पाकिस्तान -९

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
1 Apr 2024 - 8:11 pm

.
“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.
युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या. कोणाला किती मिळेल हे तिथेच ठरवले गेले असते. जसे कच्छमध्ये घडले. कच्छमधील सुरुवातीच्या लढाईनंतर भारतीय सैन्याने त्या दलदलीत पुढे जाणे आवश्यक समजले नाही. भारतीय लष्कर घाबरून पळून गेल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी युद्धबंदी केली आणि भारताने लढाई न चालू ठेवता जवळजवळ संपूर्ण कच्छचे रण मिळवले. पाकिस्तानसाठी हा केवळ वृत्तपत्रांचा विजय ठरला. पण पाकिस्तानने या युद्धाला आपला आधार मानले काश्मीरमध्येही अशीच परिस्थिती असेल तर कदाचित पुन्हा युद्धविराम होईल, आंतरराष्ट्रीय संस्था हस्तक्षेप करतील आणि यावेळीहा हा वाद संयुक्त राष्ट्र सोडवतील, असा विचार केला. केवळ अमेरिका आणि चीनच नाही तर सोव्हिएत युनियनही आपल्याला साथ देईल असा विश्वासही त्यांना होता. झुल्फिकार अली भुट्टो हे केवळ अर्धे कम्युनिस्टच नव्हते तर त्यांचे सोव्हिएतशीही चांगले संबंधं होते, जे संबंध पूढे ताश्कंदमध्ये स्पष्टपणे दिसले.
असे म्हणता येईल की कबड्डीच्या खेळाप्रमाणेच पाकिस्तान भारताच्या बाजूला येऊन हात लावून गेला असता तरीही संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप केला असता. काश्मीरचा पुनर्विचार झाला असता आणि निश्चितच असा काही निर्णय घेतला गेला असता ज्यामुळे पाकिस्तानला कश्मीरची जमीन मिळाली असती.
अनेक शतकांपूर्वी मुस्लिमांनी आफ्रिकेतून जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करून पोर्तुगाल आणि स्पेनवर हल्ला केला होता. अशीच काहीशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न होता. त्यांना कोणतेही मोठे युद्ध लढावे लागनार नव्हते, फक्त गुप्तपणे काश्मीरमध्ये घुसून तेथील लोकांना पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करायचे होते.
ज्याला पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणतात तिया पाकव्याप्त कश्मिरात काश्मिरी लोकांचे कौटुंबिक संबंध आहेत, माझे काही आझाद काश्मिरी ओळखीचे आहेत ज्यांचे भारतीय काश्मीरमध्ये काका किंवा काकू आहेत. त्यांची भाषा आणि संस्कृतीही एकच होती. फाळणीपूर्वी ते एकाच छताखाली राहत होते. फाळणीनंतर ते अनेकदा सीमेवर भेटत असत. आता सीमेवर एवढा कॉरिडॉर आहे की फक्त आरडाओरडा करूनच संवाद साधता येतो आणि अनेक ठिकाणी दुर्बिणीनेच नीट बघता येते.
ऑपरेशन जिब्राल्टरनुसार, सुमारे पंचवीस हजार मुजाहिदीन (गनीमी काव्यावाले धर्मयोध्दे) तयार केले जाणार होते, जे दहा तुकड्यांमध्ये विभागले जातील आणि काश्मीरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करतील. त्यांनी शस्त्रे बाळगली पाहीजेत असे गरजेचे नव्हते.ते प्रचाराचे साहित्य ठेवनार होते जसे पोस्टर्स, मासिके, कॅसेट, टेपरेकॉर्डर इ. ते काश्मिरींमध्ये वाटनार होते आणि रस्त्यांवर स्वत:चे आझाद काश्मीर कार्यालय उभारनार होते. हे सर्व जुलै-ऑगस्ट 1965 मध्ये सुरू होनार होते. ही देखील सीआयएची युक्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांनी यापूर्वी क्युबा, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये अशीच युक्ती वापरली होती.
घटनादुरुस्तीनंतर काश्मीर अस्वस्थ झाले होते यात शंका नाही. स्वायत्तता गमावल्यानंतर काश्मिरींना विश्वासघात झाल्यासारखे वाटले आणि त्यांना चिथावणी देणे सोपे होते. विशेषत: जेव्हा 1963 मध्ये हजरतबल दर्ग्यातून मू-ए-मुकाद्दश (हजरत मुहम्मद यांचे केस) चोरीला गेले तेव्हा हजारो काश्मिरी रस्त्यावर आले. त्यावेळी शेख अब्दुल्ला स्वत: नाराज होते. पण पाकिस्तानातून काही हजार लोक येऊन संपूर्ण काश्मीरचे ‘ब्रेन-वॉश’ करतील, हे इतकेही सोपे नव्हते. याउलट त्यांनी भारतीय लष्करासाठी माहिती देणारे म्हणूनही काम केले. ऑपरेशन जिब्राल्टर इतके गुप्त राहिले की पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि मंत्र्यांना याची माहिती दिली गेली नाही आणि ही बातमी भारताच्या संसदेत पोहोचली. ही पाकिस्तानची अशी घोडचूक होती की त्यांच्यासाठी काश्मीरचे स्वप्नच स्वप्नच राहिले. बऱ्याच अंशी ही चूक झुल्फिकार अली भुत्तो यांचीही होती. तो ऑगस्ट महिना होता, जेव्हा दोन्ही देशांत स्वातंत्र्याचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू होती... (क्रमशः) मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

इतिहास

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Apr 2024 - 9:21 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

निनाद's picture

2 Apr 2024 - 4:13 am | निनाद

लेख ठीक आहे. पण...

ठेवनार

सारखे खड्यासारखे लागत रहातात. मग लेख वाचण्याचा उत्साह कमी होतो.

न आणि ण कधी वापरायचा याचा एक सोपा कयास - (आणि ळ) अक्षराच्या आगे-मागे आल्यास न ऐवजी वापरावा.
जसे: रण, कारण, मरण, सारण, पूरण इत्यादी.

त्याच प्रमाणे ठेवणार असणार, करणार, उभारणार, होणार इत्यादी.

बाकी बहुतेक ठिकाणी अक्षर वापरावे. जसे निलाक्षी, नीलकांत, निळावंती, नल -दमयंती इत्यादी.
(वर कयास म्हंटले आहे नियम नाही. कारण काही शब्द आहेत जसे नर, नारी, वनारी, वानर, नारायण, नरपुंगव, येथे हेच अक्षर वापरले जाते.)

आशा आहे याचा उपयोग होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2024 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

diggi12's picture

4 Apr 2024 - 10:43 am | diggi12

पुभाप्र

नठ्यारा's picture

4 Apr 2024 - 9:36 pm | नठ्यारा

ते प्रचाराचे साहित्य ठेवनार होते जसे पोस्टर्स, मासिके, कॅसेट, टेपरेकॉर्डर इ. ते काश्मिरींमध्ये वाटनार होते आणि रस्त्यांवर स्वत:चे आझाद काश्मीर कार्यालय उभारनार होते. हे सर्व जुलै-ऑगस्ट 1965 मध्ये सुरू होनार होते. ही देखील सीआयएची युक्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांनी यापूर्वी क्युबा, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये अशीच युक्ती वापरली होती.

प्रचाराच्या जोरावर काश्मीर पाकिस्तानात विलीन करून घ्यायची जिब्राल्टरी युक्ती आता पाकिस्तानावरच उलटली आहे. आज पाकव्याप्त काश्मिरात ( हुंझा, स्कारदू, गिलगीत, बालतीस्थान ) भारतीय काश्मीरातल्या श्रीनगरच्या प्रगतीचं प्रचंड कौतुक चाललं आहे. पाकिस्तानास तिथे उघडपणे आक्रमक म्हंटलं जातं. या प्रदेशातली जनता भारतात पूर्णपणे विलीन होण्यास उत्सुक आहे. लवकरंच हा भाग पूर्णपणे भारतात सामील होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. एकंदरीत गुरूची विद्या गुरूलाच फळली म्हणायची.

-नाठाळ नठ्या