श्री गणेश लेखमाला २०२३

1

अराजकीय घडामोडी - सप्टेंबर २०२३

निनाद's picture
निनाद in राजकारण
13 Sep 2023 - 8:31 am

जागतिक बातम्या

  • मोरोक्को मध्ये भूकंप अनेक ठार
  • युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना धमकी दिली आहे की जर शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला तर त्या देशात राहणारे लाखो युक्रेनियन हिंसक होऊ शकतात.
  • लीबिया हा जागतिक पटलावर विसरून गेलेला देश आहे. पण लीबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. तेथे अचानक आलेल्या पुरामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • विमानच बंद पडल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात अडकले आहेत.
  • अ‍ॅपलने नवीन फोन मॉडेल आयफोन १५ रिलीज केले आहे. आता USB-C चा वापर यात केला गेला आहे.
  • भारतातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हनोई येथे पोहोचले आहेत. आता व्हिएतनामसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे. चीनी कारखान्यांना पर्याय म्हणून व्हिएतनाम वेगाने पुढे येत आहे.

प्रतिक्रिया

गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी इस्लामिक देशांमध्ये धार्मिक छळाचा सामना केल्यानंतर भारतात स्थलांतरित झालेल्या १०८ हिंदूंना कायमस्वरूपी भारताचे नागरिकत्व दिले. अहमदाबाद जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संघवी यांनी अहमदाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या १०८ हिंदूंना “भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र” प्रदान केले.
स्थलांतरित झालेले १०८ हिंदू शेजारील अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून आलेले आहेत.

चौकस२१२'s picture

13 Sep 2023 - 10:23 am | चौकस२१२

१०८ हिंदूंना “भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र” प्रदान केले.

भारताने हे योग्य पाऊल उचलले आहे अभिनदंन

याला हिंदुत्वच प्रसार वैगरे म्हणणार्यांनी हे हि बघावे कि सौदी ने काय केले ते जर्मनी मध्ये

https://www.independent.co.uk/news/world/europe/saudi-arabia-offers-germ...

विजुभाऊ's picture

13 Sep 2023 - 10:45 am | विजुभाऊ

इतर कोणत्याही देशाच्या देश सोडून जाणार्‍या मुस्लीम लोकांना कोणत्याच आखाती देशाने थारा दिलेला नाही.
सौदीने जर्मनीमधे मशिदी बांधण्यासाठी पैसे दिले पण सिरीयन नागरीकाना आमच्या देशात या असे बोलावले नाही.

चौकस२१२'s picture

22 Sep 2023 - 5:40 am | चौकस२१२

इतर कोणत्याही देशाच्या देश सोडून जाणार्‍या मुस्लीम लोकांना कोणत्याच आखाती देशाने थारा दिलेला नाही.
हीच तर गोम आहे अर्थात सोयीस्कर रित्या त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात
आशियातील अजून एक उदाहरण
युरोप ला उत्तर आफ्रिकेतून किंवा उत्तर अम्रेकेला दक्षिण अमेरिकेतुन तसे जाणे जवळ आहे त्यामानाने ऑस्ट्रेल्या दूर असल्यामुळे असे "घुसणे" अवघड आहे पण तरी सुद्धा अनेक वर्षे आखाती देशातून "शरणार्थी" म्हणून बोटीने ऑस्ट्रेल्याच्या पश्चिम उत्तेरल असलेलय इंडोनेशिया जवळ;ली ख्रिसमस बेटावर बोटी ने असे घुसखोर येतात .

असे भासवले जाते कि ओह "हे बघा इतकं वैगरे वरून कसे कष्ट सोसून इथपर्यंत आलेत.".. खर असे असते कि पैसे जमवून ते "विमानाने" मलेशिया किंवा इंडोनेशियात येतात ( तेवढे पैसे असतात ) आणि मग तिथून स्मगकरांना पसे देऊन "बोटीचा खडतर प्रवास करून ख्रिसमस बेटावर येतात

पण मुळात हा प्रशन असतो कि मलेशिया किंवा इंडोनेशिया हे एक तर इस्लामी देश आहेत + त्यामानाने शांत आणि समृद्ध आहेत मग तिथेच का राहत नाहीत
सीरिया किंवा इराक पेक्षा निश्चितच जास्त सुरक्षित ....
पण खरे हे असते कि यात दोन हेतू असतात
१) केवळ अर्थाइक उन्नती साठी पाश्चिमात्य देशात जाणे आणि ते राजमार्गाने जाण्याची पात्रता नसल्याने असे घुसणे
२) हळू हळू गैर इस्लामिक देशांत आपली लोकसंख्या वाढवणे

आता १०० पैकी १० खरे शरणार्थी असतील हि .. पण हा वरील आरोप केला जातोच अर्थात असे आरोप करणाऱ्यांना लगेच इस्लामोफोबिक म्हणून "कॅन्सल " केलं जाते हे आहेच
हे राम .....

विजुभाऊ's picture

13 Sep 2023 - 10:41 am | विजुभाऊ

लिबीया ह अदेश मुअम्मर गडाफी असताना बर्‍यापैकी स्थितीत होता. ओपेक मधे काड्या करून का होईना वर्चस्व गाजवायचा.
इराक देखील सद्दाम हुसेन असताना खूपच चांगल्या स्थोतीत होता. मुख्य म्हणजे इराक हा सद्दम हुसेन सत्तेत असताना खूपच मोकळा देश होता. सद्दाम हुसेन ची राजवट अमेरीकेने मोडकळीस आणल्यानंतर मात्र तेथे आय एस आय एस ने डोके वर काढले. आणि वाटोळे झाले.
जिथे जिथे अमेरीकेने ढवळाढवळ केली आहे तिथे तिथे देशाची वाटच लागली आहे.

जिथे जिथे अमेरीकेने ढवळाढवळ केली आहे तिथे तिथे देशाची वाटच लागली आहे.
चार्ली विल्सन'स वॉर हा चित्रपट पहावा

मोरोक्को भूकंपाचीही नोंद घ्या.

निनाद's picture

15 Sep 2023 - 7:17 am | निनाद

चीनच्या मालमत्तेच्या मंदीमुळे अनेक विकासकांना प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले गेले आहे. अनेक विकासक दिवाळ्खोरीत गेले आहेत.
याचा अर्थ अनेक लोक चीन आता दिवाळखोरीत गेला असा काढत आहेत.

पण मला तसे वाटत नाही.
चीन त्यांच्या अर्थव्यवस्थेतील खराब भागाचे ऑपरेशन करत आहे.
काही काळात चीनी व्यवस्था परत जागेवर आणली जाईल. कदाचित आधी इतकी नसेल पण नक्कीचे परत येईल.

चीनी सत्ताधारी सीसीपी फार धूर्त आहे. अशीतशी सत्ता जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे.

पण अर्थ व्यवस्थेवर कशी पकड परत आणेल हे पाहणे रोचक असेल.

निनाद's picture

15 Sep 2023 - 7:34 am | निनाद

जुनी बातमी:
कंबोडियाच्या सत्ताधारी पक्षाने एकतर्फी निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. कंबोडियावर ३८ वर्षे राज्य करणारे हुन सेन यांनी त्यांचा अनभिषिक्त उत्तराधिकारी आणि ज्येष्ठ पुत्र हुन मानेट कडे सत्ता सुपूर्त केली आहे. अशा रितीने वडिलांकडून मुलाकडे सत्ता हस्तांतरित झाली.
निवडणूकीआधी मीडिया आणि विरोधक यांचा आवाज शांत केला गेला होता. मुख्य विरोधी पक्षावर बंदी घालण्यात आली होती.

कंबुज किंवा कंबोज हे कंबोडियाचे प्राचीन संस्कृत नाव आहे. कंबोडिया एकेकाळी शक्तिशाली हिंदू कंबोज साम्राज्यातून उदयास आला. जयवर्मन, सूर्यवर्मन, जयवर्मन सातवा, अकराव्या आणि चौदाव्या शतकादरम्यान संपूर्ण प्रदेशावर एकछत्री हिंदू साम्राज्य उभे केले होते. याचे पुरावे अंगकोर वाट मंदिराच्या रुपाने पहायला मिळतात.

नसीरुद्दीन शाह आजोबा परत चर्चेत आले आहेत. भीड सारख्या चित्रपटांपेक्षा “द काश्मीर फाइल्स” आणि “गदर २” सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा कल पूर्णपणे चिंताजनक आहे. याच प्रकारचे मत अमीरखान ची माजी पत्नी किरण राव ने व्यक्त केला आहे. त्याअर्थी हे बहुदा टूल कीट चा भाग असाभागासे मानायला जागा आहे. हे लोक कोणतेही विधान किंवा चिंता अशीच वाटली म्हणून कधीच व्यक्त करत नाहीत. सगळ्यामागे वेळ साधलेली असते.
मात्र यामागे विधानामागे काय कारस्थान हे लवकरच बाहेर येईल अशी आशा आहे.

अहिरावण's picture

15 Sep 2023 - 10:38 am | अहिरावण

२०२४ दुसरे काय?

चौकस२१२'s picture

22 Sep 2023 - 5:44 am | चौकस२१२

नसीरुद्दीन शाह आजोबा अनि बारामतीचे काका या दोघांनी आता सन्यास घयावा .. रागा जिथे ध्यान धारणेला जातात तिथे जावे

विवेकपटाईत's picture

15 Sep 2023 - 7:09 pm | विवेकपटाईत

स्मशानात वाढदिवस साजरा केला

https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/celebrating-birthdays-i...

स्मशानात लोक अंत्य विधीसाठी येतात.तिथे वाढदिवस साजरे करणे कितपत योग्य. दुसरा तिथे येणारे अधिकांश व्याधीग्रस्त असतात. अंधविश्वास दूर करायला लहान मुलांना ही तिथे नेणे याचा एकच अर्थ निघतो अनिस मानसिक विकृतीने ग्रस्त संस्था आहे.

ब्रिटनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराने दिवाळखोरी घोषित केली आहे. बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल मध्ये २०११ मध्ये सुमारे २१% एका धर्माचे लोक होते. हे वाढून सुमारे ३०% झाले आहेत - यातले लोक प्रामुख्याने पाकिस्तानी वंशाचे आहेत. येथे राहत असलेले बहुतेक पाकिस्तानी लोक काहीही काम करत नाहीत आणि त्यांना अनेक अपत्ये असल्याने सरकारला त्यांना भत्ते द्यावे लागतात. यामुळे येथे व्यवसाय कोलमडला आहे आणि बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल दिवाळखोर झाले आहे.

सर टोबी's picture

18 Sep 2023 - 9:31 am | सर टोबी

आपण कोणत्या आधारावर काढला आहे?

बाकी कोरड्या दिवसांमध्ये देखील किलकिल्या दाराआडून मद्य विक्री होते हे जसे पोलिसांना माहिती असते त्याप्रमाणे अराजकीय धाग्यांवर व्यवस्थित अजेंडे चालविले जातायत हे संपादकांना माहीत असावे असे समजतो. मूळ प्रतिसाद उडविला जावा अशी अपेक्षा आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Sep 2023 - 11:08 am | राजेंद्र मेहेंदळे

पण परदेशात रिफ्युजी स्टेटसवर राहणारे विशिष्ट जमातीचे लोक आपल्या बायकोला सतत गर्भार ठेवुन सरकारी अनुदाने लाटत राहण्याचे प्रकार करीत असतात असे ऐकुन आहे.

पण परदेशात भारतासारखी सरकारी अनुदाने वगैरे प्रकार नसतात असे परदेशात यशस्वी झालेले मुले (ज्यांचे पालक भारताच्या अशा धोरणांमुळे भारतामधे अस्यशस्वी असतात ) सांगत होते ब्वा !

कॉमी's picture

18 Sep 2023 - 3:31 pm | कॉमी

खरे खोटे देव जाणे
मग कशाला उगाच पिंक टाकायची माहीत नसेल तर ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Sep 2023 - 4:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

अराजकीय पिंका टाकायला पण मनाई आहे का?

छे बुवा. मनाई कसली ? आजिबात नाही. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघा तुमच्या समाज,धर्माबद्दल असली पिंक टाकली तर तुम्हाला कसे वाटेल. आणि त्यानंतर परीघ कमी करत करत आपला देश, राज्य, गाव, कुटुंब आणि स्वतः तुम्ही ह्यांच्यावर इतरांनी खखोदेजा डिस्क्लेमर देऊन तुम्ही टाकली आहे तश्याच पिंका टाकल्या तर काय वाटेल विचार करा. आणि मग तरीही चालत असेल तर अजून चार पिंका माराच.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2023 - 5:30 pm | अमरेंद्र बाहुबली

काॅमी लगेच “त्यां“च्या साठी धावून येतात. एकवेळ द्रौपदी ला साडी पोहोचवायला कृष्ण पोहोचनार नाही पण “त्यां”च्या वर काही टिका झाली की काॅमी १२० च्या स्पिड ने पोहोचनार.

एकवेळ द्रौपदी ला साडी पोहोचवायला कृष्ण पोहोचनार नाही

द्रौपदीला कृष्णाने खरोखर साड्या पुरवल्या होत्या का?

अहिरावण's picture

18 Sep 2023 - 6:52 pm | अहिरावण

हो. तुम्हाला काही आक्षेप?

होय. कोणत्याही "ते" किंवा "हे" यांना विनाकारण टार्गेट केले जात असेल तर येणार मी. तुम्हाला काही प्रॉब्लेम ?

कॉमी's picture

18 Sep 2023 - 3:31 pm | कॉमी

पूर्ण सहमत.

शहराचे दिवाळखोरी काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शहराच्या काऊन्सिलचे मिसमॅनेजमेंट आहे. मुस्लिम लोक किंवा त्यांची अपत्ये हे त्याचे कारण नाही. शहराचा मेयर हिंदू चमन लाल आहे. गो वोक गो ब्रोक ह्या न्यायाने इथे कारभार चालला आहे. ह्या शहराच्या पाठोपाठ ग्लासगो, नॉटिंगहॅम इत्यादी शहरांचा नंबर लागेल. एकूणच चांगली गोष्ट आहे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा.

गो वोक गो ब्रोक हे एक मिथ आहे. पक्क्या भांडवलशाही व्यक्तीने अश्या पोरकट मिथ वर विश्वास ठेवावा हे मजेशीर आहे. उलट गो वोक गेट रीच म्हणा.

>>>शहराचे दिवाळखोरी काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शहराच्या काऊन्सिलचे मिसमॅनेजमेंट आहे.
अच्छा. मला असे वाटले की मिसमॅनेजमेंट फक्त भारतातच असते.

काही दिवसांपूर्वी असेच पाढे शिकवले जात होते मिपावर.

कोण शिकवत होते ते आता लक्षात नाही. आणि ते एवढं महत्वाचं पण नाही. असो.

सर टोबी's picture

19 Sep 2023 - 9:11 pm | सर टोबी

म्हणजे स्त्री आणि पुरुष कर्मचारी यांच्यातील वेतनातील असामानता विषयक खटला स्त्रियांच्या बाजूने लागला आणि त्यापोटी द्यावयाची रक्कम बरीच मोठी आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाचा खर्च वाढत चालला आहे. एकूणच कर्मचारी आणि तंत्र पुरवठादार यांनी त्यांना येणं असलेल्या पैशावर पाणी सोडावं म्हणून दिवाळखोरी जाहीर करण्यात आली आहे असे दिसते.

साहना's picture

20 Sep 2023 - 11:06 am | साहना

बरोबर !

अहिरावण's picture

20 Sep 2023 - 7:29 pm | अहिरावण

अच्छा ! म्हणजे तिथेही स्त्रियांना कमी लेखले जातेच तर !

निनाद's picture

20 Sep 2023 - 5:03 am | निनाद

समस्येवर अधिक प्रकाश टाकणे आणि सकारण विवेचनाबद्दल धन्यवाद.
हे कारण नाही() हा युक्तीवाद कशावर आधारीत आहे?

अहिरावण's picture

18 Sep 2023 - 6:54 pm | अहिरावण

जास्त चहा प्याल तर ‘टकलू’ व्हाल! चीनमध्ये संशोधन

https://www.loksatta.com/nagpur/if-you-drink-too-much-tea-you-will-becom...

अहिरावण's picture

18 Sep 2023 - 6:55 pm | अहिरावण

लंडनमधील ‘इंडिया क्लब’ बंद झाला

https://www.loksatta.com/explained/why-londons-india-club-is-closing-dow...

आखाती देशात नोकरीच्या आमिषाने महिलांचा छळ; राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांमुळे चार महिला मायदेशी परतल्या

https://www.loksatta.com/pune/harassment-of-women-with-the-lure-of-jobs-...

कोण म्हणतो की महिलांचा छळ फक्त भारतात होतो,सगळीकडे होतो. फक्त ते मान्य करण्ञाची हिम्मत हवि. भारतात सगळ वाईट आणि आम्ही आलो तिथे सगळ भारी अशी दळभद्री मानसिकता असली की ... देव त्यांचे भले करो

खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये नवी दिल्लीचा सहभाग असल्याच्या जस्टिन ट्रुडो यांच्या निराधार आरोपांमुळे भारत आणि कॅनडा यांच्यात वाढता राजनैतिक तणाव तयार झाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर कोणताही पुरावा न देता निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. भारताने कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके याची हकालपट्टी केली आहे.

रात्रीचे चांदणे's picture

20 Sep 2023 - 7:51 am | रात्रीचे चांदणे

जर भारताने हत्या केली असेल तरीही काहीच चुकीचे नाही केलं. फक्तं होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवली पाहिजे.

अझरबैजानने नागोर्नो-काराबाख प्रदेशात लष्करी कारवाई सुरू केली आहे. आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काराबाख विरुद्ध अझरबैजानी आक्रमकतेचा निषेध केला आहे.

अवांतरः
आर्मेनियन नरसंहार
क्रूर ऑट्टोमन साम्राज्याने, येथील प्राचीन आर्मेनियन संस्कृती नष्ट करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले होते. पहिल्या महायुद्धादरम्यान आर्मेनियन लोकांचा पद्धतशीरपणे नरसंहार करण्यात आला. टर्कीच्या सत्ताधारी नेतृत्वाखाली, सीरियन वाळवंटात आर्मेनियन निर्वासितांना अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. सुमारे दहा लाख आर्मेनियन लोकांच्या सामूहिक हत्या केल्या गेल्या. महिला आणि मुलांचे सक्तीचे इस्लामीकरण केले गेले होते. टर्की ने आजवर झालेल्या नरसंहाराचा इन्कार केला आहे.
पण खाजगीत टर्की लोकांना या कृत्याचा अभिमान असल्याचे दिसून येते. (माझ्याकडे पुरावे नाहीत पण भाषणे शोधा हे बोलले जाते.)

प्राचीन आर्मेनिया हे एके काळी हिंदू राष्ट्र होते. उज्जैन येथून गेलेल्या शासकांनी याची स्थापना केली होती. येथे गणेश पूजन होत असे. सुमारे इ.स पूर्व तिसर्‍या शतका पर्यंत येथे किमान सात मोठी शहरे होती. व्यापार भरभराटीचा होता आणि जन जीवन आनंदी होते. हा भाग सध्याच्या टर्कीने गिळंकृत केलेल्या भागापैकी आहे. नंतर अर्मेनियामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला.

पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो आर्मेनियाला मान्यता देत नाही.

> पण खाजगीत टर्की लोकांना या कृत्याचा अभिमान असल्याचे दिसून येते. (माझ्याकडे पुरावे नाहीत पण भाषणे शोधा हे बोलले जाते.)

हे सत्य आहे.
--

अर्मेनिया प्रदेशांतील सर्वांत जुनी वस्तू म्हणजे "विशाप" आहे हा शब्द वृषभ ह्या संस्कृत शब्दाशी संबंधित आहे. वेदिक आणि पर्शियन लोकांत जे भांडण होते त्याचे प्रतिबिंब तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आर्मेनियन लोकांचा देव म्हणजे मित्र होता. शेवटी पारसी धर्म प्रचलित झाला तेंव्हा त्यांनी सर्व वेदिक गोष्टींना हराम ठरवले. मित्र हा पारसी देव झाला आणि तो वृषभ चा संहारक झाला (वृषभ म्हणजेच शिवाचा नंदी).

https://pparihar.com/2016/06/27/the-temple-of-garni-in-armenia-the-vedic...

वामन देशमुख's picture

20 Sep 2023 - 12:12 pm | वामन देशमुख

अवांतर:

काही भारतीय हिंदू, "हे पहा, कंबोडियामध्ये जगातील सर्वात मोठे शिव मंदिर आहे, अशी शिल्पकला इतर कुठेही सापडणार नाही. एकेकाळी हिंदू संस्कृती जगभर पसरलेली होती. हिंदू संस्कृती किती महान आहे!" (इतर वेळा कंबोडिया, मंदिर, शिल्पकला इ ऐवजी इतर देश, वस्तू, ज्ञान असे काहीतरी) अशी विधाने करत असतात.

जर हिंदू संस्कृती खरंच महान होती तर तिचा विस्तार व्हायला हवा / व्हायला हवा होता / किमान ती एका विशिष्ट काळापूर्वी होती तितकी शिल्लक तरी राहायला हवी होती. ती शतकानुशतके आकुंचन का पावत आहे? हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग वेगाने आकुंचन का पावत आहे? लोक झपाट्याने हिंदू धर्माचा त्याग का करत आहेत? हिंदू धर्माचा त्याग करण्यासाठी त्या लोकांवर कुणी जबरदस्ती करत असेल तर / कुणी प्रलोभने दाखवत असेल तर हिंदूंचे नेते काय करत होते / काय करत आहेत?

---

हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Sep 2023 - 3:24 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत, जातीआधारीत समाज व्यवस्था, समुद्रबंदू, सिंधूबंदी अश्या बेड्या, बूळचट विचारसरणी, खायचे वांदे असूनही स्वतला विश्वगुरू समजणे, समोरचा मुस्लिम असेल तर मान देणे पण इतर जातीचा हिंदू असेल तर त्याला तूच्छ वागवणे, बायकांना सती प्रथेत जिवंत जाळणे, त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून ढोल बडवणे ह्यातले नेमके काय महान आहे कळत नाहीये.

वामन देशमुख's picture

20 Sep 2023 - 4:39 pm | वामन देशमुख

केवळ एखादा शब्द तीन वेळा उच्चारून घरातील स्त्रीला थेट रस्त्यावर काढणे, तिच्याशी पुन्हा लग्न करायचे तर दुसऱ्या पुरुषाशी तिला तिला संभोग करायला लावणे, आपले म्हणणे न मानणाऱ्यांचा थेट शिरच्छेद करणे यातही काही फार महान असे काही नाही.

प्रश्न हा आहे, जे स्वतःच्या धर्म-संस्कृती-परंपरा इ बाबींना महान मानतात, त्यांचे नेते त्या बाबी वाढवण्याची / किमान टिकवण्याची जबाबदारी का घेत नाहीत.

जाऊ द्या,

हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

केवळ एखादा शब्द तीन वेळा उच्चारून घरातील स्त्रीला थेट रस्त्यावर काढणे, तिच्याशी पुन्हा लग्न करायचे तर दुसऱ्या पुरुषाशी तिला तिला संभोग करायला लावणे, आपले म्हणणे न मानणाऱ्यांचा थेट शिरच्छेद करणे यातही काही फार महान असे काही नाही.

बरोबर. ह्यात काहीही महान नाही, उलट घृणास्पद आहे.

पण ही whataboutry झाली की हो सरळ सरळ.

कोणतीही संस्क्रुती जेंव्हा प्रगत होते. शिक्षीत होते.बौद्धीक दृस्ष्ट्या प्रगत होते . त्या वेळेस त्या संस्कृतीतील लोकांना आरामाची सौख्याची सवय लागते. सुरक्षीत जगण्याची सवय लागते. त्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही.
परिणामी संहारक शारीरीक युद्धाची इच्छा / क्षमता कमी होत जाते. त्यांची युद्ध करण्याची सवय मोडते.
ज्याना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा अशिक्षीत , अस्थिर युद्धाची सवय असते. किंवा तेच त्यांच्या आस्तित्वाचा आधार असते. असे लोक आक्रमक असतात. क्षमाशील नसतात.
आणि आक्रमक / युद्धखोर अशिक्षीत लोक प्रगत संस्कृतीला सहज जिंकून घेऊ शकतात.
हे अनेक वेळा झालेले आहे.
त्यामुळे महान संस्कृत्या लोप पावल्या आहेत.

सर टोबी's picture

21 Sep 2023 - 11:45 am | सर टोबी

तुमचा हाच सिद्धांत सध्याच्या परिस्थितीत पडताळून बघितला तर संस्कृतीवर आक्रमण करणारे अशिक्षित कोणी बाहेरचे नाहीत. आपलेच आहेत.

हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग वेगाने आकुंचन का पावत आहे?

अति सहिष्णुता
अति शांतता
अतिशोक्ती

म्हणून

अझरबैजानच्या लष्करी आक्रमणाचा परिणाम म्हणून, नागोर्नो-काराबाखमध्ये किमान २०० लोक मारले गेले आणि ४०० हून अधिक जखमी झाले त्यापैकी १३ मुले आहेत. आर्टसखमध्ये हजारो लोक बेपत्ता आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अझरबैजानी राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी दूरध्वनी संभाषणात, नागोर्नो-काराबाखच्या रहिवाशांना सुरक्षिततेची हमी देण्याचे आवाहन केले. मॅक्रॉन यांनी काल बळ वापरण्याच्या अझरबैजानच्या निर्णयाची निंदा केली.

अहिरावण's picture

20 Sep 2023 - 7:28 pm | अहिरावण

प्रत्येक धाग्यावर हिंदू विरोधी ओका-या का काढल्या जातात?

ताळेबंद मांडल्यानंतर फक्त एकच तर गोष्ट हाती लागते - हिंदू अस्मिता. ती जागृत ठेवायची असेल तर अशा ओकाऱ्या आवश्यक ठरतात.

अहिरावण's picture

21 Sep 2023 - 9:44 am | अहिरावण

म्हणजे हिंदू अस्मिता जागृत रहावी म्हणून तुम्ही ओका-या काढता? गंमतच आहे. किती तो त्याग !!!