AURA, Conceivable Life Sciences द्वारे विकसित केलेली AI-चालित IVF रोबोटिक प्रणाली, थेट मानवी हस्तक्षेपाशिवाय गर्भ तयार करून एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. आतापर्यंत जवळपास २० बाळे, मेक्सिको सिटीमधील स्वयंचलित फलन (फर्टिलायझेशन) चाचण्यांमधून जन्मला आली. या यशामुळे IVF तंत्रज्ञान अधिक वेगवान, अधिक परवडणारे आणि जागतिक स्तरावर अधिक सुलभ बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
AURA ही प्रणाली मानवी हस्तक्षेपाशिवाय IVF प्रक्रियेतील २०० हून अधिक पायऱ्या स्वयंचलितरीत्या पार पाडू शकते.Washington Post* (https://www.washingtonpost.com/video/national/inside-the-ivf-clinic-usin...) ने याबाबत सविस्तर लेख प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार *Aura* प्रणालीच्या स्वयंचलित प्रक्रियेतून सुमारे २० बाळांचा जन्म झाला आहे. लेखानुसार, रोबोटने शुक्राणू निवड, फलन (fertilization) आणि भ्रूण निर्मितीची प्रमुख कामे स्वतः केली आहेत. पण डॉक्टर अद्याप अंडाणू काढणे, गर्भाशयात भ्रूण बसवणे या टप्प्यांमध्ये थेट काम करतात.
या पद्धतीतून जन्मलेल्या बाळांच्या आरोग्याविषयी किंवा अनुवांशिक परिणामांबाबत दीर्घकालीन विदा अजून उपलब्ध नाही. ही प्रणाली अजून अमेरिकेत किंवा भारतात अधिकृतपणे मंजूर झालेली नाही. सध्या ती फक्त मर्यादित क्लिनिकल ट्रायल्समध्ये वापरली जात आहे.