काँग्रेसला गळती..

बाजीगर's picture
बाजीगर in राजकारण
13 Feb 2024 - 8:04 am

काँग्रेसला गळती...
भाजपाकडे पळती ।।

चव्हाण अशोक
भाजपाकडे रोख ।।

आदर्श इमारतीत
घेतली सदनिका
आता जा जेल, वा
सत्ता मदनिका ।।

हर भ्रष्ट कृपाशंकर
धर भाजपा बंकर ।।

भाजपाकडे रीघ
बांध बो-या नीघ ।।

काँग्रेस बुडते जहाज
उंदीर उड्या पहाच !!

भाजपात माजले
असे आयाराम
निष्टावंत सतरंजी
उचला काम ।।

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2024 - 11:23 am | अमरेंद्र बाहुबली

काॅंग्रेस स्वच्छ.
भाजपी ते भ्रष्ट
निर्लज्ज ते भाजपी
करती भरती।।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2024 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्तेसाठी भाजपाने पक्षाची हागनदारी करुन ठेवली.

-दिलीप बिरुटे

सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपामधे गेल्याने कॉग्रेस जरी दोन खासदारांचा असला तरी २ खासदारांच्या जनसंघाप्रमाणे स्वच्छ असणार हे नक्की. आणि ते पंडीत नेहरूंच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा मनापासून प्रयत्न करणार.

भुके न्ंगे रहेंगे... राहुलजी को जिताएंगे !!

कर्नलतपस्वी's picture

13 Feb 2024 - 3:11 pm | कर्नलतपस्वी

XXXचं फुटलं भांडं
म्हणून हातातला हात सोडला
बुडत्याचा पाय खोलात
म्हणून कमळाचा दांडा धरला

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2024 - 4:18 pm | अमरेंद्र बाहुबली

श्शी! किती अश्लील लिहीतात कर्नल साहेब :)

नठ्यारा's picture

13 Feb 2024 - 7:53 pm | नठ्यारा

काहीही हं अ.बा. कमळाचा दांडा लिहिलंय. कमळीचा नाय.
-ना.न.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Feb 2024 - 9:45 am | राजेंद्र मेहेंदळे

गहन विचारात पडलेली स्मायली :)

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2024 - 11:19 am | अमरेंद्र बाहुबली

तेच लिहीनार होतो. पण आपण पडलो भारतीय. विदेशात आता तंत्रद्न्याने कुठेही काहीही जोडता येते. त्यामुळे असेल कदाचीत … :)

कर्नलतपस्वी's picture

14 Feb 2024 - 10:41 pm | कर्नलतपस्वी

सब्जेक्टीव्ह...

जैसी ज्याची दृष्टी
तैसी दिसे सृष्टी

यात माझा काहीच दोष नाही.

सहमत आहे....

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2024 - 9:34 am | चौथा कोनाडा

भाजपात माजले
असे आयाराम
निष्टावंत सतरंजी
उचला काम ।।

इसें कहतें हैं नीती .. जो सबको समझमें नही आती :)

मुक्त विहारि's picture

15 Feb 2024 - 9:46 am | मुक्त विहारि

राम मंदिर तर झाले.

काशी आणि मथुरा बाकी आहेत.

UCC तर होईलच.

CAA आणि NRC बाकी आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2024 - 11:21 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद त्या मुहम्मद नावाच्या व्यक्तिचे ज्याने तिथे मंदिरच होते ह्याचे पुरावे शोधले, नी रामलल्ला समीतीचे ज्यांनी इतके वर्षे न्यायलयीन लढा दिला.

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2024 - 9:42 am | चौथा कोनाडा

पटलं तर व्हय म्हना ... नाय त र ...

भाजपात होत असलेल्या अशोक चव्हाण आणि इतरांच्या  इनकमिंग बद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे ह्याच विषयावर सुजित भोगले यांचे पटणारे मत

 "चक्रवर्ती राजा अश्वमेध यज्ञ आणि लोकशाही व्यवस्था" या त्यांच्या लेखाचा हा सारांश जुन्या काळात चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न बघणारा राज्यकर्ता अश्वमेध यज्ञ आयोजित करत असे. मग त्याचा अश्वमेधाचा घोडा अडवून त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे किंवा त्याचे मांडलिकत्व पत्करणे इतके दोनच पर्याय अन्य राजांच्या समोर असत.या पद्धतीने तो आपले बळ वाढवत नेईमग अश्याच एखाद्या मोठ्या चक्रवर्ती राजाला आव्हान देऊन त्याला पराभूत केले जाई.आता शरण येणाऱ्या राजांना काही बाबीत अभय प्रदान केले जाई.त्यांच्या काही चुकांकडे दोषांकडे दुर्लक्ष केले जाई कारण अंतिम हेतू त्यांच्या शक्तीचा वापर करत चक्रवर्ती राजा होणे आणि स्वधर्म स्थापना करणे हा असे.राजेशाही संपून लोकशाही आली असली तरीही राजनीतीचे नियम बदलत नसतात. हे सामान्य लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे.

सरळ मैदानात लढणारा राजा अश्वमेधाचा घोडा सोडून अन्य राजांना शरण आणतो.परंतु कुवत नसणारा राजा शेजारील राज्ये आतून खिळखिळी करत स्वतःची शक्ती दृढ करतो,स्वतःच्या अराजकाविरुद्धबंड उभे रहाणार नाही याची काळजी घेतो.२०२४ ची लोकसभा निवडणुकीतील संघर्ष हा त्या पातळीवर पोचलेला आहे. कॉंग्रेस हा पक्ष किंवा विचार नसून कोन्ग्रेस ही एक प्रवृत्ती आहे.कोन्ग्रेस हा ब्रिटीशांचा मुखवटा होता.हा मुखवटा वापरत ब्रिटीश राज्य करत होते आणि आपले सामान्य नागरिकमात्र कोन्ग्रेस ब्रिटिशांशी लढते आहे या भ्रमात होते.सावरकर आणि प्रत्येक क्रांतिकारकाचे लचके तोडणारी ब्रिटीश राजवट कोन्ग्रेसी नेत्यांच्या प्रती अत्यंत मऊ होती याचे कारण कॉंग्रेस ब्रिटीश एजंट होती हेच होते.कोन्ग्रेस होती म्हणून १८५७ नंतर ब्रिटिशांना या देशात रक्तरंजित संघर्ष करायचवेळ आली नाही. ज्या वेळेस ती परिस्थिती उद्भवते आहे वाटले ब्रिटिशांनी कॉंग्रेस च्या मदतीने देशाचे तुकडे केले. तरीही दुसऱ्या महायुद्धामुळे जर्जर झालेल्या ब्रिटिशांना आझाद हिंद फौज आणि नाविक संपामुळे राज्य करणे अशक्य होऊन बसले त्यावेळी त्यांनी देश सोडला. सोडताना सुद्धा जितक्या पाचरीमारता येतील तितक्या मारूनच ते इथून गेले.कॉंग्रेसच्या हातात सत्ता आली.

पण सतत एजंट म्हणून काम केलेला माणूस कंपनीचा मालक झाल्यावर ज्या पध्दतीने काम करेल त्या पद्धतीने कॉंग्रेस ने कारभार सुरु केला.कॉंग्रेस ने आपली शक्ती आणि आपली अनियंत्रित सत्ता संपते आहे असा संशय आल्यावरप्रत्येक वेळेस ब्रिटीशांच्या पद्धतीने आपल्याच देशात फुटीरतावाद पेरत,पोसत आपली खुर्ची राखण्यात धन्यता बाळगली आहे.बांगलादेश निर्माण होण्यात कॉंग्रेसचा वाटा फारसा नाही पण त्यावेळी घुसलेली जनता कॉंग्रेस ने देशाबाहेर कधीच काढली नाही कारण हे जिवंत बॉम्ब कॉंग्रेसला आपली राजवट स्थिरकरायला कायमच हवे होते.जो गोष्ट बांगलादेशी मुस्लिमांची तीच गोष्ट नक्षलींची यांना जाणीवपूर्वक पोसले आहे दुर्लक्ष करत वाढू दिले आहेत. हे भविष्यातील बॉम्ब आहेत. याच पद्धतीने रोहिंग्या घुसवले आहेत... खलिस्तान चे भुत कॉंग्रेसनेच उभे केले होते. आज आप त्याला खतपाणी घालत आहे.आपल्या देशात या क्षणी, या देशावर आणि हिंदू धर्मावर शून्य प्रेम असणारे आणि थोडेफार पैसे मिळाले तर कत्तल सुरु करू शकणारे कमीतकमी ७-८ कोटी बेकायदेशीर रित्या घुसलेले शरणार्थी मुसलमान आहेत. आपल्या देशात याक्षणी, कमीत कमी १-२ लाख आदिवासी नक्षली म्हणून रक्तपात घडवायला सुसज्ज आहेत.या सर्वांना लागणारी आर्थिक ताकद द्यायला चर्चेस आणि मशिदी सुसज्ज आहेत.आणि अश्या दारूच्या कोठारावर बसून आपण लोकशाही नावाची बिडी फुंकत नैतिकतेचे ज्ञान xxx आहोत...

राहुल गांधी काढत असलेली यात्रा हे उघड उघड देशाचे तुकडे करण्यास प्रोत्साहन देणारी यात्रा आहे हे स्पष्ट दिसते आहे.त्याची पावले,त्याचे वर्तन तसेच सुरु आहे.या सगळ्याचा तुम्हाला राजकीय पद्धतीनेच प्रतिवाद करावा लागतो.चुकूनही त्याला अटक करणे किंवा यात्रेला प्रतिरोध करणे म्हणजे त्याला भावनात्मक आवाहन करण्याची संधी देणे आहे.कॉंग्रेस चा खेळ स्पष्ट आहे.राहुल गांधी परदेशात जाऊन भारताबद्दल जे बोलतोयते त्याला इथे घडवायचे आहे.उद्या इथल्या रोहीन्ग्यांनी दंगली पेटवल्या तर ते रोहिंग्या आहेत का स्थानिक मुस्लीम हे कुणाला आणि कसे कळणार आहे ?यात प्राणहानी झाली की भारतात हिंदू लोक दंगली करून मुस्लिमांचा वंशसंहार करणार आहेत हे मी म्हणत होतो तसेच घडते आहे म्हणून बोंबलायला राहुल गांधीमोकळा...हे सगळे घडू द्यायचे नसेल तर काय करता येईल ?राहुल गांधी ला अटक करा.पण याचा परिणाम त्याला सहानुभूती मिळणे आणि तो निवडणूक जिंकणे यात होऊ शकतो..निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर हाकलू पण शकत नाहीत..त्याचा पण विरुद्ध प्रचार होऊ शकतो.आणि सगळ्यात महत्वाचे तथ्य अजूनही कॉंग्रेस या पक्षाचा स्वतःचा जनाधार२५ % नक्की आहे.भाजपाचा प्रत्येक विजय हा ३-४ % टक्क्यांच्या vote swing ने झालेला आहे.जर मागच्या दाराने घुसवलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदार झाले असतील तर त्यांची आणि अन्य मते मिळून आणि ईंडी आघाडी मजबूत झाली तरहा swing उलट फिरवणे अशक्य नाही..

.मग या सगळ्यात एकच मार्ग शिल्लक उरतो.. तो म्हणजे उदार मतवादी हिंदू असणारे आणि जनाधार असणारे काँग्रेसी नेते फोडून त्यांना आपल्या पक्षात घेणे.ते भ्रष्ट असतील का ? निश्चित असतील, कॉंग्रेस मध्ये कोरडा व्यक्ती मोठा होऊच शकत नाही.त्याने पैसे खाल्लेच पाहिजेत आणि त्याचा हिस्सा वरती दिलाच पाहिजे.पण ते जर आपल्याकडे ओढले तर काय फायदा होईल ?देशभर स्थानिक पातळीवर काही कांड करण्याचे स्वप्न कॉंग्रेस बघत असेल तर ते या नेत्यांच्या मार्फत करणार.मग हे नेतेच आपल्याकडे आले तर कोणतेही षडयंत्र यशस्वी होण्यासाठी लागणाराresource मिळणार नाही.सध्या केली जाणारी incoming या साठी सुरु आहे केवळ आणि केवळ यासाठी सुरु आहे.

हिंदू राष्ट्राचा अश्वमेध यशस्वी व्हायचा असेल ब्रिटीश एजंट असलेल्या कॉंग्रेसला संपवायचे असेल तर शरण येणाऱ्या प्रत्येक राजाला आपल्याला त्याच्या गुणदोषांच्यासकट स्वीकारावे लागणार आहे.याला पर्याय नाही.घराणेशाही वाले गावठी सोरोस प्रत्येक राज्यात आहेत,केंद्रातील सोरोस राजमाता आहे आणि वरून यांच्या जोडीला पैसे ओतणारा आंतरराष्ट्रीय सोरोस तर आहेच आहे.इतक्या सगळ्यांनी ओतलेल्या पैशांच्या बळावर या देशात काहीही कांड घडवता येऊ शकते हे लक्षात घ्या.. आपला संपूर्ण मिडियात्यांचा बटिक आहे हे लक्षात घ्या. हाच मिडिया कोणतीही बातमी आणि कोणतेही narrative क्षणात देशभर पसरवू शकतो हे लक्षात घ्या.या प्रत्येकाला वेसण घालणारे कायदे आपल्याकडे अस्तित्वात नाहीत हे लक्षात घ्या.त्यामुळे या तडजोडी अपरिहार्य आहेत.एकनाथ शिंदे,अजित दादा आणि नवरत्ने,अशोक चव्हाण,विश्वजित कदम, अमित देशमुख हे आणि असे अनेक नेते भ्रष्ट असतील पण ते राष्ट्रद्रोही नाहीत आणि आपापल्या सोरोसचे ऐकून ते कांड घडवणार नाहीत किंबहुना ते कांड घडवण्यात रस बाळगून नाहीत याची खात्री करून त्यांना घेतले जात आहे हे समजून घ्या.जो माणूस काश्मीर मुक्त करतो. राम मंदिर बनवतो. जो माणूस मदिनेत हिंदू स्त्री सन्मानाने फिरू शकेल अशी परिस्थिती निर्माण करतो. जो माणूस अरबी राष्ट्रात हिंदू मंदिरे उभी करतो त्याच्यावर शंका घेऊ नका.फुकाची नैतिकता तुम्हाला उध्वस्त करते.परिस्थितीनुरूप आपल्याला लवचिक व्हावे लागते.श्रीकृष्ण सुद्धा वेळ आल्यावर रणछोडदास होतो हे समजून घ्या...बघा शांतपणे विचार करा...

- सुजीत भोगले

तळटीप- ताजी बातमी- जरांगे पाटील आणि टिकैत यांची भेट झाली आहे.

सौजन्य : कायप्पा विद्यापीठ

सहमत आहे ...

CAA, NRC आणि UCC, हे प्रमूख ध्येय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2024 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला नम्र भक्त सुजीत भोगले असं पाहिजे होतं शेवटी.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2024 - 11:22 am | अमरेंद्र बाहुबली

पांचट, दळभद्री नी भ्रष्टाचार समर्थक लेख.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2024 - 11:22 am | अमरेंद्र बाहुबली

पांचट, दळभद्री नी भ्रष्टाचार समर्थक लेख.