अराजकीय घडामोडी - सप्टेंबर २०२३

निनाद's picture
निनाद in राजकारण
13 Sep 2023 - 8:31 am

जागतिक बातम्या

  • मोरोक्को मध्ये भूकंप अनेक ठार
  • युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना धमकी दिली आहे की जर शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला तर त्या देशात राहणारे लाखो युक्रेनियन हिंसक होऊ शकतात.
  • लीबिया हा जागतिक पटलावर विसरून गेलेला देश आहे. पण लीबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. तेथे अचानक आलेल्या पुरामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • विमानच बंद पडल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात अडकले आहेत.
  • अ‍ॅपलने नवीन फोन मॉडेल आयफोन १५ रिलीज केले आहे. आता USB-C चा वापर यात केला गेला आहे.
  • भारतातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हनोई येथे पोहोचले आहेत. आता व्हिएतनामसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे. चीनी कारखान्यांना पर्याय म्हणून व्हिएतनाम वेगाने पुढे येत आहे.

प्रतिक्रिया

इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या अनिवार्य पोशाखाचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने एक वादग्रस्त हिजाब विधेयक मंजूर केले आहे. हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा गेल्या वर्षी पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या विधेयकात हिजाब कायद्यांचे उल्लंघन करणार्‍या किंवा हिजाबच्या नियमांवर टीका करणार्‍या व्यक्तींसाठी शिक्षेची आणि दंडांची तरतूद आहे. यात ऑनलाइन असो ऑफलाइन, सोशल मीडियावर किंवा इतरत्र हिजाबची खिल्ली उडवणे देखील आले आहे. एप्रिल १९७९ मध्ये इराण अधिकृतपणे इस्लामिक राज्य बनले. राज्य अस्तित्त्वात आल्यावर इस्लामिक कायद्याच्या गैरवर्तनाच्या आरोपावरून १९८८ मध्ये हजारो राजकीय कैद्यांना फाशी देण्यात आली होती. आजही इराणची शिया इस्लामिक राजवट, महिलांचा आवाज दाबण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे असे दिसून येते आहे.

भारतात महिलांसाठी आरक्षणाचा कायदा मंजूर झाला त्याच वेळी इराण मध्ये असे वादग्रस्त हिजाब कायदे मंजूर केले जात आहेत हा केव्हढा विरोधाभास जगात दिसून येतो आहे.

विनिपेग कॅनडा मध्ये गँगस्टर सुखा उर्फ ​​सुखदूल सिंगची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. एनआयएने जाहीर केलेल्या ४३ वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत सुखाचे नाव होते. एनआयएच्या वॉन्टेड यादीत नाव आल्या नंतर एका दिवसात ही हत्या झाली आहे. सुखा २०१७ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतातून पळून गेला होता. तो मूळचा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील होता. त्याचा संबंध दविंदर बंबीहा टोळीशी होता.

वडगावकर's picture

21 Sep 2023 - 2:22 pm | वडगावकर

शोले मधला एक डायलॉग आठवला.... लोहा लोहे को काटता है... लॉरेन्स बिष्णोई गँग ने त्याच्या हत्येची जबाबदारी घेतलीये---त्या लॉरेन्स गँग ला कोणी मदत पाठवली असेल का?....असो...औषध कोणते का असेना...खोकला बरा होण्याशी मतलब...काय?

निज्जर ह्यांचा खून खलिस्तानी मंडळींनीच केला आहे. भारताचा किंवा भारतीय यंत्रणेचा कुठलाही संबंध ह्या हत्येशी थेट किंवा आडमार्गाने नाही. इतर खलिस्तानी मंडळींच्या ज्या हत्या झाल्या त्यांत कदाचित असू शकतो पण इथे नाही.

निज्जर विविध गुन्ह्यात भारतात गुंतले होते आणि त्यामुळे शिक्षेच्या भयाने कानडा मध्ये खोटा पासपोर्ट लावून पळून गेले. तिथे त्यांना पकडले गेले पण त्यानंतर त्यांनी एक खोटे लग्न करून कानडा मध्ये नागरिक बनण्याचा प्रयत्न केला. तिथे सुद्धा त्यांना पकडण्यात आले. शेवटी त्यांची ओळख पन्नू ह्या खलिस्तानी आणि अत्यंत हिंसक वकीलांशी झाली. त्यांनी आपले राजकीय वजन वापरून त्याला कनेडिअन नागरिकत्व दिले. हि व्यक्ती कधी नागरिक झाली हे खुद्ध कानडिअन सरकारला नीट ठाऊक नाही.

निज्जर ह्याचा चेहरा वापरून सर्वत्र खलिस्तान जनमत कौल २०२२ मध्ये घेण्यात आला. हजारो अमेरिकन आणि कानडिअन सरदारांनी ह्या मूर्खपणात भाग घेतला. ह्याच वेळी भारतीय दूतावासातील एका व्यक्तीने निज्जर ह्यांच्याशी संपर्क साधला. ह्या संपर्काची पार्शवभूमी थोडी जुनी आहे. २०१८ पासून मोदी सरकार ब्रिटिश शीख समाजसेवकाच्या माध्यमातून कॅनडामधील कडव्या खलिस्तानी लोकांशी शांती वार्ता करण्याचा प्रयत्न करत होते. वानवा अशी आहे कि निज्जर ह्या शांतीवार्ते ला उत्सुक होते तर इतर कडवी मंडळी नव्हती. सेहवाटी त्रुदो सरकारने कडव्या लोकांची बाजू घेऊन ब्रिटिश समाजसेवकाला देशांत येण्यापासून मज्जाव केला. पण हि पार्श्वभूमी वापरून भारतीय दूतावासातील काही लोकांनी निज्जर ह्यांच्याशी थोडा संबंध ठेवला.

पन्नू आणि इतर काही खलिस्तानी मूर्खांनी "जनमत कौल" घेतला. ह्या कौलांत सर्व मतदारांची माहिती गोळा करावी जेणेकरून ह्या लोकांशी भविष्यांत संपर्क साधता येईल हि मागणी निज्जर ह्यांची होती. त्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव इत्यादी गोळा केले गेले. असे सांगितले जाते कि पैसे आणि टोरांटो मध्ये एक फ्लॅट ह्या लाचेच्या बदल्यांत खलिस्तानी यंत्रणेतील कुणीतरी हे संपूर्ण लिस्ट भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याला दिले. कदाचित हि व्यक्ती निज्जर स्वतः किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीपैकी एक कुणी तरी होती. हे लिस्ट वापरून भारतीय यंत्रणेने खलिस्तानी समर्थकांतील काही लोक हेरून त्यांना पैसे देऊन आपले खबरी बनवले होते. ह्याची माहित कॅनेडियन गुप्तचर यंत्रणेला होती.

निज्जर ह्यांचा खून शेवटी खलिस्तानी लोकांनीच केला आहे. आणि ते गुप्त पणे भारतीय दूतावासाला माहिती पुरवत होते ह्या शंकेवरून तो केला गेला आहे.

त्रुदो ह्यांनी जो तथाकथित आरोप केला आहे त्यातील "लिंक" ते हेच आहे आणि ह्याची इत्यंभूत माहिती UK/US ला आहे त्यामुळेच ह्या देशांनी ह्या विषयावर बोलणे पसंद नाही केले. UK मध्ये तर Sunak ह्यांना SFJ (सिखस फॉर जस्टीस) वर आधीपासूनच रोष आहे.

त्रुदो ह्या प्रकरणात आपली अब्रू घालवून बसतील ह्यांत शंकाच नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Sep 2023 - 11:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ही तुझी थियरी झाली साहने, आता आमची थियरी.
निज्जर आणि ईतर दोन खलिस्तानी लोकांना भारतिय गुप्तचरांनीच संपवले असावे. केवळ निज्जर खलिस्तानी म्हणून नव्हे तर तो भारत विरोधी कारवाया करत असल्याची ठाम माहिती 'रॉ'ला मिळाली असावी. जस्टिन ट्रुडो, त्याना मूर्ख म्हणा किंवा आणी काही म्हणा- ते त्यांच्या संसदेत भारताचे नाव सरळ घेतात ह्याचा अर्थ कॅनडियन यंत्रणांच्या हाती भारताचा सहभाग असल्याचा बर्यापैकी पुरावा हाती लागला आहे. १००% खात्री केल्याशिवाय ट्रुडो असले विधान करणार नाहीत. पुरावे दिले नाहीत तर आपल्यावर राजिनामा द्ययची वेळ येईल आणि देशाचे नाव खराब होईल हे न कळण्याएवढे ट्रुडो मूर्ख नसावेत .
आता ट्रुडोनी असले विधान का करावे? जूनमध्ये ह्या निज्जरची हत्या झाली आणि लगेच त्यात भारताचा सहभाग असल्याचा संशय तेथील अनेक शिख लोकांनी घेतला.(यु-ट्युबवर जून-जुलैमधील व्हिडियो पहा). निज्जरच्या अंत्ययात्रेची गर्दी/दृश्ये पाहुन ट्रुडोंचे टेन्शन वाढले नसते तर नवल(https://www.youtube.com/watch?v=HGFX9mBk9kw). जगमीत सिंग हा एन डी. पी पक्षाचा तेथील राजकारणी आहे. त्याने व शीख समुदायातील अनेकांनी ट्रुडो ह्यांच्यावर दबाव आणायला सुरूवात केली.ट्रुडो ह्यांनी भारताविरुद्ध बोलावे आणि ह्या प्रकरणावर बोलावे म्हणून दबाव आणला गेला. हत्येचे धागे भारतापर्यंत पोहचत आहेत ह्याची खात्री झाल्यावर जी-२० परिषदेत ट्रडो ह्यांनी ह्यावर भारताकडे तसे बोलुन दाखवले पण भारतिय यंत्रणांनी अजिबात प्रतिसाद दिला आहे. म्हणून मग नाईलाजने ट्रुडो त्यांच्या संसदेत बोलते झाले. शेवटी त्यांनाही खुर्ची वाचवायची आहे.! फक्त खलिस्तानीच कडवे आहेत ,बाकीचे शीख तसे नाहीत हा भ्रम आहे. गेल्या ४० वर्षात अनेक शीखांशी बोलल्यावर एक कळते की ह्यांचा खलिस्तानी लोकांना अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. शीख समुदाय कॅनडात प्रभावशाली आहे. म्हणूनच त्रुडो ह्यांचावर दबाव आला.तसे नसते तर ही बोलणी पडद्याआडच झाली असती.

चौकस२१२'s picture

22 Sep 2023 - 4:59 am | चौकस२१२

फक्त खलिस्तानीच कडवे आहेत ,बाकीचे शीख तसे नाहीत हा भ्रम आहे. गेल्या ४० वर्षात अनेक शीखांशी बोलल्यावर एक कळते की ह्यांचा खलिस्तानी लोकांना अप्रत्यक्ष पाठिंबा असतो.

यावर माझाही विश्वास गेल्या काही वर्षात पक्का झाला आहे
एक अगदी साधे अनुभवलेले उदाहरण म्हणजे "शेतकरी संघर्ष" या नावाखाली ऑस्ट्रेलयातील दिवाळी सार्वजनिक समारंभामध्ये जे विरोधी फलक घेऊन होते ते बहुतांशी शीख होते ( प्रत्यक्ष तिथे खलिस्तानी पिवळे झेंडे नसले तरी )
याशिवाय हॅरिस पार्क सिडनी येथे हिंदूंवर हल्ला / मेलबर्न येथे १९८४ रेफेरंडम नावाखाली भर चौकात इतरांवर हल्ला .. देवळांची नास धूस
हे सगळे होत असताना "खलिस्तानला समर्थन ना देणारे " शीख कुठे दिले नाहीत?

भारताची तलवार / देशभक्त कौंम म्हणून खांदयावर बसवले तर कानात ....... लागले

एकवेळ ओवेसी परवडला पण हे "पिवळे" अस्तनीतले साप झालेत

साहना's picture

22 Sep 2023 - 9:28 am | साहना

शीख आणि गुरुद्वारा ह्यांच्याशी माझा जवळचा संबंध आहे. अनेक खलिस्तानी आणि खलिस्तान विरोधी दोन्ही शीख लोकांशी संबंध आहे. अमृतधारी (म्हणजे फेटा, कृपाण, शाकाहार ठेवणाऱ्या) लोक बहुतेक करून खलिस्तान समर्थक आहेत असे दिसून येते. काही बाही फलक घेऊन फिरणे, गाडयांवर चित्रे लावणे इत्यादी कामे हे करतात. ज्या लोकांनी धर्म, पगडी सोडून दिली आहे असे लोक विशेषतः खलिस्तानी असत नाही उदाहरण म्हणजे आपले कंवल रेखी सारखे लोक.

पण जास्त खोल विचार केल्यानंतर जाणवते कि धर्मांधता आणि एक प्रकारचा मूर्खपणा ह्या दोन्ही गोष्टी इथे कारणीभूत आहेत. उदा माझ्या ओळखीच्या लोकांनी दिल्लीतील शेतकरी मोर्च्यात भाग घेतला होता. मी विचारले का तर ती सांगते कि पंचायतीने निर्णय घेतला कि प्रत्येक परिवारातील किमान एक सदस्य दिल्लीत गेला पाहिजे. नाहीतर एकूण १०,००० रुपये दंड होईल. मग मी विचारले कि मोर्चा कश्यासाठी आहे ? तिला काहीही विशेष माहिती नव्हती. पंचायतीने निर्णय का घेतला ? तर स्थानिक गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने निर्णय घेतला. त्यांनी का घेतला तर मोठी जी कमिटी आहे त्यांनी तसा निर्णय घेतला.

शेवटी संपूर्ण धार्मिक शीख समाज हा ह्या गुरुद्वारा नावाच्या संस्थेच्या दावणीला बांधलेला आहे आणि चर्च ला सुद्धा लाजवेल अश्या केंद्रीकरणाने चालतो. ह्यांत कुणी रिफॉर्म वगैरे आणण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी हिंसा करून त्याला अद्दल शिकवली जाते. चतुर शीख लोकांना हे सर्व समजते नि हि मंडळी गुपचूप गुरुद्वारा संस्थेपासून चार हात लांब राहतात आणि फक्त कधी कधी सेवा करण्यात धन्यता मानतात. मागील काही वर्षांत धर्मांधता आणखीन वाढली आहे. दिवाळीचे नाव बदलून "बंदी छोड दिवस", हरी म्हणजे "हिरवा रंग". महिलांनी सुद्धा पगडी घालणे, होळीचे नाव बदलणे, असे विविध प्रकार चालवले जात आहेत. संपूर्ण धार्मिक शीख समाज ह्यांत गुंतला आहे. त्यामुळे मोदी ह्यांनी खलिस्तान विषयावर निव्वळ सरकारी हिंसा न करता सामोपचाराने त्यांच्याशी आणि प्रसंगी माघार घेऊन मामला शांत करण्याचा प्रयत्न केला ती योग्य गोष्ट आहे.

हिंदू धर्मांत संत परंपरा, किंवा कुठलाही माणूस निव्वळ आपल्या उच्च वर्तणुकीने संतपदाला पोचून प्रसंगी प्रचलित चालीरीतींना बदलू शकतो तश्या प्रकारची पद्धती जो पर्यंत शीख धर्मात येत नाही तो पर्यंत हे असेच चालणार.

टीप : मी माझ्या खलिस्तानी मित्रांना नेहमीच सांगते कि खलिस्तान ह्या नवीन राष्ट्राला माझा अगदी १००% पाठिंबा आहे. फक्त अट हीच कि महाराजा रणजित सिंग ह्यांच्या सिख राज्याची जी लाहोर हि राजधानी होती तीच ह्या खलिस्तान ची राजधानी असली पाहिजे. आणि ती मागणी सुद्धा करण्याची हिम्मत नाही त्या माणसाने नावातील "सिंग" काढू त्या जागी "बकरी" लावावे आणि खलिस्तान काय तर साधा गाव सुद्धा मागण्याची औकात नाही हे मान्य करावे.

शेवटी संपूर्ण धार्मिक शीख समाज हा ह्या गुरुद्वारा नावाच्या संस्थेच्या दावणीला बांधलेला आहे आणि चर्च ला सुद्धा लाजवेल अश्या केंद्रीकरणाने चालतो. ह्यांत कुणी रिफॉर्म वगैरे आणण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी हिंसा करून त्याला अद्दल शिकवली जाते.
दिवाळीचे नाव बदलून "बंदी छोड दिवस",
हरमंदिर साहेब मधील "मंदिर" हा शब्द पण मान्य नाही म्हणे आज काल !

हे ऐकले आहे .... आश्च्र्य याचे वाटते कि त्यामानाने कष्टाळू आणि हुशार ( सरदार विनोद सोडून द्या ) समजात एवदही धर्मांधता कशी काय ? ( अशी दःर्मांधात तर मग शिकलेलंय उद्योगी दाऊदी बोहरा समाजात हि आहे म्हणा. )
त्यात धर्मावर अन्याय झाला असे वाटले तर हिसेनें बदला घायचा हे प्रमाण आहेच मग ते इंग्रजांच्या काळात असो किंवा ऑपरेशन ब्लु स्टार नंतर

असो, सामोपचाराने जर सुटले तर बरे आहे
निदान भारतात तरी पाठिंबा नामशेष झाला तर बरे भारताबाहेर चिथावणी चालूच आहे
या सगळ्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन देशहितासाठी सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला तर बरे ...
आणि पाश्चिमात्य देशातील गुलाबी चष्मा लावलेलया डावखुर्यांना हे विष एकदिवस त्यांचाच घात करेल हे जेवहा केलेले तेव्हा उशीर झालेला असेल
कारवा ऑफ रेफुजी एक दिवस घरचा ताबा घेतील

असो खलिस्तान ला पाठिंबा ( kanaddda मध्ये जरा जागा देऊन तिथेच स्थापन करा त्रिदेव साहेबांना नम्र विनंती आणि जायचं त्याला पाठींबा आहे त्यांनी कायमचे तिकडेच जावे, जसे जगभरातील ज्यू इस्राएल ला जातात तसे ! हाय काय नि नाय काय )

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Sep 2023 - 10:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पाश्चिमात्य देशातील गुलाबी चष्मा लावलेलया डावखुर्यांना हे विष एकदिवस त्यांचाच घात करेल

ट्रुडोवर कॅनडामधील अनेक शीख लोकांनी दबाव टाकला असणार १००%. म्हणूनच ते तसे संसदेत बोलत होते. ह्या निज्जरचा ईतिहास ट्रुडोनाही ठाउक असणार. पण त्याचा उल्लेख ते किंवा त्यांचे परराष्ट्रमंत्री चुकुनही करत नाहीत कारण तसा उल्ल्लेख केला तर शीख समाज आणखी पेटेल ह्याची त्यांना भीती आहे.
तात्पर्य, निज्जरबद्दल शीख समाजाची मोठ्या प्रमाणावर सहानुभुती असल्याशिवाय त्रुडो भारताचे नाव घेणार नाहीत.

चौकस२१२'s picture

22 Sep 2023 - 5:04 am | चौकस२१२

माईसाहेब यांचेशी बऱयापैकी सहमत
त्रुदो जरी एवढा येडे नसले तरी ज्याला व्हाईट गिल्ट + मताचे राजकारण यामुळे तो असे करीत असावा
राजीव गांधी अथवा. ते काही निश्चित मूर्ख नवहते पण शाह हबानो प्रकरणात चुकीचा निर्णय घेऊन बसले ना

साहनाजी आपली हि थेअरी रोचक आहे पण त्या ला काही दुवे? कोणती मान्यवर शोधपत्रकारिता?

भारतीय दूतावासाने खलिस्तानी सूत्रांना पैसे चारून लोकमत कौलांच्या मतदारांची यादी मिळवली हे अत्यंत खात्रीशीर पद्धतीने मला माहिती आहे. हि माहिती येत्या काही दिवसांत १००% उघड होईलच. शंकाच नाही. वेट अँड वोच . बाकी सर्व माझी थेअरी.

कर्नाटक मध्ये गणेशमूर्तीची पूजा केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा हात तोडल्याची घटना समोर आली आहे! गणेशमूर्तीची पूजा केल्याबद्दल ही शिक्षा केली गेली. मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला एवढ्या जोरात मारहाण केली की तिच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले.

निनाद's picture

22 Sep 2023 - 4:30 am | निनाद

येथे दुवा आहे.

आपल्या बोलण्याने अल्पवयीन मुलीला भुरळ घातली आणि पळवून नेले. पोलिसांनी सांगितले की ते बहुदा प. बंगाल मध्ये गेले आहेत. या आरोपी गुन्हेगाराने तिला हिंदू धर्माविरुद्ध वळवायला सुरुवात केली. तो तिला तिच्या घरातून हिंदू देवतांची छायाचित्रे काढून टाकण्यास सांगायचा आणि नंतर हिजाब घालून नमाज अदा करण्यासाठी तिच्यावर दबाव आणायचा. जर तिने इस्लामचे पालन केले तरच तो तिच्याशी लग्न करेल असे त्याने सांगितले. तसेच जो कोणी मार्गात येईल त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2023 - 6:42 am | कर्नलतपस्वी

भारताची तलवार / देशभक्त कौंम म्हणून खांदयावर बसवले तर कानात ....... लागले

एकवेळ ओवेसी परवडला पण हे "पिवळे" अस्तनीतले साप झालेत

चोकोभौ, फार मोठे विधान केलेत. खरे काय खोटे काय या साठी खुप पाठीमागे जावे लागेल.

चौकस२१२'s picture

22 Sep 2023 - 9:04 am | चौकस२१२

कर्नलतपस्वी... विधान छोटे कि मोठे मला माहित नाही मी एक सर्वसामान्यानाच्या मनातील बोललो , ओवेसींचा उल्लेख हा उपरोधाने होता हे आपण जाणले असेलच !

शिखांबद्दल आदर हा सर्वसाधारण हिंदू कुटुंबात वाढलेल्यांना लहानपणापासून शिकवलला गेलाय पण गेली काही वर्षे आणि विशेषता भारताबाहेरील काही शिखानचे वर्तन पाहता हा आदर लोप पावत आहे ...
हायला भारताबाहेर भारतीय मुस्लिम अनेक राहतात ते पण कधी असले भारत विरुद्ध मोर्चे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला काढताना दिसत नाहीत ( निदान ऑस्ट्रेल्यात तरी मला जाणवले नाही ) आणि उलट ज्यांना भाऊ मानले तेच उलटून असे वार करता म्हणून जास्त दुःख

त्याला वरती "पंजाबीयात" वैगरे साखर लावली जाते .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Sep 2023 - 10:43 am | माईसाहेब कुरसूंदीकर

शीख लोक बिलंदर,वस्ताद म्हणूनच प्रसिद्ध होते व आहेत. शीख लोक म्हणजे ओतप्रोत देशप्रेम, त्याग्,शौर्य वगैरे ईतर भारतियांना शिकवले जाते. ह्यांचे अनेक लोक कसे सैन्यात असतात व देशासाठी प्राण देतात वगैरे वगैरे. सामान्य शीख माणसाला खलिस्तानविषयी विचारा-"वो सब राजनीती है|""राजकारणामुळे हे सर्व झाले आहे" अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात पण सरळ निषेध कधी करताना दिसणार नाहीत. खोटे पासपोर्ट्/व्हिसा बनवुन अमेरिकेत्/ब्रिटनला कसे जायचे ते ह्यांना विचारा.आणि मग तिकडे जाउन स्थायिक झाले की ह्यांना खलिस्तान आठवते.गोर्या देशांचे/कातडीचे ह्या लोकांना खूप आकर्षण असते.

चीनकडून इंग्रजीला फाट्यावर मारण्यास सुरुवात

https://edition.cnn.com/2023/09/21/china/china-university-english-test-i...

जागतिक बँकेने पाकिस्तानला सावध करतांना सांगीतले आहे की, त्यांचे सध्याचे आर्थिक मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरले असून लवकरात लवकर आर्थिक सुधारणा करणे गरजेचे आहे. पाकिस्तानची एका वर्षात जवळपास ६% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली गेली असून, आता एकूण ३९.४% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. महागाईचा दर ऑगस्ट महिन्यात २७.४% वर गेलेला सांगण्यात येते.
बातमी: https://www.ndtv.com/world-news/world-bank-cautions-pakistan-as-nearly-1...

मायक्रॉन टेक्नॉलॉजीजने टाटा प्रोजेक्ट्स सोबत भागीदारीत गुजरात मधे सेमीकंडक्टर चीप असेंब्लींग आणि टेस्टींगच्या प्लँटचे काम सुरू केल्याचे समजते. हा व्यवहार २.७ बिलियन डॉलरचा असणार आहे. दोन भागांत होणाऱ्या या प्रकल्पातील पहिला भाग २०२४ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षीत आहे.
बातमी: https://indianexpress.com/article/business/micron-begins-construction-of...