दादा म्हनले ... !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 Mar 2009 - 12:55 pm

दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या...

दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी...

दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी...

दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी ...

दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो.............?

विशाल

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2009 - 1:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विशाल मस्त रे !

दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो.............?

आता तुमीबी त्यायच्याबरुबर त्यायचे पीए म्हणून जा ! :)

दादा म्हणले
मिसळपाववर चला
आमी उपक्रमवर गेलो.

दादा म्हणले
संकेतस्थळ काढा
आम्ही बजबडपूरी काढले.

दादा म्हणले
गझला लिहा
आमी कविता पाडल्या.

दादा म्हणले
आमचं तोंड काळं करा
आता वो ...?

(विशालसेठ आम्हाला माफ करा)

क्रान्ति's picture

27 Mar 2009 - 1:26 pm | क्रान्ति

कविता आणि बिरुटे सरांचा प्रतिसाद दोन्हीही खासच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अदित्य's picture

27 Mar 2009 - 2:51 pm | अदित्य

त्यायनचि गादी तुम्हि घ्या बाकि आम्हि हाएच पुड्ला वारसा चालवायला.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Mar 2009 - 2:58 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त!!!!

बिपिन कार्यकर्ते

सूहास's picture

27 Mar 2009 - 3:10 pm | सूहास (not verified)

कविता आणि बिरुटेमास्तरा॑चा प्रतिसाद दोन्हीही खासच!

सुहास..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

सहज's picture

27 Mar 2009 - 3:53 pm | सहज

मूळ कविता व बिरुटेसरांचा प्रतिसाद दोन्हीही भारी!

प्रमोद देव's picture

27 Mar 2009 - 5:42 pm | प्रमोद देव

असेच म्हणतो.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्रमोद देव's picture

27 Mar 2009 - 5:42 pm | प्रमोद देव

असेच म्हणतो.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

शितल's picture

27 Mar 2009 - 5:53 pm | शितल

सहमत. :)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2009 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या
प्रा.डॉ. (काका म्हणले नाहिये याची नोंद घ्यावी) ची कविता पण उच्चच !

परा दादा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विशाल कुलकर्णी's picture

27 Mar 2009 - 7:46 pm | विशाल कुलकर्णी

डॉ. (काका)
कस्चं कसचं.... तुमच्या सारख्या मोठ्या (इथे वयोवृद्ध असा अर्थ अभिप्रेत नाहीये हो!) माणसांचे असे प्रोत्साहन आमच्यासारख्याला दादा (माणुस) बनवते. धन्स..........
मा बो सारखा इथे कै च्या कै असा विभाग नाहीये ना, त्यामुळे आमची गोची होते बघा. बाकी आपला प्रतिसाद आणि कविता अफलातुनच. फक्त कंसातल्या ओळींनी रसभंग होतो बघा !! >:)
आभार !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 12:21 pm | विसोबा खेचर

वा! एक वेगळीच कविता..!

तात्या.

वाहीदा's picture

28 Mar 2009 - 1:28 pm | वाहीदा

तुमची कविता अन प्राध्यापकांचे प्रतिसाद दोन्ही ही मस्तच !
~ वाहीदा

जयवी's picture

30 Mar 2009 - 11:58 am | जयवी

भारी.....!!

विशाल अतिशय वास्तविक !!