माझ्या <strong>डॅन्स</strong> बार चा

sanjubaba's picture
sanjubaba in जे न देखे रवी...
17 Mar 2009 - 2:28 pm

माझ्या डॅन्स बार चा कसा होता सांगू थाट.....
झगमगत्या रस्त्यातून एक आळसावलेलि पाउलवाट.......

स्वागताला असायच्या उभ्या ' डॉली' आणि 'लव्ली'......
मला तर दोघी पैकी एकही नाही 'पावली'........

या धुन्द बागीच्याचा आम्हा दिलजल्याना आसरा.......
थोडी आत गेली की सारे दु:ख विसरा.......

समोर उभ्या ललनेचे खरच आपल्यावर असते का 'मन'.......
वासनेची भागविण्या तहान तिला शिवती किती जण..........

कानात घुमायचा नाद त्या छम छम पैजणाचा........
का भ्रम होता तो वेड्या मुजोर सुखाचा..........?

टांगलेला हा जीव मग धरायचा घरा कडची वाट..........
किती करावे माफ इतरानी जरी चुका सतराशे साठ..........

व्याकुळलेला जीव पेई मग थंड माठातले घटा-घटा पाणी......
आबाद होऊन शांत झोपे मी ....तिच्या डोळ्यात बर्बादिचे पाणी......

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

सुशील's picture

28 Mar 2009 - 10:35 pm | सुशील

वेगळीच कविता.......

विसोबा खेचर's picture

29 Mar 2009 - 12:53 am | विसोबा खेचर

लै भारी!

(डान्सबारची दुनिया जवळून पाहिलेला) तात्या.

प्राजु's picture

29 Mar 2009 - 8:12 am | प्राजु

काय हो ही कविता...!
एकदम वेगळ्या विषयावरची कविता. तरीही चांगली आहे.
शेवटही आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

sanjubaba's picture

30 Mar 2009 - 12:44 pm | sanjubaba

सुशील, तात्या आणि प्राजू ताई चे मनापासून आभार........!

संजूबाबा