अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
14 May 2024 - 11:17 am

एक नवे वादळ आणू पाहात आहे
जीवनाला परखूं पाहात आहे
जे अपशब्दापायी बेचैनीत हरवले
त्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला

जीवनाशी प्रतिघात करता, जे थकले
अशासंगे हसत रहावे असे वाटे मला
अनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनो
उत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला

सरहद्दीवर शव वस्त्र ओढून आहेत उभे,
हिम्मत त्यांची वृद्धिंगत करावी वाटे मला
जरका एखादा मोका मिळू शकला मला,
मनुष्याचे दुःख विसरवीणे असे वाटे मला

कवीला जरका नसेल कसले सामर्थ्य,
शांती,सुरक्षा दुनियेत यावी असे वाटे मला
*

संस्कृती