<प्रवाह....आणि उत्तर>

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
5 Feb 2009 - 1:07 am

आम्हापाशी आत्ता
फार नाही वेळ
संक्षेपे सकळ
वर्णितो ऐका

कवींनी आणिली
आम्हावरी वेळ
काव्याचा सुकाळ
करोनिया

विडंबने झाली
संस्थळी उदंड
करावया दंड
प्राजु येई

डांबिसकाकाची
पुतणी प्रेमाची
गट्टी मिपामाजी
अनोखीच

कवींची माऊली
मिपाची आवली
सांडूनी 'पावली'
शोधी आता!:)

विडंबनकर्ते
सारे अवखळ
लेखणी सबळ
चालविती

मास्तर्णीभवती
गोंगाट करीती
आदेश मारती
फाट्यावरी

काका म्हणे प्राजु
संपव हा वाद
सोड तूच नाद
या टग्यांचा :)

नानाचा तू सल्ला
घेई मनावर
लेख हा सुंदर
येऊ देत

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

5 Feb 2009 - 1:15 am | श्रावण मोडक

चार डाऊन म्हणता, म्हणता वन डाऊन. क्याप्टननं बढती दिली वाटतं.
बाकी, वाचून वेंगसरकरची आठवण झाली.

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2009 - 6:49 am | पिवळा डांबिस

नका देऊ देवा
बढती फुकट
मी बरा नाईट
वॉचमन!!
:)

प्राजु's picture

5 Feb 2009 - 1:17 am | प्राजु

साधी सदस्याच
वाद का घालू मी..
हितचिंतक मी
मिपाकर..

कोणा जे हवेसे
त्याने ते लिहावे
फाट्यावरी द्यावे
तात्यानेही...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2009 - 1:24 am | पिवळा डांबिस

विडंबकही ते
हितकर्ते सारे
हास्याचे फवारे
उडवीती

तात्याला तू करू
नकोस बेजार
असे बुधवार
आज त्याचा....
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2009 - 7:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्याला तू करू
नकोस बेजार
असे बुधवार
आज त्याचा....

=))

अरे, तुमच्या विडंबनाच्या धाकाने माझे कवितेसाठी जमलेले शब्द पळून जातात राव ! :)

शितल's picture

5 Feb 2009 - 1:34 am | शितल

पिडाकाका,
अहो काय एकदम विडंबन एक्स्प्रेस चालु झाली की तुमची :)

आता काकांवर एक तरी कविता लिवायला पाहिजे. 8|

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2009 - 6:51 am | पिवळा डांबिस

आता काकांवर एक तरी कविता लिवायला पाहिजे.

एकच कविता
कशी ती पुरेल
लिहावे लागेल
खंडकाव्य
:)

बेसनलाडू's picture

5 Feb 2009 - 2:27 am | बेसनलाडू

लंचनंतरची स्वीट् डिश् म्हणून हे वाचावयास मिळाले.
(तृप्त)बेसनलाडू

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

5 Feb 2009 - 9:44 am | मधु मलुष्टे ज्य...

विडंबनाचा वर्षाव होतोय मिपावर. धमाल आहे ! :)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

सिद्धेश's picture

5 Feb 2009 - 10:19 am | सिद्धेश

मानले हो तुम्हाला जी
तुम्ही 'डांबिस' महान
आम्हालाही शिकवाल का हो?
तुम्ही काव्याचे विडंबन