मिपाकर मित्र/मैत्रिणींनो....
न्यू जर्सीतील आम्हा काही जणांचा एक उभ्या उभ्या विनोद करणारा संघ आहे :)
मध्यंतरी आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशनच्या निधी उभारणी साठी साधारण सव्वा तासाचा एक कार्यक्रम केला होता.
त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे 'तू नळी'वर उपलब्ध आहेत.
ह्या ध्वनि-चित्रफितीमधे चुकून माझे नाव 'सुरेश' असे दिसते पण नवीन चित्रफीत मिळाली की हा दुवा बदलीन.
सादरकर्ते -- अनुक्रमे --
- शुभदा कामेरकर
- प्रशांत गिजरे
- सुरेश जोशी
- वैशाली फणसे
- विनय देसाई
- अस्मादिक !!!
तर ही ध्वनि-चित्रफीत जरूर पहा आणि अभिप्राय कळवा :)
प्रतिक्रिया
20 Jan 2009 - 6:37 am | समिधा
खुप छान आहे, ह्या कार्यक्रमाचे अजुन काही भाग कुठे बघता येतील?
20 Jan 2009 - 7:08 am | जृंभणश्वान
सगळ्यात पहिल्या काकु सह्ह्ही आहेत, कसला कॉमेडी टोन आहे :)
20 Jan 2009 - 7:23 am | ऋषिकेश
लै भन्नाट.. मजा आली.. त्यातहि ऐकु येणारा सिग्नल आण स्पीडोमीटर तर ह. ह्. पु.वा.
मजा आली..
तुमच्या "कटपीस" कोपरखळ्याहि आवडल्या
20 Jan 2009 - 7:29 am | रेवती
मस्त रे संदीप! पुन्हा एकदा प्राजुच्या घरी केलेला कार्यक्रम आठवला.
तुमचा सगळा गृपच चांगला आहे.
शुभेच्छा!
रेवती
20 Jan 2009 - 7:31 am | अनिल हटेला
ताग्या सोबत कटपीस !!!
:-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Jan 2009 - 7:54 am | मीनल
मला ही चिपोट्ले आणि स्टॉप साईन सर्वात आवडले.
बाकीचेही संपूर्ण पहायला /ऐकायला आवडेल.
मीनल.
20 Jan 2009 - 9:04 am | कोलबेर
चिपोटले?? अहो ते खाण्याचे (फास्ट फूड) दुकान आहे. ते तुम्हाला कुठल्या विनोदात आढळले? :O
तुम्हाला चिपन्डेल म्हणायचे आहे का??जरा नीट बघा ते वेगळेच आहे.
विनोदातल्या १, १ डॉलरच्या नोटा काय बरीटो खायला वापरल्या असे वाटले का काय तुम्हाला? =))
20 Jan 2009 - 8:24 pm | रामदास
काळा घोड्याला एक फर्नीचरचं दुकान होतं .मी तसंच समजलो पण काही लिंक लागेना. हे काहीतरी वेगळच आहे.
20 Jan 2009 - 8:07 am | सहज
तुमचा ग्रुप चांगला आहे.
अजुन चित्रफिती चढवल्यात की नक्की दुवे द्या.
शुभेच्छा!
20 Jan 2009 - 8:12 am | शितल
संदीप,
माझ्याकडे तुझ्या स्टँड अप कॉमेडीचा व्हिडीओ आहे.
देऊ का लिंक येथे.
20 Jan 2009 - 9:09 am | संदीप चित्रे
ग्रुपमधल्या सर्वानुमते ठरल्यानुसार ही क्लिप सध्यातरी आम्ही यू ट्युबवर टाकली आहे.
मी तुला फोन करतो मग बोलू.
20 Jan 2009 - 8:30 am | रामदास
हसण्यासाठी विनोदाचा ताजा स्टॉक हाताशी आला.अर्थात कमीच पडला.आणखी असेल तर पाठवा.
सगळे कलाकार प्रोफेशनल वाटतात.शिरीष कणेकरांच्या प्रयोगाची आठवण झाली. अभिनंदन.
प्राजूताईंकडे जो कट्टा झाला त्यात याच कार्यक्रमाचा उल्लेख होता असे वाटते.
20 Jan 2009 - 9:15 am | संदीप चित्रे
सगळे कलाकार 'हौशी' आहेत रामदास.... कौतुकासाठी धन्यवाद :)
20 Jan 2009 - 8:54 am | धनंजय
छान जमली होती हसवाहसवीची मैफिल!
20 Jan 2009 - 9:14 am | संदीप चित्रे
मिपाकर मित्र/मैत्रिणींनो...
क्लिप लगेच पाहून... तितक्याच उत्साहाने लगेच अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :)
20 Jan 2009 - 9:24 am | प्राजु
मस्त आहे ही क्लिप.
इथे कट्ट्याच्या वेळी तू सादर केलेला तुझा कार्यक्रम आठवला. आणि तेव्हा उडालेले हास्याचे फवारे आठवले.
मस्त.
तुमच्या या ग्रुप ला माझ्या शुभेच्छा!
(ते ईप्रसारणचे तेवढे मनावर घे आता)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jan 2009 - 11:45 am | वृषाली
चित्रफित मस्त आहे.ग्रुपही चांगला आहे.
अजुनही कार्यक्रम पहायला आवडतील.
22 Jan 2009 - 1:03 am | बिपिन कार्यकर्ते
चित्रे मास्तर, मस्तच आहे टीम आणि प्रोग्राम पण मस्तच रे. जरा पूर्ण फीत दे की रे. :)
दुबईचे कार्यक्रम घेता का? ;)
बिपिन कार्यकर्ते
22 Jan 2009 - 1:23 am | चतुरंग
करायचा असल्याने 'सुपारी' दिलीत तरच घेतील! ;)
चतुरंग
22 Jan 2009 - 1:27 am | संदीप चित्रे
आणि माफक मानधनात आम्ही जगभरचे कार्यक्रम घेतो :)
(दुबईत असल्यास 'सुपारी' घेतो !!)
22 Jan 2009 - 8:31 am | विसोबा खेचर
चित्रे मास्तर, मस्तच आहे टीम आणि प्रोग्राम पण मस्तच रे. जरा पूर्ण फीत दे की रे.
हेच बोल्तो! :)
22 Jan 2009 - 9:56 am | संदीप चित्रे
द्यायची इच्छा आहे पण अजून काही कार्यक्रम झाले की मग देऊ असे ठरले.
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्व मिपाकरांचे आभार.
22 Jan 2009 - 1:25 am | चतुरंग
तुझा कट्ट्यावेळी केलेला परफॉर्मन्स आठवला. दे धमाल आहे. पुन्हा आठवून हसलो.
आज संध्याकाळी पूर्ण बघेन.
चतुरंग