पाकिस्तान-२

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
10 Feb 2024 - 2:21 pm

.
शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं?
हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय.
शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता. जर दोन धर्म गेल्या अनेक शतकांमध्ये एकत्र राहण्यासाठी कधीही योग्य नव्हते, तर मग फाळणी आधीच झाली असती. असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की पूर्वी मुघल राजवट होती, त्यामुळे अल्पसंख्याक असूनही मुस्लिमांना वेगळ्या देशाची गरज नव्हती.
पण, हा युक्तिवाद भारतापुरता मर्यादित ठेवून चालनार नाही. जगात काय चालले होते? प्रत्येकजण अचानक स्वतःची हक्काची का शोधू लागला होता?
पहिल्या महायुद्धानंतर, साम्यवाद आणि नाझीवाद दोन्ही उदयास आले. दोन्ही कल्पना भारतात आल्या आणि दोन्हींचा भारतावर प्रभाव पडला.
हिटलरची नवी उंची गाठत असताना 1930 पासून 'टू नेशन थिअरी' उघडपणे समोर येऊ लागली.जगभर ‘पितृभूमी’ (फादरलॅंड) आणि ‘शुद्ध वंश’ असे शब्द जिभेवर येऊ लागले. 'पाकिस्तान' या शब्दाचे निर्माते चौधरी रहमत अली यांच्यावर नाझीवादाचा इतका प्रभाव होता की त्यांनी हिटलरची अनेक वाक्ये तोंडपाठ केली होती. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाला त्याच वर्षी त्याने शुध्द मुस्लीम देश पाकिस्तान असे पत्रकं वाटायला सुरुवात केली होती.
आपल्या वंशांची, आपल्या धर्मांची, आपल्या हजारो वर्षांच्या पूर्वजांची भूमी शोधून लोक एकत्र करणे, हिंदुत्व या शब्दाद्वारे हिंदूंना एकत्र करणे, मुस्लिम लीगच्या माध्यमातून मुस्लिमांना एकत्र करणे, ज्यूंचा झिओनिझम. युरोपमधील विविध ख्रिश्चन गटांचे जर्मन, पोल, रोमनी, फ्रेंच इ. देशात विभागले जाणे, इतर वंशीयांना देशातून बाहेर काढणे, सर्व काही एकाच वेळी सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धाने शिखर गाठले. केवळ युरोपातच नाही, तर भारतासारख्या देशातही.
रहमत अली हा तरुण रक्ताचा होता, त्याच्यावर हिटलरचा प्रभाव पडला, यात काहीही आश्चर्य नाही. त्यावेळी जर्मनी आणि हिटलरच उगवता सूर्य होता. मोहम्मद अली जिना यांच्या विचारांमध्ये तफावत आहे. एकीकडे इस्लाम देशाची इच्छा आहे, तर दुसरीकडे इंग्रज गेल्यानंतर मुस्लिमांचे काय होईल, अशी भीतीही आहे. जशी युरोपातील ज्यूंची परिस्थिती झाली होती तशीच भारतात मुस्लिमांची होईल का? ज्यूंना त्यांची जमीन शोधली, पण भारतीय मुस्लिम कुठे जाणार? त्यांची जन्मभूमी कुठे आहे? ते पिढ्यानपिढ्या भारतीय आहेत.
भीतीने झाले की बळजबरी झाले. युद्धाने झाले की कूटनीतीने घडले. अवघ्या दोन दशकांत असे कापून-छाटून, वंश-धर्मावर आधारित दोन देश निर्माण झाले. युद्धानंतर पश्चिम आशियाच्या एका सीमेवर ज्यूंचा देश इस्रायल आणि दुसऱ्या सीमेवर मुस्लिमांचा देश पाकिस्तान बनला.
काही देश असे राहीले ज्यात नाझीवादाचे भूत कुठेतरी कोपऱ्यात लपून राहिले. जिथे लोकशाही प्रबळ राहीली. खेदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान त्यातला एक नव्हता, ज्याची किंमत त्याला पुन्हा पुन्हा चुकवावी लागली. लियाकत अली खानना ज्या बागेत गोळ्या घातल्या गेल्या त्या कंपनी बागेचे नाव लियाकत बाग ठेवले गेले. योगायोगाने पाच दशकांनंतर बेनझीर भुट्टो यांचीही याच बागेत हत्या झाली. लियाकत अली खान यांना एका अफगाण व्यक्तीने गोळ्या घातल्या, जो पाकिस्तानमध्ये राजकीय निर्वासित होता. तो सरकारी खर्चाने अबोटाबादमध्ये त्याच भागात राहत होता, ज्या भागात लादेनला काही वर्षांनंतर आश्रय देण्यात आला.
त्याला पकडन्या पुर्वीच त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुख्य पोलिस अधिकाऱ्याच्या विमानाचा अपघात झाला (किंवा केला गेला.) असा अंदाज वर्तवला जातो की अमेरीका-सोव्हिएत शीतयुद्धातील पहिली गोळी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत खान यांना लागली, ही हत्या हा एक आंतरराष्ट्रीय कट होता, ज्यामध्ये ब्रिटिशांचाही सहभाग होता ज्यांची पाकिस्तानवरील प्रशासकीय पकड संपलेली नव्हती. मात्र, स्कॉटलंड यार्डच्या टीमला पाचारण करून तपास केला असता, कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.
एकीकडे लियाकत अली खान यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्याकडे वीस अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मागितली होती, तर दुसरीकडे त्यांना सोव्हिएत युनियनला भेट देण्याची घाई झाली होती. त्यांची हत्या हा 'टर्निंग पॉइंट' ठरला, त्यानंतर सोव्हिएत हा पर्याय संपला. पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेच्या तावडीत आला. हळूहळू स्वतःच्या सैन्याच्या तावडीत.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

इतिहास

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

11 Feb 2024 - 10:46 am | टर्मीनेटर

मस्त चालू आहे मालिका, बऱ्याच नवीन गोष्टी समजत आहेत 👍

अवांतर :

“हिटलरची नवी उंची गाठत असताना 1930 पासून 'टू नेशन थिअरी' उघडपणे समोर येऊ लागली.जगभर ‘पितृभूमी’ (फादरलॅंड) आणि ‘शुद्ध वंश’ असे शब्द जिभेवर येऊ लागले. 'पाकिस्तान' या शब्दाचे निर्माते चौधरी रहमत अली यांच्यावर नाझीवादाचा इतका प्रभाव होता की त्यांनी हिटलरची अनेक वाक्ये तोंडपाठ केली होती."

त्याकाळी नाझीवादाचा प्रभाव युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात व्यापक प्रमाणात पडलेला इतिहासात पहायला मिळतो.
जगभरातल्या इस्लामी दहशतवादी संघटनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध जोडला जाणारी, एकप्रकारे त्यांची `मातृसंघटना´ म्हंटली जाणाऱ्या 1928 साली इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या `मुस्लिम ब्रदरहूड´ ह्या संघटनेचे अनेक संस्थापक आणि सदस्यही नाझीवादाने भारावलेले होते.
ओसामा बिन लादेनला 'अल कायदा´ स्थापन करण्याची प्रेरणा देखील `मुस्लिम ब्रदरहूड´ ह्या संघटनेचे नाझीवादाचा आणि हिटलरच्या ‘शुद्ध वंश’ विषयक विचारांचा पगडा असलेला इस्लामी विचारवंत, कवी, लेखक ‘सैद कुतब' ह्या सदस्याची पुस्तके आणि त्याच्या विचारांतून मिळाली होती.

टर्मीनेटर,

तुमच्याशी एकदम सहमत आहे. मुस्लीम ब्रदरहूडचा इस्लामशी कसलाही संबंध नाही. तो नाझीवाद वा वंशवाद याच्याशी जास्त संबंध आहे. मुस्लिमांना छूत्या बनवण्यासाठी मुस्लीम ब्रदरहूड स्थापन केली आहे.

मुस्लीम ब्रदरहूडने इराणच्या इस्लामिक क्रांतीस मदत केली. ही क्रांती सोव्हियेत प्ररूपावर आधारित आहे.

भारतात मुस्लीम व कम्युनिस्ट संघटना एकमेकांचे स्नेही का आहेत हे कळून येतं.

-नाठाळ नठ्या

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Feb 2024 - 12:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण जरा मोठे भाग लिहिता येतील का? वाचायला सुरुवात करुन रंगात येतानाच लेख संपतोय असे वाटते. शिवाय जमल्यास या नेत्यांची (उदा. लियाकत खान) चित्रेही डकवता येतील. ती पब्लिकली उपलब्ध असतीलच. त्यामुळे कुठुनही सरळ लिंक कॉपी करुन ईथे देता येईल. शिवाय संदर्भासाठी नकाशे (तेही पब्लिकली उपलब्ध असतील कदाचित) देता आले तर पहा असे सुचवतो. आणि खाली बसतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Feb 2024 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली

पण जरा मोठे भाग लिहिता येतील का? ह्यात समस्या अशी आहे की प्रत्येक भाग हा काहीतरी वेगळी माहीती देतो, दोन भाग एकत्र जोडले तर एकमेकांचा ताळमेळ बसत नाही. (जसं मद्रासकथेत झालं) त्यामुळे पब्लिकला नेमकं काय चाललंय ते कळत नाही.
शिवाय जमल्यास या नेत्यांची (उदा. लियाकत खान) चित्रेही डकवता येतील. ती पब्लिकली उपलब्ध असतीलच. त्यामुळे कुठुनही सरळ लिंक कॉपी करुन ईथे देता येईल. शिवाय संदर्भासाठी नकाशे (तेही पब्लिकली उपलब्ध असतील कदाचित) देता आले तर पहा असे सुचवतो. आणि खाली बसतो.
हो. हे नक्की करतो. पुढील भागांत चित्रे/नकाशे/फोटो वगैरे टाकत जातो.
प्रतिक्रीयेबद्दल आभार.