कोल्हापूरची खाद्य संस्क्रुती आहारशास्त्र, आरोग्यशास्त्रातील निकषापेक्षा एक वेगळी संस्क्रुती.
"ठसका", "झटका","भुरका" ही खाद्य संस्क्रुतीची वैशिष्ठ्य. या वैशिष्ट्यांमागे तिखटातीलही एक गोडवा आहे. तो असा
पांढरा रस्सा
साहित्यः १/२ किलो मटण
२ टे.स्पून तीळ
१ वाटी ओले खोबरे
६/७ लसूण पाकळ्या
१ इंच आले
४ वेलदोडे
७/८ काळी मिरी
२ टी.स्पून तूप
मीठ चवीनुसार
१.प्रथम मीठ, आले, लसूण, थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.
२.तीळ बारीक वाटून घ्यावेत.
३.मिक्सरमधे थोडे पाणी घालून खोबर्याचे दूध काढून घ्यावे.
४.नंतर तूपाची फोडणी करून त्यात मिरी, वेलदोडे टाकवेत. मटणाचे सूप घालावे.
५नंतर खोबर्याचे दूध घालावे.
६. हवे असल्यास मीठ घालावे व चांगली उकळी आणावी.
टीप: १.काही वेळा फोडणीत दालचिनीचे तुकडे टाकतात.
२.पांढरा रस्सा पातळ सूपप्रमाणे ठेवावा किंवा रस्सा थोडा वाटलेले ओले खोबरे लावून ग्रेव्हीप्रमाणे दाट करावा.
*********************************************************************
तांबडा रस्सा:
साहित्यः
१ किलो मटण
२ टी.स्पून मीठ
१/४ टी.स्पून हळद
९/१० लसूण पाकळ्या
१इंच आले
कोथिंबीर
४ कांदे
१ टोंमॅटो
१ वाटी तेल
१ टे.स्पून लाल तिखट
मसाला:
२ टे.स्पून तीळ
१ टे.स्पून खसखस
४/५ लवंगा
४/५ दालचिनीचे तुकडे
४/५ काळी मिरी
१ टी,स्पून धणे,जिरे पूड
२ टे.स्पून ओले खोबरे
२ टे.स्पून सुखे खोबरे
४ वेलदोडे
क्रुती १
१.निम्मे आले -लसूण, कोथिंबीर, हळद, मीठ घालून मटण चांगले शिजवून घ्यावे.
२.वरील सर्व मसाला थोड्या तेलात भाजून ,मिक्सरमधे बारीक वाटून घ्यावा.
३.मटण शिजल्यानंतर एका पातेल्यात तेल घालून उरलेले आले-लसूण, कांद्याची फोडणी घालून तिखट व
बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगले परतावे.
४.नंतर बारीक केलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत भाजावा.
५.नंतर शिजलेले मटण घालावे आणि वरून पाणी गरम करून घालावे.
६.रस्सा पातळ पाहिजे. चांगली उकळी येऊ द्यावी.
७. वरून तूप घालावे व कोथिंबीर घालावी.
क्रुती २
१.प्रथम मटणाला निम्मे आले,लसूण, थोडी हळ्द, १/२ च. तिखट चोळून लावावे व झाकून बाजूला ठेवावे.
२.एका पातेल्यात थोड्या तेलात वरील सर्व मसाला भाजून, मिक्सरमधे बारीक वाटून घ्यावा.
३.त्याच पातेल्यात कांदा भाजून घ्यावा. मिक्सरमधे बारीक वाटावा.
४.टोमॅटो बारीक चिरावेत.
५. मोठ्या पातेल्यात तेल गरम करून वाटलेला कांदा तेल सुटेपर्यंत परतावा. नंतर त्यात उरलेले आले, लसूण पेस्ट. तिखट, हळद घालून परतावे. नंतर बाजूला ठेवलेले मटण घालून परतावे. सर्व मसाला मटणाला लागला पाहिजे.चवीनुसार मीठ व टोमॅटो घालून परतावे.
६.मटण खमंग परतले की, त्यात गरम पाणी घालून ढवळावे.
७.नंतर प्रेशर कुकर मधे घालून ३ शिट्या कराव्यात. थंड झाल्यावर मटण व्यवस्थित शिजले की नाही ते पाहावे.
प्रतिक्रिया
13 Jan 2008 - 10:42 pm | प्राजु
तू तर इथे कोल्हापूरी दरबारच उघडला आहेस..
सह्ही.. चालू राहुदे..
-(कोल्हापूरची मिरची)प्राजु
13 Jan 2008 - 10:44 pm | विसोबा खेचर
स्वातीताई,
अतिशय सुरेख पाककृती...
आपल्याकडून मिपावर अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे....
तात्या.
14 Jan 2008 - 12:58 am | चतुरंग
अशाच काही हटके, शाकाहारी पाककृती असतील तर दे ना (एकारांत उल्लेख चालेल ना?).
मला स्वतःला किचनमधे लुड्बुडायला आवडतं, बायकोला मदत करायला.
मी काही पदार्थ चांगले बनवतो (असं माझी बायको म्हणते - म्हणजे खरंच बनत असावेत!)
चतुरंग
14 Jan 2008 - 2:57 am | स्वाती राजेश
प्राजु, तात्या आणि चतुरंग मी आपली आभारी आहे.
चतुरंग आपल्या सांगण्यानुसार पुढच्या वेळी मी व्हेज रेसिपी लिहीन बायकोला स्वयंपाकात मदत करत असाल तर लवकरच लिहीन.:))
14 Jan 2008 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तांबड्या रस्स्याचा बेत आम्ही येत्या एखाद्या खानावारी करणार आहोत.
तेव्हा व्हेज रेसिपी बरोबर आमच्या आवडत्या मांसाहारी रेसिपी ला विसरु नये !!!
माश्यांचे फ्राय, कंटकी, चिकन बिर्यानी........असेही काही येऊ द्या !!!
अवांतर :) आम्ही बायकोला स्वैपाकात कोणत्याही प्रकारे मदत करीत नाही, आमच्या सहभागाने अनेकदा सैपाक बिघडतो असा एक जूना आरोप आमच्यावर आहे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे