शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
24 Mar 2009 - 9:32 pm

शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?

ही २० मिनिटांची फित मुलांच्या क्रियेटीव्हीटी क्षमतेबद्द्ल अनेक चांगले मुद्दे मांडते. ज्या खुस्खुशीत लयीने श्री. रॉबिन्सन हे त्यांचे विचार मांडतात ते आपल्याला ही फित २० मिनिटांची असुनही त्यात इन्व्हॉल्व्ह करतात. [इतर वेळी १० मिनिट झाले की, फित एकाग्रतेने पहाणे अशक्य होते.]
श्री. रॉबिन्सन ह्यांनी मांडलेल्या विचारांपैकी काही विचार/किस्से खाली दिले आहेत.

१. साक्षरता व कलात्मकता ह्या दोन्ही बाबी समान महत्वाच्या मानल्या जाव्यात.
२. मुलिचा आणि शि़क्षकाचा संवाद- ती जेव्हा देवाचे चित्र काढत असते...
३. मुलं चुका करायला घाबरत नाही- खरं म्हणजे त्यांना चुका झाल्यानंतर शिक्षेच्या भितीने घाबरावयाचं नसतं व ते का?...त्याबद्दल...जर त्यांना चुका करु दिल्या नाहीत तर "ओरिजनल" असे काही निर्माण होत नाही...
४. आपण क्रियेटीव्हीटी कशी शिकून आपल्या मनातून बाहेर घालवतो ...
५. जगभरातील शिक्षणपद्धतीत कलेला कसा उतरंडीच्या सगळ्यात खालचा अग्रक्रम मिळतो...
६. जगभरातील शिक्षणपद्धतीचे ध्येय युनिव्ह्र्सिटी प्रोफेसर निर्माण करण्याचे आहे का?...
७. "आउट ऑफ बॉडी" अनुभवाच्या बाबतीतले मत तर अगदी अफलातून आहे
८. सध्याची शिक्षणपद्धत १९०० व्या शतकाच्या आधी अस्तित्वात नव्हती..ती औद्योगिककरणानंतर अस्तित्वात आली...
९. स्त्रीया मल्टीटास्कींग का करु शकतात...
१०. इंटेलिजन्सबाबत ३ महत्वाच्या माहिती

अशा अनेक बाबी त्यांनी अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवल्या आहेत.

शिक्षणसंदर्भ

प्रतिक्रिया

अजय भागवत's picture

25 Mar 2009 - 11:25 am | अजय भागवत
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2009 - 11:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सायबानु, आमचं गरीब इंटरनेट २० मिनीटांची फीत पहायला तासभर लावतं. कृपया आपण थोडा सविस्तर लेख/प्रतिसाद लिहू शकाल का?

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

अजय भागवत's picture

25 Mar 2009 - 12:34 pm | अजय भागवत

कृपया आपण थोडा सविस्तर लेख/प्रतिसाद लिहू शकाल का?

आज तरी शक्य नाही; रविवारी जमेल.

क्लिंटन's picture

25 Mar 2009 - 11:52 am | क्लिंटन

>> आपण क्रियेटीव्हीटी कशी शिकून आपल्या मनातून बाहेर घालवतो ...

माझ्या इंटरनेट कनेक्शनमध्ये सध्या युट्यूब अत्यंत हळू चालत आहे म्हणून ही चित्रफित बघता आली नाही.ती नंतर कधीतरी बघेन. पण ’क्रियेटिव्हिटी’ घालविण्यात आपल्या शिक्षण पध्दतीत बनवलेला अभ्यासक्रम आणि आपली परीक्षा पध्दती मोठा महत्वाचा वाटा उचलतात असे वाटते. ज्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही अशा अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या होत्या.माहितीची रेलचेल अभ्यासक्रमात असते पण त्यामागचे कोणतेही लॉजिक समजावून द्यायचा प्रयत्न नसतो.आणि ज्याला ही निरूपयोगी माहिती जास्त तो जास्त हुशार अशी परिस्थिती दुर्दैवाने असते.
रसायनशास्त्रात लोखंड खाणीतून काढल्यानंतर त्याचे रूपांतर उपयोगी धातूत कसे करतात याविषयी माहिती होती.त्यात ब्लास्ट फरनेसच्या खालच्या भागात तपमान १२०० अंश असते, मधल्या भागात १००० अंश असते आणि वरील भागात अजून काहीतरी असते अशी माहिती होती. अनेकविध रसायनांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग यांची तर रेलचेलच होती. तसेच सव्हाना गवताळ प्रदेशात लोकांची घरे कशी असतात, विषुववृत्तीय प्रदेशात लोकांचे जीवनमान कमी का अशा स्वरूपाची माहिती होती.अशा माहितीचा नक्की उपयोग काय आणि ही माहिती नसली तरी दैनंदिन जीवनात काडीमात्र फरक पडत नाही.याउलट स्वतंत्रपणे विचार कसा करावा, प्रश्न कसे विचारावेत, त्यांची उत्तरे कशी शोधावीत या महत्वाच्या बाबींकडे पूर्ण दुर्लक्ष होत असे. अशा अभ्यासक्रमातून काहीही नवे करावे (क्रियेटीव्हीटी) असे वाटणे ही खूपच कठिण गोष्ट आहे.

काय करणार? कालाय तस्मै नम:

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अजय भागवत's picture

25 Mar 2009 - 12:36 pm | अजय भागवत

माझ्या इंटरनेट कनेक्शनमध्ये सध्या युट्यूब अत्यंत हळू चालत आहे म्हणून ही चित्रफित बघता आली नाही.ती नंतर कधीतरी बघेन.

मी ती फित कुठे शेअर करता येते का पाहतो.

आपल्या शिक्षण पध्दतीत बनवलेला अभ्यासक्रम आणि आपली परीक्षा पध्दती मोठा महत्वाचा वाटा उचलतात असे वाटते. ज्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही अशा अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या होत्या.माहितीची रेलचेल अभ्यासक्रमात असते पण त्यामागचे कोणतेही लॉजिक समजावून द्यायचा प्रयत्न नसतो.आणि ज्याला ही निरूपयोगी माहिती जास्त तो जास्त हुशार अशी परिस्थिती दुर्दैवाने असते.

अशाच प्रतिक्रियांवर ह्या रॉबिन्सन महाशयांची मते विचार करायला भाग पाडणारी आहेत.

अजय भागवत's picture

30 Mar 2009 - 10:04 pm | अजय भागवत

टि आर पी वाढवण्यासाठी मी हा जुना धागा पुन्हा उसवत नाहिये. माझे एक ए-ई-मित्र श्री. अनिल पेंढारकर ह्यांनी आज काही वाचनीय दुवे पाठवले होते ते मी येथे देत आहे ज्यांना ह्या विषयात रुची आहे त्यांच्यासाठी-

http://teacherleaders.typepad.com/tln_teacher_voices/2009/03/common-crea...

http://teacherleaders.typepad.com/tln_teacher_voices/2009/03/common-crea...