(अशक्य केवळ)

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जे न देखे रवी...
24 Mar 2009 - 1:00 am

सहज शक्य असा हा फ्री-हिट आणि त्यातही फुलटॉस भल्या-भल्यांनी सोडला. असा चेंडू भल्या-भल्यांनी सोडणे हे फारसे रुचले नाही. अगदी षट्कार नाही; पण एक-दोन धावांचा फटका तरी मारावा म्हटलं...

तुझाच उरला विचार केवळ
'विसर' आता अशक्य केवळ

कसे करावे तुजला राजी,
बोलतेस तू तशीही फटकळ

अशात व्हावी फितूर गात्रे
(निभाव आता अशक्य केवळ)

'पिऊन' येता पुन्हा घराशी
दिसते मजला का हे उखळ?

बारची ही तुंबली उधारी
हिशेब उरले तुझेच केवळ

विडंबन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

24 Mar 2009 - 1:05 am | मदनबाण

कसे करावे तुजला राजी,
बोलतेस तू तशीही फटकळ

हा.हा.हा... मोडकराव सह्ह्ही... :)

(कंप्लीट वाया गेलेला)
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

सँडी's picture

24 Mar 2009 - 8:16 am | सँडी

कसे करावे तुजला राजी,
बोलतेस तू तशीही फटकळ

हाहाहा! एकदम मस्त! असे चॅलेंजिंग प्रकार आवडतात आपल्याला!
बोलणं बंद करायचे अनेक सुंदर प्रकार आहेत! ;)

दशानन's picture

24 Mar 2009 - 8:47 am | दशानन

सही !
खुप मस्त !