गेले द्यायचे राहून.....,
म्हणत आयुष्य Mute केलं
प्रारब्ध, नशीब म्हणत .....
कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं
जगण्याची मजा काय विचारता?
स्वतःच्या मनाला mute करून,
दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय...
Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर
Google करून बघतोय!
घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं
मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं ....
इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत
Telling lies करतोय....
worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय.
म्हटलं तर successful...म्हटलं तर blissful
Stressful आयुष्य gressful करून जगतोय.
"आकांक्षाशी", break up झालं तरी heart अजून lite आहे
"अपेक्षा" ची साथ देत "आशा" जगायची hope अजून bright आहे.
प्रतिक्रिया
3 Jul 2025 - 3:08 am | nutanm
बरोबर आहे. अपेक्षान्ची साथ देत पेक्षा फारकत होत आशा जगायची होप ब्राईट आहे असे मला वैयक्तीक रित्या वाटते, वाटत रहाते. निवृत्तीच्या वयातही. २०२२ व २०२३ साली माझ्या नाही पण जवळच्या नात्यात अतिशय दु:खद प्रसन्ग घडूनही जगायची आशा ब्राईठ आहे. हे मनाचे आश्चर्य वाटत रहाते. व हा दैवाचा खेळ निराळा पण कसला हा जीवघेणा खेळ का घडतो का ती नियती क्रूर काळ, दैव म्हणून काही असेल तर का घडवते या प्रश्नाचे ऊत्तर शोधून शोधून थकायला होते पण ऊत्तर नाहीच मिळत.. का हे दैव , काळ ईतके कृर वागते काहीन्चया आयुष्यात . सर्वाच्या नाही व ज्यानी भोगलेय आधीच खूप वाईट गोष्टी त्याच्याच का खूप मागे लागते व ज्यान्चे छान आयुष्य त्यानाच भरभरुन ओतत रहाते असे का चा प्रश्नाचा भुन्गा पाठ सोडत नाही. बाकी तर नीट चाललेय.