तू मुसमुसलेली, षोड्शा,सुंदर बाला,
घातला नजरेन,तू,ह्रुदयावर की घाला.
नजर धारधार, यौवनाचा कहर,
तू तिलोत्तमा नि रतीहुन भासे सुंदर.
साडीत लपेट्ले,गोरे कोवळे तन,
काचोळीत बांधले, खट्याळ ते यौवन
यौवन गंध दरवळे अवती भवती,
उन्मादक नजर आग भडकवे वरती.
तो मुखडा सुंदर,गोजिरा अन लाजरा
ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा.
ओठांची महीरप,करे मम मनांस दंग
आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग.
तू मधु शर्वरी, चांदणी तु शुक्राची
सुंदर चाफेकळी तू, कळी लावण्याची,
उतरली भू तळी रंभा की अप्सरा
वळती तुझकडे वारंवार की नजरा.
काय करावी शायरी तव रुपावर
शब्दांचा खजीना,अपुरा वाटे खरोखर
कीती करु गोळा मी शब्दांचे हे कण
नाही होत पुरे तव रुपाचे वर्णन
अविनाश
प्रतिक्रिया
15 Jan 2009 - 8:55 am | सिद्धू
कविता सुंदर आहे. येऊ द्या अजून.
पण शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्यास अजून छान वाटेल. मुख्यतः 'तु' आणि 'भु' हे शब्द दीर्घ हवेत.
15 Jan 2009 - 9:20 am | पिवळा डांबिस
ह्यो तुजां काय वर्णन करांन र्हायला बग रं!!!!
आता तर तुला भेटावांच लागंन!!!
-डांबिसदादूस
(जल्ला, मेल्याच्या नांवानच काय नाय!!!)
:)
15 Jan 2009 - 7:27 pm | ब्रिटिश
चूकीची मीश्टेक दादुस
बार बार बाला क नाम क्युं लेते हो
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
15 Jan 2009 - 12:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शीर्षक वाचून कविता उघडली, आतमधे भलतंच काहीतरी निघालं!
पिडा काका, लई भारी! =))
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
15 Jan 2009 - 6:32 pm | सुहास.
सुहास.....
दुचाकीची मागची मळलेली सीट म्हणजेच स्वछ चारित्र्याच॑ लक्षण..(आम्ही मात्र पुसुन ठेवतो..)