प्रणय सोहळा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
20 Mar 2009 - 11:00 am

रुप पहाता राधेचें,
शाम गाली हासला
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

यमुने काठी शामसावळा,
मोर मुकुट पितांबर ल्याला
शामल सुंदर, रुप मनोहर
मोर मुकुट पितांबर सुंदर
शामरंगी काजळ होऊनी
राधा नयनी जाऊन बसला.
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

गौर गुलाबी राधा काया,
राधा ना ति जग्न माया,
चित्त चोराची,एकुन बासरी
मनी उठल्या त्या प्रेमलहरी
मन मयुर तो नाचु लागला
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

अलौकिक सोहळा यमुने काठी
खेळे राधा अन जगजेठी
नाचे नंद नंदन,नाचे मन मोहन
नाचे राधा नाचे यदु नंदन
पाहि अवतारी जन, पाहि सिध्द भक्तजन
पाहि ब्रज गोधन,पाहि हरपुन तन मन
तो शाम राधेच्या,मनी जावुनी बसला
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

अविनाश

कविता