असंही प्रेम असतं!!
अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं...
उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....
थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'
.......मी निशब्द....
असंही प्रेम असतं!!
प्रतिक्रिया
20 Jan 2008 - 2:08 am | सुनील
दुसरी कुठलीच प्रतिक्रिया सुचत नाही.
(सुन्न) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jan 2008 - 2:13 am | इनोबा म्हणे
ही कविता याआधी इथे प्रसिद्ध झाली आहे,नक्की कुणाची आहे कळेल का?
http://misalpav.com/node/579
21 Jan 2008 - 3:43 pm | लेले
ती उगाच आधी निघुन गेली. दोघा जन् एकत्राच गेले असते ना
26 Jan 2008 - 8:09 am | सुधीर कांदळकर
कथेची आठवण झाली. हॅन्स अँडरसन बहुधा कथालेखक. कथाकाळ सुमारे १९२५. म्हणजे फारशी औषधे नव्हती व साध्या रोगांतही माणसे दगावत. कथानायकची प्रेयसी चित्रकार. कथानायक अशिक्षित मॉडेल. पण असामान्य चित्रकार व्हावे अशी त्याचि आकांक्षा असते. त्याचे तिच्यावरील प्रेम श्रेष्ठ चित्रकार म्हणून नावारुपाला आल्यावरच व्यक्त करावे अशी त्याची इच्छा असते. ती आजारी पडते. तिची तब्येत खालावत असते. तिच्या कॉटच्या बाजूला एक खिडकी असते. खिडकीतून तिला एक भिंत दिसत असते. या भिंतीवर एक वेल असते. हिवाळ्याचा मोसम सुरू झालेला असतो. वेलीचे एकेक पान गळायला लागते. तिचे मन निराशेने ग्रासून जाते. या वेलीचे शेवटचे पान गळल्यावर आपण मरणार असे तिला वाटते. शेवटी एकच पान राहाते. बर्फाचे वादळ सुरु होते. तिला वाटते आता वेल मरणार व आपण देखील. तो खीडकी लावून घेतो. दोनतीन दिवसांनी तिला किंचित बरे वाटते. ती खिडकी उघडते. तिला वेलिवर एक पान दिसते. ती खाली उतरते. ती वेल नसून ते वेलीचे चित्र होते. ती मॉडेलला बोलावणे पाठवते. परंतु ते चित्र काढतांना बर्फात भिजल्यामुळे न्युमोनिया होऊन त्याचा मृत्यू झालेला असतो.