आठ्या

अहिरावण's picture
अहिरावण in जे न देखे रवी...
23 Jun 2023 - 1:37 pm

प्रेरणा : ओळखा पाहू

कॉलेजात
झब्बा, जीन्स अन कोल्हापूरी
चप्पल घालून निवांत
हिरवळ पहात
गप्पा मारत
कट्ट्यावर बसायचो ते दिवस
अचानक आठवले अन
चला बरेच दिवसांत
कोल्हापूरी चप्पल आणली नाही
म्हणुन आणावी असे ठरवतो तोच...
बाबा, मला नवे बुट आणायचे आहेत पैसे द्या जरा
म्हणून पोराने हुकुम सोडला

च्यायला खुप दिवस झालेत रे
मस्त वाईनचे घूटके घेत गप्पा मारु अन
हादडू बाहेर कुठेतरी
मित्राचा फोन आला
तेव्हा मन हुरहुरले
चालेल करुया पार्टी म्हणुन
बायकोला सांगायला फोन करणार तोच
तिचा फोन आला
अहो ऐका ना
आज लवकर घरी या
मला अमुक तमुकच्या लग्नाला जायचे आहे
एक पण चांगली साडी नाही
नवी आणु या का? असे विचारुन ऑर्डर सोडली
शांतपणे मित्राला नंतर कधीतरी असा मेसेज केला

असं
हे करावं ठरवावं
तर
ते करावं लागत
घशातला आवंढा
धड गिळता येत नाही की ओघळत नाही
सगळं आयुष्य
सगळ्यांसाठी
माझ्यासाठी केवळ
कपाळावरची आठी

मुक्तक

प्रतिक्रिया

खेडूत's picture

23 Jun 2023 - 2:06 pm | खेडूत

हे हे..!!
यात फ्रीज नाय आला आणि कर्कश्श आवाज...

असो. आता अजून गोटया आणि तोट्या बाकी आहेत!

महिरावण's picture

23 Jun 2023 - 2:23 pm | महिरावण

चान चान

कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2023 - 6:04 pm | कर्नलतपस्वी

चाट्या,लाळघोट्या,ढेरपोट्या

अशा या जीलब्यांचे पडतील सडे
रडतील वाचकांचे धडे...
कुणीतरी आवरा या भाटांना
लावा वाटेला,
देऊन त्यांच्याच वाट्यानां
करा शितकपाट खाली
जरा जागा द्या माझ्या बियरच्या
बाटल्यांना....