त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या
आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे
विचार माझ्या मनात आले.
लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे.
जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत नाही असं कदापि होणार नाही.
आकाशाचा स्वच्छ निळा पोत पण मला आकर्षित करतो.
मला माझ्या शरीराला स्पर्श करणारा वारा जाणवतो. माझ्या मनात उद्भवलेली शांतता जाणवते.
अशा परिस्थितीत मी जीवनाच्या
संगीत सोहळ्यात एक विशिष्ट संगीत
ऐकत आहे असा मला भास झाल्यास त्यात नवल वाटण्यासारखं काहीच
नसावं.
पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्यामुळे गवत आणि झाडांचं डोलणं हे निसर्गाचं नृत्य -संगीत तर नाही ना? असा प्रश्न पडतो. निसर्गाचं हे सादरीकरण विलक्षण वाटतं.
हे सर्व पहाण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी जगात मोजकेच लोक असतात.हे पहाण्यासाठी जर आणखी कुणी भाग घेतला नाही
तर मग ह्या सर्व सादरीकरणाचा उपयोग तरी काय?
निसर्गाची सृष्टी, पाहण्यासाठी आहे,
आणि तिचं सौंदर्य कधीही दुर्लक्षित होऊ नये. असं मला वाटतं.
शांती मिळण्यासाठी आनंद निर्माण करण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी निसर्गाच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे.जीवनातील त्याच्या अदाकारी सोबत त्याच्या उपस्थित राहण्यावर मी विश्वास ठेवतो.
जगाच्या रचनेची जटिलता मला मोहित करते. मी पुन्हा आकाशाकडे पाहतो. मला पहाट जवळ आलेली दिसते. चंद्र आणि सूर्य चमकदार कामगिरी दाखवतात. जसा सूर्य एका टोकाला मावळतो तसतसे ते नारिंगी, पिवळे आणि लाल रंगाचे एकात्मतेत मिसळलेले किरण बाहेर उधळले जातात
सूर्य निघून जातो आणि अनुभवणाऱ्यांना वाटतं की कार्यक्रम जवळजवळ संपला आहे. पण नंतर चंद्र, थेट सूर्यापासून,आकाशाचा मंच घेतो.त्याचा तेजस्वी पांढरा प्रकाश पहाणाऱ्यांना तो प्रोत्साहित करतो.
सूर्य निघून गेल्यावर पक्षी त्यांच्या आवाजाला विश्रांती देतात.
झाडं आणि गवत त्यांचं गीत आणि नृत्य मंद करतात.
निसर्ग सौंदर्याने आणि त्याच्या रचनेने माझ्या आयुष्याचा ताबा अनेक वर्षे घेतला गेला आहे.असं मला वाटतं.
वेळ घालवण्यासाठी मी बाहेर गवतावर बसून निसर्गाचं निरीक्षण
करतो.मला त्यात आनंद आणि शांती
मिळते.
आजूबाजूला पाहिल्यावर मला प्रत्येक तपशील लक्षात येतो आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी एकटा असतो तेव्हा निसर्गाचं सौंदर्य पाहण्याकडे माझा कल असतोच असतो.
चंद्राचं दृश्य मला कल्पनेपेक्षा जास्त आनंदी करतं. त्याचं आल्हाददायक दृश्य पाहिल्यावर सूर्याच्या प्रखर तेजस्वी शक्तीपासून मला मुक्त
झाल्यासारखं वाटत असतं.
रात्रीची शांतता आणि आनंद मला मन:तृप्तीचा आश्वासन देतं.
चंद्र प्रकाशवर्षं दूर असला तरी
त्याच्याकडे टक लावून बघण्याची मनातली आसक्ती थांबत नाही. मला जो आनंद होतो तो शब्दात सांगता येणार नाही.
एखादा तारा जरा जास्तच उत्तेजित होऊन आपली लुकलूक वृद्धींगत
करतो,तेव्हा होणारा आनंद, लयबद्ध
संगीत ऐकताना होणाऱ्या आनंदा
सारखा भासतो.
आयुष्य कधीच थांबू नये असं वाटतं.
जसजसा रात्रीचा समय कमी कमी
होत जातो आणि काळ चालू राहतो तसतसं निसर्गाच्या सादरीकरणात आणखी एक भर पडते.
आता सूर्योदय झाला आहे आणि चंद्र काही अंतरावर मावळत असताना, सूर्य पुन्हा एकदा मंचावर येण्यासाठी उगवतो. पक्ष्यांचे स्वर माझ्या मनाला उजाळा देण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
मी खिडकीचा पडदा बाजूला केल्यावर सूर्याची किरणं माझ्या खिडकीतून प्रवेश करतात. आणि माझ्यावर प्रकाश पडतो.
आकाशात सर्व पोतांचे ढग तयार होतात.
निसर्ग आपल्यासाठी सादरीकरण
करत असतो, पण आपण त्याची कधीच प्रशंसा करत नाही. परंतु माझ्या जीवनावर नेहमीच निसर्गाचा सकारात्मक प्रभाव रहाणार आहे.हे
मला पक्कं ठाऊक आहे.