सखे फेर धरू ...गरागर
जात्यावर दळण फिरे... गरागर
पीठाचे मांडे करू...भराभर
चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर
रानातून सरपण आणू... झरझरा
अशी पावले टाकू...झरझरा
रानात गवत पसरले...दूरवर
मागे फिरू ,घर राहिले...दूरवर
घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर
चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर
दाणे जवारीचे उडाले... घरभर
हस्ताची समृद्धी पसरू दे...घरदारावर
-भक्ती
(भोंडला लिहिण्याचा एक प्रयत्न)
प्रतिक्रिया
13 Oct 2024 - 11:08 am | मुक्त विहारि
नसेल तर
भोंडल्या साठी हे गाणे उत्तम आहे
14 Oct 2024 - 5:48 pm | श्वेता२४
अरडी ग बाई परडी चालीवर वाचले.