी पोटात खूपच दुखू लागले.पेनकिलरनेही थांबेना.असह्य वेदनेने रडू येऊ लागले.ट्रीटमेंट सुरू पण नो रिझल्ट्! आश्च्र्यर्य म्हण्जे सोनोग्राफीनुसार उजवी बाजू क्लिअर,डाव्या बाजूला ३ छोटे स्टोन्स्.यूरॉलॉजिस्टला दाखविले.त्यांच्यामते विशेष काही नाही .फक्त आय.व्ही.पी.चा सल्लां. नो एन्टिबायोटीक्स.त्याच रात्री प्रचंड थंडी वाजून ताप.क्रोसिनने ताप उतरे,परत चढे.बाहेर खूप पाऊस.दुसरा दिवस उजाडला.स्वप्नाची एम्.डी. ची परीक्षा २दिवसांनी चालू होणार होती म्हणून ती हॉस्टेलला गेली.अमेय जे.जे. हॉस्पिटल्मध्ये कामाला गेला मलाही खूप बरे वाटत होते म्हणून मीच सर्वांना जायला सांगितले.पोटात दुखणे थांबले होते.
संध्याकाळ्पर्यंत वरदाच्या येण्याचीही अपेक्षा होती.पण मला मात्र दुपारपासूनच ग्लानी येत होती आणि आंतूनच बरे वाटत नव्हते.सारखे वाटत होते की कांहीतरी विचित्र घडणार आहे.बाहेर पावसामुळे रेल्वे बंद,माळशेज घाट बंद,त्यामुळे अमेय व वरदाचे येणे अनिश्चित.शेवटी दिनेशला बोलावून घेतले.थोडासा धीर आला. रात्री ८ वाजेपर्यंत सर्वजण कसेबसे मजल दरमजल करीत घरी पोचले. आता काळजी करण्यासारखे नव्हते.तीन घरच्या डॉकटरांची माझ्यावर नजर होती.वरदाने मला कण्हेरी खायला आणून दिली.मी ऊठून बसलेली असताना तिच्या लक्षात आले की मला द.मलागतो आहे.तिघानी मला तपासून आयकॉन हॉस्पिटला दाखल केले.पुन्हा आय.सी.यू.! स्पेशालिस्ट आले आणि सर्वानुमते रुग्णवाहिकेतून अस्मादिकांची यात्रा मुलुंड येथील वोकहार्ट हॉस्पिटलकडे सुरु! बाकीचे काही कळतच नव्हते.आपल्याला का नेत आहेत ,कुठे नेत आहेत,आपल्याला काय झाले आहे,एवढा विचार करण्याइतपतही शक्ति नव्हती.सर्वांचे चेहेरे पाहून काहीतरी सिरियस असावे असे वाटले.व्हील चेअरमधून फक्त इन्टेंसिव्ह केअर युनिट लेव्हल-२ एवढेच वाचले आणि आत घेतले गेले.बाहेर कसे पडणार?जिवंत की सर्वांना टाटा बाय बाय करून? सगळे मागेच राहिले.शेवटचा प्रवास एकट्यानेच करायचा असतो,त्याचीच ही सुरूवात असावी असे वाटले.ताबडतोब औषधोपचार सुरु.अनेक चांचण्या,अनेकवेळा सुया टोचणे,एक्स रे,सोनोग्राफी,अनेक डॉक्टरांचे तपासणे,पण डोकेदुखी व ताप उतरत नव्हता.सर्वजण २-२ मिनिटे येऊन बघून जात होते.मलाही ताकद नव्हती. तिसरा दिवस उजाडला.तेव्हा. कळले की मला सेप्टी सेमिया होऊन न्युमोनियाही झाला आहे.अनेक प्रतिजैविकांनाही शरीर प्रतिसाद देत नाही.वाटले आता सारे संपले !! दोन दिवसांनी थोडे थोडे बरे वाटू लागले.४-५ दिवसानंतर आय.सी.यू.मधून बाहेर काढले.आठवडाभरात घरी.
योग्य वेळेस योग्य औष्धोपचार मिळाल्यामुळे तीन वेळा आय.सी.यू.मधून सहीसलामत सुटका,हे भाग्यच म्हटले पाहिजे !असे व्हावेच कां असा विचार करीत बसण्यापेक्षा झाले तरी सुदैवाने आपण वाचलो हेही नसे थोडके !यापुढील जे दिवस आहेत ते स्वतःला आणि दुसर्‍याला आनंद देण्यासाठी,ईश्वरचिंतनासाठी बोनस मिळाले आहेत असे समजून वागायचे हाच निश्चय मी आता केला आहे व त्याप्रमाणे वागत आहे.

औषधोपचारअनुभव

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

29 Mar 2009 - 4:23 pm | अभिज्ञ

आय सी यु मधले अनुभव कथन आवडले.

अभिज्ञ.

प्रमोद देव's picture

29 Mar 2009 - 4:36 pm | प्रमोद देव

तुमच्या दूर्दम्य इच्छाशक्तीला सलाम!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

योगी९००'s picture

29 Mar 2009 - 5:07 pm | योगी९००

मी पण हेच म्हणतो..की तुमच्या दूर्दम्य इच्छाशक्तीला सलाम!

देव करो आणि अशी वेळ यापुढे आपणावर न येवो. बाकी अनुभव कथन छान जमले आहे. वाचताना थोडे धडधडतच होते.

खादाडमाऊ

प्राजु's picture

31 Mar 2009 - 7:57 am | प्राजु

तुमची दुर्दम्य शक्ती अफाट आहे.
अशी वेळ पुन्हा कधीच येऊ नये. अनुभव कथन आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दुर्दम्य इच्छाशक्ती अभिनंदनीय आहे. तुमचे अनुभव आमच्याबरोबर वाटून घेतलेत म्हणून बरे वाटले.
तुमचे ह्यापुढील आयुष्य आरोग्यपूर्ण राहू दे अशा शुभेच्छा!

चतुरंग

यशोधरा's picture

29 Mar 2009 - 5:26 pm | यशोधरा

तुमची इच्छाशक्ती खरेच जोरदार आहे! यापुढील तुमचे आयुष्य आरोग्यपूर्ण राहो, ही शुभेच्छा.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Mar 2009 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमची इच्छाशक्ती खरंच दुर्दम्य आहे.

गुड बाय मि.अशोक.आता तुमच्यासाठी रडणे नाही.

हे वाक्य वाचताना अंगावर काटा आला. एका अर्ध्या वयातील स्त्रीला नवरा अचानक गेल्यावर काय यातना होऊ शकतात हे चांगलेच माहित आहे. आणि असा काही निर्धार करताना ती स्त्री काय काय भावनिक आंदोलनातून गेली असेल याची कल्पना सुद्धा नाही करवत.

बिपिन कार्यकर्ते

लवंगी's picture

29 Mar 2009 - 6:16 pm | लवंगी

खरच , आई आपल्या बाळांसाठी किती खंबीर बनू शकते. यापुढील तुमचे आयुष्य आरोग्यपूर्ण राहो.

विनायक पाचलग's picture

29 Mar 2009 - 10:09 pm | विनायक पाचलग

कथनाला आणि तुम्हाला मनापासुन सलाम

बाकी ही परिस्थीती फार अवघड असते ,मी नववीत असताना माझी आजी दिड महिना आय सी यु त होती
आणि माझ्या परिक्षा चालु होत्या
तेव्हा काय वेळ आली होती माझे मला माहित
आणी हो नंतर तिचे पायाचे ऑपरेशन झाले आणि मी घरी ड्रेसींग बघत होतो(पाय बर झाला )पण त्या दिवसापासुन ठरवले की आयुश्यात काहीही होइन पण डॉक्टर नाही

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

यापुढील तुमचे आयुष्य आरोग्यपूर्ण राहो व पुन्हा कधीही तुमच्या वर आय सी यु मध्ये जाण्याची वेळ ना येवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना !!!

अनामिक's picture

29 Mar 2009 - 5:54 pm | अनामिक

हेच म्हणतो.

-अनामिक

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2009 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
अगदी हेच म्हणतो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

30 Mar 2009 - 9:03 am | अनिल हटेला

असेच म्हणतो !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भाग्यश्री's picture

31 Mar 2009 - 2:03 am | भाग्यश्री

सहमत..
वाचून काटा आला..

शितल's picture

31 Mar 2009 - 7:26 am | शितल

सहमत.
तुम्ही ग्रेट आहात, खंबीर आहात. :)

संजय अभ्यंकर's picture

29 Mar 2009 - 9:46 pm | संजय अभ्यंकर

ईश्वर आपणास दीर्घायू देवो व सतत स्वस्थ ठेवो!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सचिन's picture

29 Mar 2009 - 11:09 pm | सचिन

मनःपूर्वक अभिनंदन !!
तुम्ही जिंकलात !!

सँडी's picture

30 Mar 2009 - 7:30 am | सँडी

>>बोनस...
अगदी खरे! बोनस आयुष्य ही खरोखर देवाचीच देणगी!
हे बोनस आयुष्यही खुप काही नविन शिकवतं...

आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा!

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

सुनील's picture

31 Mar 2009 - 8:31 am | सुनील

वैशालीताई, प्रतिक्रिया लिहायला शब्दच नाहीत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

31 Mar 2009 - 9:23 am | दशानन

निशब्द !

पाषाणभेद's picture

31 Mar 2009 - 9:45 am | पाषाणभेद

असे आजारपण कुणाला नको. आपली प्रक्रुती चांगली राहो ही सदिच्छा.
- पाषाणभेद

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2009 - 9:54 am | प्रभाकर पेठकर

वैशाली,

तुमचे इन्टेन्सिव्ह अनुभव वाचून हृदय धडधडायला लागले. मी सुद्धा आय्. सी. यू. चा एकदा ६ दिवस आणि एकदा १ दिवस असा अनुभव घेतला आहे. एकटेपणाची भावना, खरच आपला 'प्रवास' संपला की काय असे वाटणे, किती कामे उरली आहेत ह्याचा आढावा, ह्यातून बरे झाल्यास स्वतःत करावयाचे बदल अशा अनेकानेक विचारांची साथ आय्. सी. यू. त सोबतीला असते. हृदयाचे दुखणे म्हणजे मनावर ताण तणाव सगळ्यात जास्त.
ह्या सर्वातून निभाऊन सुखरूप घरी परतलात हे वाचून हायसे वाटले. पुन्हा तुमच्यावर अशी वेळ न येवो ही इश्वर चरणी प्रार्थना.

तुम्हास आयुरारोग्य चिंतितो.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

स्वाती दिनेश's picture

2 Apr 2009 - 12:17 pm | स्वाती दिनेश

मावशी,सारे नकोसे प्रसंग परत डोळ्यापुढे उभे राहिले.
तुला भरपूर आयुरारोग्य चिंतिते.
स्वाती