पुणे ते सासवड पायी वारी

गिरि's picture
गिरि in जनातलं, मनातलं
20 Jun 2023 - 2:40 pm

दि १४ जून २०२३ मला लाभलेली पहिली एक दिवसीय पुणे ते सासवड अशी पायी वारी. आई ची इच्छा आणि आमच्या टीम इंडो ऍथलेटिक सोसायटी नि केलेलं आवाहन दोनी अगदी जुळून आले. पुढे अनुभव मांडण्याच्या आधी मला काही जणांचे आभार व्यक्त करायचे आहेत, आमचे सुनील चाको सर ज्यांनी हि संकल्पना टीम ला सुचवली, दुसरे आपले GB ( म्हणजे गणेश भुजबळ साहेब )ज्यांना १३ तारखेला मी फोन करून विचारले आणि एका दमात येस व्हाय नॉट आणि मग काय फुल आत्मविश्वास आला मला, कारण ते आहेच असे पावरफुल लीडर, आता ज्यांच्या मुळे मोठे राईड आजवर आम्ही सर्वांनी आनंदाने पूर्ण केल्या असे ग्रेट गजु ( गजानन खैरे भाऊ ) त्यांनी अगदी सरप्राईझ असे आम्हाला अगदी घर पासून ते स्टार्ट पॉईंट पर्यंत पुष्पक वाहन घेऊन आमह पोहचवले, कारण वारी म्हटले कि सर्व रस्ते बंद असतात आणि कॅब पण कमी असतात, आणि हा प्रॉब्लेम एका झटक्यात गजु भाऊंनी सॉल्व्ह केला - तिघांचे खूप खूप आभार !!!

सकाळी ४ ला आम्ही उठलो,एकदम फ्रेश तयार होऊन मिटिंग पॉईंट ला अगदी वेळेच्या आधी पोहचलो. सोबत दत्ता मेडगुळे पण आला होता, त्याला काही वेळ आमच्या सोबत चालायचे होते आणि नंतर गजु सोबत तो परत जाणार होता. भैरोबा नाला येते भारत पंप येथे सर्व पायी वारकरी साठी आम्हा सरावांना साबुदाणा खिचडी , बटाटा चिप्स , फराळी चिवडा असे खाद्य पदार्थ वाटण्याचा लाभ मिळाला ,आम्ही काही १५जण तिथे होतो, आणि तेथील आयोजकांना शुभेच्या धन्यावाद देऊन आम्ही जय हरी विठ्ठल म्हणत पुढे निघालो. महत्वाचे म्हणजे strava सर्वांनी वेळेवर चालू केले. काही जणांनी चुकून सायकल सिलेक्ट केले, जसे कि आज walk सिलेक्ट करायचे होते. असो असे होत असते .

पुढे जसे जसे आम्ही जात होतो , भरपूर ओळखीचे चेहरे दिसत होते, बोलत होते ,हसत होते आणि काही लपून भरपूर खात होते . GB तर एकदम जसे टाळ मृदंग चा आवाज आला कि आमच्या चाको सोबत फुल धमाल डान्स करत होते , अगदी बाल पणी जसे आपण करतो तसे. हि एक वेगळी मज्जा आहे पायी वारी ची जेव्हा तुमचे आपले असतात सोबत वारी साठी . ग्रुप वर सांगितल्या प्रमाणे काही खाद्य पदार्थ आम्ही बॅग मध्ये घेऊन आलो होतो , ते जसे तसे राहिले , त्याचे कारण पुढे आहे. आणलेल्या बॅग मदले फक्त पॉवर बँक कमी आले शेवटी , मोबाईल चार्जिंग साठी . जसे जसे पाऊले पुढे पडत होती तहान भूक लागत होती, मनुष्य जन्म आहे लागणार सगळं . कोणी लिंबू पाणी , कोकम , पाणी बॉटल , साबू खिचडी , वडे , चिप्स , राजगिरा लाडू , केळी ,कालिंग्गड , शेंगदाणा लाडू , आमरस , रोज मिल्क , केसर दूध , ब्रँडेड चहा , इत्यादी असे भरपूर काही पाऊल पाऊलं वर वाटप चालू होते . एकवेळ असे वाटत होते पुढे चालायचे कि थांबून खायचे , असो भापूर खालले आम्ही आणि पायी चालून जिरवले पण . जवळ जवळ दिवे घाट पायथा आले, घाट मला माहिती होता सायकल नि आलो होतो आमच्या वारी सर्व साठी दोन वेळेस , पण पायी घाट पार करायचे पहिली वेळ , मी थोडं हळू चालत होतो , पण आमचे GB एकदम जोमात , जसे खाली मस्तानु तलाव दिसले कि मी त्यांना सांगितले जरा थांबा तलाव पहा , मला मस्तानी दिसली तुम्हास पण दिसेल . हा गमती चा भाग वारीत आम्ही अनुभवा वले . शेवटचा घाटाचा टप्पा येण्या आधी आमचा झेंडे वाडीचा संतोष अण्णा चा फोन आला तो वाट पाहत होता आमची , पण रेंज नेटवरक आणि आवाज येत नसल्याने , थोडी चुकामुक झाली आणि आमची भेट नाही झाली. पुढे वळण आले कि पांडुरंग दिसला , मन एकदम प्रसन्न झाले,शरीरात ऊर्जा निर्माण झाली, थकवा गेला , आणि आम्ही धावत सुटलो भेटी साठी , तिथे आपले अजून काही मेम्बर्स आधीच आले होते, ग्रुप फोटो झाला , भेटी झाल्यात , काही ऑफिस असल्याने तिथून परत गेले , काही तिथे थांबलेत माउली ची पालखी ची वाट बगत तर काही ब्रेक घेऊन विश्राम करणार होते. आम्ही खाडे तिथे काही फराळ घेतला आणि पुढच्या सासवड च्या प्रवासाठी निघालो . अगदी दुपारचे १२ आणि सूर्य देव डोक्यावर तर होताच, पण कुठे हि ऊन किंवा उष्णता जाणवत नव्हती , एकदम थंड वातावरण होते. शेवटचे १० किलोमीटर राहिले होते . रस्त्यात बरेच जण वारी बद्दल बोलत होते , कोणी महंत होते या वर्षी संख्या कमी आहे, पाऊस लांबणीवर गेला म्हणून , काही जण तर आता रस्त्याला झाडी नाही राहिली सांगत होते, काही महंत होते नवीन पीडी वारी ला येत नाही, म्हतारी आता दमली आहेत , तर काही सुट्टी चे कारण देत होते. असो न येण्याचे कारण हजार असतात , पण आपली संस्कृती जपायची असेल तर वारी करा , मराठी बाणा जिवंत ठेववायचे असेल तर वारी करा , प्रपंच करून परमात्मा सध्या करायचे असेल तर वारी करा , अरे मनुष्य जनमाला आलो म्हून तरी वारी करा , मी कोणाला फोर्स करत नाही पण हा माझा अनुभव आहे , खूप सोपे आहे सायकल वारी किंवा एक मुक्काम पायी वारी दार वर्षी , आपल्या फॅमिली मित्र मुलांना घेऊन करा, खूप भारी वाटेल , एकदा अनुभव घ्या. खाद्यच वेळात सासवड येणार होते, त्या आधी भरपूर फ्लेक्स लागली होती जसे बंटी भय्या , बबलू , राजा , दादा , भाऊ ,अण्णा , दाजी ,साहेब आणि गंमत म्हणजे खाली जे कार्यकर्ते फोटो होते एकदम फुल गॉगल गोल्ड कॉलर कडून आणि वर पांडुरंग , काय सांगावे , तो सावळा हसत असणार , म्हणत असेल मला पांडुरंग दादा/भाऊ/अण्णा/भाई असे काही बोलू नका रे बाबा ..... त्यांच्या पण आम्ही शुभेच्या घेतल्या आणि फराळ पण . सासवड जवळ आले कि ST धरली आणि डायरेक्ट बोपदेव घाटातून स्वारगेट . अजून एक सांगायचे राहिले या पायी वारी मध्ये माझा कडून प्रवास करण्याचे जवळ जवळ सर्व माध्यम घेऊन प्रवास केला , जसे - सकाळ सायकल नि GB च्या घरी, तिथून गजु भाऊ ची कार , नंतर पायी चालणे , काही km धावणे , नंतर सासवड ला ST , नंतर स्वारगेट ला PMPL बस , नंतर ऑटो रिक्षा , नंतर सायकल , आणि घरी पोहचलो ५ वाजता ..... घरचे सर्व खुश कारण ७ च्या आता आमचा सावळा घरात . हो पाय दुखत होते, पण वारी मध्ये नाही जाणवले , घरी आले कि वाटले. .... तर ..... वारी चुकायची नाही , ती करत दार वर्षी करत राहायची , ना विसरता . जय हरी विठ्ठल .

आपला गिरी

संस्कृती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

20 Jun 2023 - 3:47 pm | कंजूस

पायी वारी अनुभव छोटासा आवडला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2023 - 7:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

मजा आली वाचताना!! पुढच्या वेळी जरा शुद्ध लेखनाकडे जास्त लक्ष द्या.

अवांतर-सदस्यकाळ उणीपुरी ५ वर्षे आणि लेख एकच?

छान! मस्तच वाटतं पायी वारीत! महाराष्ट्राचे ऊर्जा स्थान‌ पांडुरंग -वारी
मीही यंदा छोटा अनुभव घेतला लवकरच लिहीन.

पायी वारी अनुभव खुप आवडला. अभिनन्दन

मुक्त विहारि's picture

21 Jun 2023 - 8:27 pm | मुक्त विहारि

लिहीत रहा

यावेळेस मी पण एक दिवस जाऊन आलो वारीत. वाल्हे ते लोणंद! चांगला(च) अनुभव होता! :-))

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2023 - 5:34 pm | चौथा कोनाडा

मस्त खुसखुशीत लिहिलंय !

आवडलं अर्थात हेवेसांनल !

आमच्या चाको सोबत फुल धमाल डान्स करत होते , अगदी बाल पणी जसे आपण करतो तसे. हि एक वेगळी मज्जा आहे पायी वारी ची जेव्हा तुमचे आपले असतात सोबत वारी साठी . ग्रुप वर सांगितल्या प्रमाणे काही खाद्य पदार्थ आम्ही बॅग मध्ये घेऊन आलो होतो , ते जसे तसे राहिले ,

जसे जसे पाऊले पुढे पडत होती तहान भूक लागत होती, मनुष्य जन्म आहे लागणार सगळं . कोणी लिंबू पाणी , कोकम , पाणी बॉटल , साबू खिचडी , वडे , चिप्स , राजगिरा लाडू , केळी ,कालिंग्गड , शेंगदाणा लाडू , आमरस , रोज मिल्क , केसर दूध , ब्रँडेड चहा , इत्यादी असे भरपूर काही पाऊल पाऊलं वर वाटप चालू होते . एकवेळ असे वाटत होते पुढे चालायचे कि थांबून खायचे , असो भापूर खालले आम्ही आणि पायी चालून जिरवले पण .

झकास लिहिलंय !

कुमार१'s picture

2 Jul 2023 - 12:08 pm | कुमार१

अनुभव आवडला.