साद

सुचेता's picture
सुचेता in जे न देखे रवी...
28 Jan 2009 - 1:03 pm

घालावी तुज साद
अव्याहत हाच नाद

आवरता आवरेना
थोपवू कसे मना

क्शणोक्शणी तुझे भास
भेटायाचे हिच आस

कसाबसा सरे दिस
रात उरे स्मरणास

पुसण्यास नाही कोणी
गालावर सुकले पाणी

एकदाच तुज भेटावे
मनीचे भाव जुळावे

हिच शेवटली आस
जिवाने घेतला ध्यास

सुचेता सुळे

कविता

प्रतिक्रिया

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 2:33 pm | मधु मलुष्टे ज्य...

एकदाच तुज भेटावे
मनीचे भाव जुळावे

हिच शेवटली आस
जिवाने घेतला ध्यास

छान !

--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

सुन्या कोकणी's picture

28 Jan 2009 - 4:21 pm | सुन्या कोकणी


हिच शेवटली आस

शेवटली आस आहे
म्हणजे समस्या काय आहे हेच कळले नाही .

..............सुन्या कोकणी

शंकरराव's picture

28 Jan 2009 - 4:28 pm | शंकरराव

फार सुंदर रचना ,

एकदाच तुज भेटावे
मनीचे भाव जुळावे

हेच समारोपाचे कडवे असते तरिही चालले असते.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 9:42 pm | नितिन थत्ते

मंगळ्सूत्रात फार वेळ गुंतल्याने कविता वाचायला उशीर झाला.
कविता छान. छोट्या ओळी. साधा सरळ अर्थ.
छान

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 9:42 pm | नितिन थत्ते

मंगळ्सूत्रात फार वेळ गुंतल्याने कविता वाचायला उशीर झाला.
कविता छान. छोट्या ओळी. साधा सरळ अर्थ.
छान

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मदनबाण's picture

28 Jan 2009 - 9:57 pm | मदनबाण

एकदाच तुज भेटावे
मनीचे भाव जुळावे

व्वा..

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

प्राजु's picture

28 Jan 2009 - 9:57 pm | प्राजु

छोट्या ओळीतून छान व्यक्त झाली आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुचेता's picture

2 Feb 2009 - 12:52 pm | सुचेता

प्रतीसाद देणार्या सगळ्यांचे मनापासुन आभार
याने नवीन लिहणार्या माझ्या सारख्यांचा उत्साह नक्कीच वाढेल.

सुचेता