शीघ्र कविच्या तीन कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
16 Mar 2009 - 9:05 am

एक
तांत्रिक कारणामुळे कविता स्वतः कवीने वगळली आहे.

दोन

आवंढ्यासारखी गिळता येत नाही
भळभळणारी कविता
मुक्यामुक्यानं जगावं
अशी नाही एकही जागा

जालावर येतो जरासे
सुखाचे क्षण मिळावेत म्हणून,

तर इथेही दोस्ताच्या कथेत
लहानग्या लेकराला त्याची माय
कपाटात कोंडून ठेवते.
अन बोटे कुरतडतात त्याची ,उंदीर

माझ्या स्वतःच्याच वेगळ्या चिंता असतांना,
उगाच चिंता करतो..याची,त्याची..
अन, संस्कृतीच्या नावाने बोंबलतही बसतो.

खरं तर या अशाच वेदनांवर
एखादा प्रोजेक्ट केला असता,
पण आजकाल टीचभर कविताही
दमवू लागल्यात साल्या.

तीन

रस्ते
सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले,
श्वानपुच्छ .
एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे,

एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Mar 2009 - 9:12 am | अवलिया

दिलीपशेट!!!
आजपासुन तुमची प्रा.डॉ. ची झुल आमच्यासाठी संपली....
आजपासुन तुम्हाला आम्ही दिलीपशेटच म्हणणार...
सोमवारची सकाळ सार्थकी लागली... सुंदर... अतिशय छान.

एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा

मस्त !!!!

--अवलिया

सहज's picture

16 Mar 2009 - 9:13 am | सहज

लै राग येतो.

पण आजकाल टीचभर कविताही
दमवू लागल्यात साल्या.

बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.

विवा लै लै भारी!

दशानन's picture

16 Mar 2009 - 10:42 am | दशानन

लै भारी हेच म्हणतो !!!

प्रमोद देव's picture

16 Mar 2009 - 10:43 am | प्रमोद देव

विवा लै लै भारी!

सहमत आहे.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

घाटावरचे भट's picture

16 Mar 2009 - 10:29 am | घाटावरचे भट

क आणि ड आणि क!!!

नंदन's picture

16 Mar 2009 - 11:41 am | नंदन

आवडल्या, सर. दुसरी आणि तिसरी विशेष आवडली. पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना? तसा स्पष्ट उल्लेख हवा, हे माझं वैयक्तिक मत. उगाच कुणाला बोट ठेवण्याची संधी देता कामा नये.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

झेल्या's picture

16 Mar 2009 - 6:30 pm | झेल्या

सहमत.

उल्लेख आवश्यक होता.

मूळ कविता दासू वैद्य यांची आहे.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2009 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना?
हो, आता 'तुर्तास' शोधल्यावर लक्षात आले, वरील पहिल्या कडव्यांचे 'मिपाकरण' झाले असे समजावी इतकी ती सारखी उतरली आहे. मात्र दासुंची संपूर्ण कविता वेगळ्या आशयाची आहे आणि दुर्दैवाने तशाच कल्पनेच्या नादात (मिपावरील निवासी /अनिवासींच्या चक्रात)तसेच शब्द उतरल्यामुळे सदरील कवितेवरुन आली आहे, उचलली आहे, असे वाटण्यापेक्षा...सदरील कविता वगळत आहे. नंदन आभारी !!!

-दिलीप बिरुटे

आनंदयात्री's picture

16 Mar 2009 - 11:44 am | आनंदयात्री

मस्त कविता प्रा डॉ !!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार

आवडल्या ! सुंदरच आहेत.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2009 - 12:18 pm | बिपिन कार्यकर्ते

प्राडॉ..... कब्बी कब्बीच आते, मगर जब्बी आते.... क्या शान मे आते मियां...

मस्तच आहेत कविता. २ आणि ३, विशेषतः ३ तर फारच आवडली.

बिपिन कार्यकर्ते

विसुनाना's picture

16 Mar 2009 - 12:26 pm | विसुनाना

सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले,
श्वानपुच्छ .
एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे,

एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.

ही कविता मास्टरपीस आहे.
कवि बिरुटे चांगलाच दमदार आहे.

श्रावण मोडक's picture

16 Mar 2009 - 1:45 pm | श्रावण मोडक

रस्ता - बुद्धालाही युद्धभूमीपर्यंत आणून सोडणारा. वा. एक पाऊल पुढे.

नाना बेरके's picture

16 Mar 2009 - 1:05 pm | नाना बेरके

एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.

- हे खर आहे.

नाना बेरके's picture

16 Mar 2009 - 1:15 pm | नाना बेरके

काळं बेट, लाल बत्ती - ह्या नाटकाच्या शेवटाची.

गुप्त खजिन्याच्या हव्यासापोटी इतर माणसांची हत्या करणार्‍या माणसाला शेवटी खजिना सापडतो आणि तो म्हणजे -
"बुध्दाच्या शांततेच्या संदेशाचे भूर्जपत्र "

मदनबाण's picture

16 Mar 2009 - 1:18 pm | मदनबाण

एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.
सॉलिट्ट्ट्ट्ट

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

विनायक प्रभू's picture

16 Mar 2009 - 1:21 pm | विनायक प्रभू

लै भारी.
मदन बाण म्हणतो ते कडवे तर शॉलेट्ट

निखिल देशपांडे's picture

16 Mar 2009 - 2:05 pm | निखिल देशपांडे

एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा

हे कडवे छानच आहे..... कविता २ सुद्धा छान आहे....

जयवी's picture

16 Mar 2009 - 2:57 pm | जयवी

अरे क्या बात है राजासाब....... !!
एकदम जबरी आहे काव्य.....!! बोले ते एकदम कडक :)

प्राजु's picture

16 Mar 2009 - 9:49 pm | प्राजु

एकदम कडक..
दुसरी आणि तिसरी जास्ती छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उर्मिला००'s picture

16 Mar 2009 - 5:44 pm | उर्मिला००

सुंदर लेखन !अभिनंदन

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 6:13 pm | लिखाळ

वा .. कविता छान आहेत. बुद्धाची विशेष !
पहिल्या कवितेत कल्पना छान आहे. पण अनिवासी घरटी वगैरेने वेगळे वळण लागले असे वाटले. ते तसे पटले सुद्धा नाही. (किंवा मला समजले नाही)

अजून कविता वाचायला आवडतील.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

16 Mar 2009 - 6:20 pm | चतुरंग

३ री विशेष आवडली. (बामियानचा बुद्ध आठवला)
२ री त्या खालोखाल.
पहिली समजली नाही!
प्राडॉ लगे रहो! अजून येऊदेत. :)

चतुरंग

धनंजय's picture

16 Mar 2009 - 7:45 pm | धनंजय

आवडली.
दुसरीही त्याच्यापाठी.

(पहिली सशक्त असून आवडली नाही. वर काही जणांनी सांगितल्यामुळे "ते परप्रकाशामुळे असावे" असे वाटते - पण मूळ कविता मी वाचलेली नाही.)

क्रान्ति's picture

16 Mar 2009 - 9:43 pm | क्रान्ति

तिसरी कविता एक्दम मस्त!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2009 - 9:49 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्याला बी तिसरी जाम आवाडली
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.