जिज्ञासेच्या ज्योतीवर
फुंक अज्ञाताची येते
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
तर्कबुद्धी काजळते
कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
संज्ञा पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या
किती कोडी अवघड
चराचरात दाटती
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकती
अंतहीन अज्ञाताचे
प्रज्ञा करी दोन भाग
एक ज्ञेय- यत्नसाध्य
दुजा अज्ञेय- अथांग
प्रतिक्रिया
22 Jan 2025 - 6:30 pm | मिसळपाव
अंतू बर्व्याच्या शब्दात सांगायचं तर "लिखाणात मजा असते हां तुमच्या...... बर्याचदा!!" :-) अंतू बर्व्याला शोभेलशी तिरकस दाद आहे खरी पण ते "बर्याचदा" म्हंटलं कारण काही काही पार डोक्यावरून जातात. न आवडणं वेगळं आणि अर्थबोध न होणं वेगळं. असो. प्रत्येक लिखाण आवडेल अशी अपेक्षा करणं चूक आहे हे मान्य. तुम्ही आणि "प्राची अश्विनी" सुरेख काहीतरी सादर करता आणि चिकाटीने ईथे यायचं सार्थक होतं.
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
22 Jan 2025 - 10:14 pm | कर्नलतपस्वी
अज्ञात में ही ज्ञात छिपा हैं
जन्म के आगे मृत्यू लिखा हैं
ज्ञात है फिर भी अनभिज्ञ हैं
ज्ञात अज्ञातसे भिन्न नही हैं
23 Jan 2025 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ सहमत.
-दिलीप बिरुटे
23 Jan 2025 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
23 Jan 2025 - 10:56 am | विजुभाऊ
या वरून
"सृष्टी के पहले सत नही था. असत भी नही था......."
हा श्लोक आठवला.
25 Jan 2025 - 7:15 am | सोत्रि
विजुभौ,
जस्ट क्युरीयस, हा श्लोक तुम्हाला का आठवला?
- (अभ्यासू) सोकाजी
26 Jan 2025 - 8:15 pm | ज्ञानोबाचे पैजार
ऐसी श्रीमुखौनि अक्षरे । निघती ना जंव एकसरे ।
तंव अविद्येचे आंधारे। जावोचि लागे ।।
मग दिव्यचक्षु प्रगटला । तयां ज्ञानदृष्टि पाटा फुटला ।
ययापरि दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ।।
एकसरे ऐश्वर्य तेजे पाहले । तया चमत्काराचे एकार्णव जाहले ।
चित्त समाजी बुडोनि ठेले । विस्मयाचिया ।।
म्हणे केवढे गगन येथ होते। ते कवणे नेले पा केउते।
ती चराचरे महाभूतें। काय जाहलीं ।।
दिशांचे ठावही हारपले । अधोवं काय नेणो जाहले।
चेइलिया स्वप्न तैसे गेले। लोकाकार ।।
नानासूर्यतेजप्रतापे । सचंद्र तारागण जैसे लोपे ।
तैसी गिळिली विश्वरूपे । प्रपंच रचना ।।
तेव्हां मनासी मनपण न स्फुरे। बुद्धि आपणपे न सांवरे।
इंद्रियांचे रश्मी माघारे। हृदयवरी भरले ।।
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले। टकासी टक लागले।
जैसे मोहनास्त्र घातले । विचार जातां ।।
जैसे वर्षाकाळीचे मेघौडे । का महाप्रळयीचे तेज वाढे ।
तैसे आपणावीण कवणीकडे| नेदीचि उरो ।
रामकृष्ण हरी
पैजारबुवा,