आषाढी एकादश,
भक्त कासावीस,
विठ्ठलाची आस,
दर्शनाची ||
उचंबले मन,
हरपले भान,
लागलेच ध्यान,
पांडुरंग ||
वैजयंती सुगंध
तुटे भाव बंध,
वैष्णव ते धुंद,
नाचण्यात ||
टाळ मृदुंग धून,
विठ्ठला चे गुण,
भजन आतून,
कीर्तनात ||
नाचे वारकरी,
तुळशी हार करी,
भवतारु पारकरी,
कृपावंता ||
कसा भक्तीरंग,
बाजीगर दंग,
पाहता अभंग,
लेखणीत ||
प्रतिक्रिया
6 Jul 2025 - 8:54 am | माहितगार
सुरेख! पांडुरंग श्री हरी विठ्ठल!!
6 Jul 2025 - 12:40 pm | कर्नलतपस्वी
अनाजी पोचला
विठूच्या दरबारी
भरतभेटीचा सोहळा
रंगला समुद्र किनारी.....
कोण राम
कोण भरत
विठूला साकडे
अनाजी घालतो....
मस्तच.