जैवज्ञाता श्लोक-१

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
19 Apr 2024 - 4:57 pm

सध्या मी एक कोर्स करत आहे.त्यात मी शांतीसाठी लिखाण करते आणि लिखाणाच्या फ्लोमध्ये एकरूप होते आणि बाकी सर्व भूत-भविष्य विसरते,असे नमूद केले आहे.तेव्हा मिळालेल्या सूचनेनुसार गीतेतील श्लोक वाचून समजून मी अर्जूनाला कसे समजवले असते.याप्रमाणे लिहायचे असं सुचलं.आधी मी केवळ मतितार्थ लिहिणार होते.बाजूलाच प्रगोचा अफलातून धागा आहे.तर म्हटलं आपणही जरा विज्ञान-अध्यात्म ब्लेंड करावा..
अल्प प्रयत्न...चुभूद्या... काही सजेशन असेल तर त्याही द्याव्या.

सांख्ययोग
अध्याय दुसरा

सञ्जय उवाच |
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् |
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन: || 1||
श्रीभगवानुवाच |
कुतस्वा कश्मलमिदं विषयमे समुपस्थितम् |
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकर्मर्जुन || 2||

अर्जुन आणि कर्माचा त्याग केल्यामुळे हताश झाला आहे .अत्यंत क्षीण असे अश्रू सागर त्याच्या डोळ्यात करूणपणे व्याकूळतेने दाटले आहेत. अशा शोकाकुल अर्जुनाला मधू दानव मारक 'मधुसूदन' श्रीकृष्ण सांगत आहेत. अर्जुना इतका गोंधळलेला पणा आला तरी कुठून? या संकट वेळी भ्रमाने कुठून ,कसे तुला घेरले आहे. असे अनार्य वागणे तुला किंवा अशा गोंधळलेल्या व्यक्तीला स्वर्गाकडे नाही तर अपमानात लोटणार आहे.

जैवज्ञाता श्लोक -१

सर्प त्याने काय| भ्रमर भांडे शरीर भार||
मजला कोडे पडे|केवळ कीटका हा अधिकार?||१||
विकारांचा जडवादी| शरीर वाहे अपरांपर||
काळे,पेशी विघटन |जनुक घडे नित्य नवे||२||
प्राण उडाला| देह जळाला नश्वर|
आत्मा करी धारण| नवा साज अनंतवार ||३||
-भक्ती

अर्जुनाची ही अवस्था शरीर विकारांच्या अतिप्रेमामुळे उद्भवली आहे शरीर नश्वर याचा विश्वास शरीर नश्वर याचा विसर पडला आहे .सद्यस्थितीतील मोहाच्या क्षणी क्षत्रिय कर्म त्याला गोंधळात पाडत आहे. योग्य दिशेने येणाऱ्या मार्गात मान आहे. कर्म त्यागात सदैव अपमान आहे ही तो विसरला आहे. या देहाचा मोह धारण करण्याऐवजी आत्मा प्रवासाचा त्याने स्वीकार करावा. आत्म्याला विनाकारण चिंतेत टाकत हाताश होऊ नये. जसे सर्प कात टाकून, भ्रमर जुना देह त्याग करत, या जन्मातच शरीर मोहाचा त्याग करतात. या कीटकांना हा अधिकार आहे. असे तू पाहताना हेही समज शरीरात सतत आणि जुन्या पेशींपासून नवीन पेशी तयार होतात. एका डी एन ए पासून दुसरा डीएनए सतत तयार होत राहतात. तसेच शरीर नष्ट झाल्यावर आत्मा नवे शरीर आपल्या नव्या साजाप्रमाणे धारण करत राहतो अनंत काळापर्यंत आणि अनंत वेळी!
भक्ती.

मुक्तक

प्रतिक्रिया

सर्प त्यागे कात | भ्रमर सांडे शरीर भार||
*असे वाचा..
संपादकांना विनंती असा बदल करावा.जमल्यास हा प्रतिसाद डिलीट करावा.

आर्या१२३'s picture

20 Apr 2024 - 12:46 pm | आर्या१२३

अफाट आहे हे!!
या श्लोकाचा अर्थ सांगून ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!

विअर्ड विक्स's picture

20 Apr 2024 - 5:43 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला. यापूर्वीचे तुमचे लेखन वाचले आहे . म्हणून एक नम्र सूचना , काव्य हे कधीपण मीटर मध्ये बसवावे लागते त्यामुळे स्वरचित श्लोक चार चरणात बसावावा सध्या ६ ओळी झाल्यात . ( चारोळीत बसला तर श्राव्य होईल ).