तु राजा की राजदुलारी मै....

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
7 Feb 2009 - 11:03 am

तु राजा की राजदुलारी मै..
सिर्फ लंगोटे आला सुं !
भांग रगड के पिया करु....मै..
मुंडी सोटि याआला सुं !
तु राजा की छोरी से...
मेरे एक भी दासी दास नही !
साधुसा आले ओढण आली
म्हारा कंबल तक पास नही !

नवीन चित्रपट ओय लकी लकी ओये मधील हे एक गाणं ! हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... !
हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... ! एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !!

|| गाणे येथे उपलब्ध आहे ||

*********************************************

अशीच एक प्रेम जोड्याची ही छोटीसी कहानी ;)

# प्रेमाच्या सुरवातीच्या वर्षात

मी - कधी कधी हा प्रश्न माझ्या डोक्यात नेहमी येतो, तुला माहीत आहे का ?
ती - कुठला प्रश्न ?
मी - हाच. आपलं कसं होणार.
ती - ह्म्म ? कसं होणार म्हणजे.
मी - तु येवढी शिकलेली तुझ्या घरात पैसा पैसा कमी नाही.. माझ्या कडे कधी येणार माहीत नाही.
ती - अरे पैसाच म्हणजे जग आहे काय ? व मी शिकलेली आहे तर आपला फायदाच आहे, मी पण नोकरी करेन.
मी - म्हणजे बायको कडून पैसे घेऊन घर चालवू ?
ती - त्यात वाईट काय ?
मी - काही नाही .. असंच !
ती - तुला नाही आवडणार मी नोकरी केलेली ?
मी - आवडेल. पण तु माझ्या बरोबर कष्टात जगशील ?
ती - मी तुझ्या बरोबर कुठे ही जगेन.. अगदी झोपडपट्टी देखील !
मी - मी तुला पुर्ण सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन.

# लग्न झालेलेल्या एक आठवड्यानंतर !

मी - आज तु स्वयंपाक करतेस का ? रोज हॉटेल महाग पडतं गं !
ती - असं कसं राजा करतोस... मी नाही जा करणार.. मी दमले आहे ना आता!
मी - अगं.. फक्त नाष्टाच तर तयार केला होतास तु सकाळी.. ते पण !
ती - नाही रे राजा, नाष्टा तयार केला.. घर साफ केलं... कपडे वाळत घातले !
मी - एक खोलीचं तर घर !
ती - असं काय रे.. करतो !
मी - चल. ठिक आहे, मीच करतो.

# लग्न झालेलेल्या एक वर्षानंतर!

मी - ह्म्म. काय गं ! कपडे नाही धुतलेस.
ती - वेळ नव्हता.
मी - वेळ नव्हता म्हणजे काय ? मला ऑफिसला वेळ होईल आता.
ती - राज्या मला पण जायचे आहे ऑफिसला तुच धु कपडे आपले व बरोबर माझी साडी पण जरा.. प्लीज !
मी - तुझ्या आवशीचा घो... मी तुझी साडी सुध्दा धु काय ?
ती - धुना बाळा.. कधी तरी एकदा तरी माझं काम करं !
मी - बरं बरं .. नाष्टा तर तयार कर बये ! घालतो पोटात व कपडे धुतो !

# लग्न झालेलेल्या तीन एक वर्षानंतर!

मी - ये भवाने ! माझे कपडे .. नाष्टा केलास का तयार ?
ती - मी तुझी नोकर नाही आहे... स्वतःच करुन घे .. मला वेळ झाला आहे...
मी - तुझ्या आयाचा घो... करतेस का दाखवु झटका.. लै नाटक वाढले आहेत हं तुझे..!
ती - हात लाव ना .... बघ कसे नाचवते ते !
मी - थाबं आलोच.
ती - तु मला मारलेसं ! माझ्या बाबांनी देखील मला कधी हात लावला नव्हता..
मी - तु बायको आहेस माझी !
ती - माझ्या घरी असं नव्हतं काही.. मला कसं राजकुमारी सारखं ठेवलं होतं बाबांनी !
मी - मग जा तुझ्या बाबा कडे.. जेव्हा बघावे तेव्हा बाबाचं तुणतुण !
ती - उं .. मी गेले की बसं रडत मग... आधी कसं म्हणत होतास फुला सारखी ठेवेन.. सुख देईन .. साधं दोन खोल्याचं घर नाही घेतलंस अजून... ! एक भांडी वाली ठेव म्हणाले तर म्हणे.. तु काय करतेस ऑफिस मधून आल्यावर..

हे ती व मी ची अनंत कहानी अशीच चालू राहणार.. युगे युगे !

ह्यात फक्त ती व मी च्या जागी कुठली ही नावे भरा.. सेम कथा !

इतिहासशब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिषेक पटवर्धन's picture

8 Feb 2009 - 11:58 am | अभिषेक पटवर्धन

मला वाटतय की हे गाणं ओय लक्की मधलं आहे. नाही का?

दशानन's picture

8 Feb 2009 - 12:09 pm | दशानन

धन्यवाद !

धन्यवाद !

माझा पण देव-डी झाला आहे सध्या ;)
डोक्यात फक्त देव-डीच चालू आहे त्यामुळे झाले असे :(

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सखाराम_गटणे™'s picture

8 Feb 2009 - 12:28 pm | सखाराम_गटणे™

नाना म्हणतो ते खरे आहे. प्रेमाला लग्न हा शाप आहे (जर अंडर स्टैंडीग नसेल तर.)
कंसातील वाक्य माझे आहे.

टारझन's picture

8 Feb 2009 - 1:24 pm | टारझन

मी - आवडेल. पण तु माझ्या बरोबर कष्टात जगशील ?
ती - मी तुझ्या बरोबर कुठे ही जगेन.. अगदी झोपडपट्टी देखील !

तिने बाबांचं तुणतुणं वाजवताना त्याने कधी ह्या संवादांची तिला आठवण करून का णाही दिली ?

आणि ह्या ष्टोरीमधला 'तो' पडिक सडिक वाटतो, मग त्याने घरची कामं केली तर स्वाभिमाण का दुखावला गेला ?
माफ करा राजे, ह्या ष्टोरीतले दोघेही अंमळ येडझवे वाटले , मात्र तुम्ही णेहमीची कथा मस्त लिहीलीत .. अगदी चार कोलन्स पाडून ..

- टार्‍या चैन
|| हेच ते टारू चैन ||