दसरा की शिमगा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
24 Oct 2023 - 10:24 pm

दसरा की शिमगा?

ते विचारांचे सोने
की टोमणे व रोने
काही दखल नेक?
नुसती चिखलफेक

जाळणार खोकेसूराची लंका
अपात्रतेचा निर्णय कधी, शंका

शिवाजी पार्क वि.आझाद मैदान
कुठे पडणार पुढचं मतांच दान?

मी काम करतो, जातो थेट साईटवर
ते असतात लाईव्ह फेसबुक साईटवर

गर्दी जमा ची रोजगार-हमी
नाहीतर आहेच जंगली रमी

मानसशास्त्र झूंडीचं
मिडीया बाईट धूंडीत

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण,
शिंदे सरकार देणार म्हणजे देणार
चिन्ह गेले, पक्ष गेला,आता कोर्टबाजी
अपात्रतेचा निर्णय तो कधी येणार?

जालना लाठीचार्जचा डायर कोण?
षडयंत्राचा तो सुत्रधार कायर कोण?

एकंदरीत होतोय समाज खुजा
गल्लीत पोस्टर माझा कि तुझा.

घरी जातांना काय टेक अवे?
विचार करुन थकले गर्दीचे थवे.

कविता