शेवटच स्टेशन

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Jan 2009 - 11:06 am

रेल्वे गाडित खचाखच गर्दी होति.जिव गुदमरला होता..
एकदाची सुटली...१-२ स्टेशन वर थांबली..
काहि आत आले काहि बाहेर गेले...एका मुलान बसायला जागा दिली...
आरामात बसलो,गाडिन वेग घेतला.गाडी लयात धावत होति..
खिडकीतुन गार वारा येत होता...कधि डोळा लागला कळाले नाहि..१

स्वप्न कि काय कळेना..एक घर दिसल,माझच होत..
बरेच लोक जमले होते,मित्र होते ,नातेवाइक होते.
आत गेलो तर, हि कोप~यात रडत बसली दिसलेली,बायकांच्या घोळक्यात.
काय प्रकार कळेना,जमीनिवर कुणीतरी झोपले होते..
नाका कानांत कापसाचे बोळे,अंग पांढ~या कपड्यान झाकलेल...
त्यावर हार, गुलाल,जवळ जावुन पाहिल अन,हबकलोच
तो मीच होतो..खाडकन जागा झालो..पाहिल तर गाडी थांबलेली होति...२

डबा मोकळा होता..खाली उतरलो,अंग हलक,डोक जड झाल होत..
बाहेर अंधार होता..प्लॅटफोर्मवर शुक शुकाट होता..
कुठे आलो कळत नव्हते, कुठल स्टेशन आल समजत नव्हत..
समोर स्टेशन मास्तर उभा होता..त्याचा चेहेरा पण निट दिसत नव्हता..
मास्तर कुठल स्टेशन आल?..विचारल अन डोळ्यासमोर अंधारी आली..
बाजुच्या बाकावर बसलो..काहिच उमजत नव्हत.
"काका शेवटच स्टेशन आहे, गाडी पुढे जाणार नाहि..प्रवास संपला..
बस एवढच ऎकु आल..........३
Avinash.................

मुक्तक

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

3 Jan 2009 - 12:55 pm | नितिन थत्ते

लेखन छान.

पण वय काय हो तुमचं ?

विनायक प्रभू's picture

3 Jan 2009 - 1:22 pm | विनायक प्रभू

असली स्वप्ने वयातीत असतात.

अवलिया's picture

3 Jan 2009 - 1:24 pm | अवलिया

असली स्वप्ने पडली की माझ्या खव मधे डोकावत जा.... अक्सीर ईलाज

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

3 Jan 2009 - 1:27 pm | विनायक प्रभू

जालीम इलाज

अवन्तिका's picture

3 Jan 2009 - 1:30 pm | अवन्तिका

शेवट्च्या स्टेशनात शेवटचे स्वप्न ....????

संताजी धनाजी's picture

3 Jan 2009 - 4:10 pm | संताजी धनाजी

छान लिहिले आहे. आवडले :)
- संताजी धनाजी

पांथस्थ's picture

3 Jan 2009 - 4:32 pm | पांथस्थ

शेवटच्या प्रवासाचे एकदम धावते वर्णन केले.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

धनंजय's picture

4 Jan 2009 - 2:45 am | धनंजय

कथावस्तूही आवडली. अजून थोडा रंग भरायला पाहिजे असे वाटते.

**अधिक सफाईसाठी मिपावरील प्रियाली यांच्याकडून शिकवणी घेता येईल का?**

लवंगी's picture

4 Jan 2009 - 3:44 am | लवंगी

मस्तच