३००० वर्षांचा विरह

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
13 Jun 2023 - 11:08 am

ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे.

जिन्न हा विषय आम्हाला बहुतेक करून अल्लाउद्दीन च्या दिव्यामुळे ठाऊक आहे पण जिन्न हि संकल्पना इस्लाम मधील खूप लोकप्रिय संकल्पना आहे. इस्लामच्या अनुसार जिन्न हे दुसर्या जगांतील जीव आहेत आणि मानवा प्रमाणेच ते सुद्धा अल्लाह चे अनुसरण करणारे किंवा काफिर असू शकतात. जिन्न मानवाला दिसत नाहीत पण मानवीय जीवनात कधी कधी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. इस्लाम मधील बहुतेक संकल्पना ह्या इस्लाम पूर्व गोष्टीचे rehashing आहेत त्याच प्रमाणे जिन्न सुद्धा इस्लाम पूर्व आहे पण इस्लाम जगभर पसरला म्हणून ती सुद्धा पसरली आणि इंग्रजीत त्याला लोक जिनी ह्या नावाने ओळखू लागले. जिन्न शबदाची नक्की व्युत्पत्ती ठाऊक नाही पण जिनी शब्द मात्र लॅटिन genius पासून आला आहे (ह्याचा अर्थ जागेचा रक्षक आत्मा, कोंकणात ज्याला देवचार किंवा राखणो म्हणतात तो).

ह्या चित्रपटाच्या मध्यभागी सुद्धा एक जिन्न आहे. अलिथिया नावाच्या विदुषीला अचानक भास होऊ लागतात. इसंबूल मध्ये भाषण देण्यास ती आलेली असते पण तिला होणाऱ्या भासांनी ती घाबरलेली असते. अलिथिया ची भूमिका सुप्रसिद्ध आणि हरहुन्नरी अभिनेत्री टिल्डा स्वसोन ने अत्यंत सुरेख पणे उठवली आहे. इस्तंबूल मध्ये ती अत्तराची एक बाटली विकत घेते आणि हॉटेल वर येऊन उघडते तर त्यातून एक भला मोठा जिन्न बाहेर येतो. काळेभोर जिन्न ची भूमिका इद्रिस अल्बा ह्या कृष्णवर्णीय अभिनेत्याने समर्थ पणे निभावली आहे.

जिन्न अलिथिया ला तीन वर देतो पण अट अशी असते कि ती जे काही मागेल ते तिच्या हृदयातून आले पाहिजे. पण अलिथिया अतिशय संतुष्ट प्रकारची विदुषी असते, आपल्याकडे सर्व काही आहे. मागण्यासारखे काहीही नाही हेच तिचे मत असते. जिन्न ह्यामुळे खिन्न होतो कारण ह्या बंदीतून सुटका मिळवून पुंन्हा जिन्न लोकांत जाण्यासाठी त्याला त्याची बाटली मिळवणाऱ्या व्यक्तीला ३ वरदान देणे आवश्यक असते.

आता ह्यावरून अलिथिया आणि जिन्न दोघांची शाब्दिक चकमक उडते. आणि ह्याच दरम्यान जिन्न तिला आपला ३००० वर्षांचा इतिहास सांगतो नि आपण बाटलीत कसा पोचलो ह्याची कथा. खरेतर जिन्न राणी शिबा च्या काळांत पूर्णपणे मुक्त असतो. शिबा त्यांची दूरची बहीण पण जिन्न तिच्या प्रेमात पडतो आणि तिची लैगिक भूक भागवण्याचे साधन बनून राहतो. राणी शिबा हे एक ऐतिहासिक पात्र आहे ज्याची विशेष माहिती आम्हा भारतीय लोकांना नाही. हिब्रू बायबल मधील शिबा हे एक पात्र आहे. बायबल मधील कथानकानुसार इथिओपिया/येमेन भागातील हि राणी आपल्या महाप्रचंड लाजवम्या शकत किंग सॉलोमन ह्या इस्रायली राजाला भेटायला आली. सॉलोमन म्हणजे कुराण मधील सुलेमान इब्न दाऊद, म्हणजे डेविड चा मुलगा सॉलोमन. डेविड म्हणजे डेव्हिड आणि गोलियाथ युद्धातील डेव्हिड.

पण जिन्न सांगतो ती प्रत्यक्षांत सॉलोमन हा शिबा ला भेटण्यासाठी आला होता. तिच्यासोबाचे शय्यासोबत करणे हा त्याचा हेतू होता. शिबा हि अर्धी जिन्न असल्याने तिला काबीज करणे सोपे नव्हते. जिन्न मात्र मत्सराने पेटून उठतो. तो शिबा चे कान भरतो. शिबा सुद्धा त्याचे ऐकून सॉलोमन पुढे ३ अशक्य अशी कामे ठेवतो पण सॉलोमन अत्यंत सोपेपणी ती सर्व कामे करतो.

ह्या चित्रपटांत हि कथा विशेष महत्वाची नाही पण ह्याचे चित्रीकरण अत्यंत नेत्रदीपक आहे. काळीभोर शिबा, तिचा वाळवंटातील तो किल्ला, सॉलोमन ची जादुई वीणा त्याचे ते संगीत हे सर्व काही खरोखर अत्यंत सुरेख पणे दाखवले आहे. जगातील मिथकांतील हे मिथक आम्हा भारतीयांना ठाऊकच नसल्याने ह्या सर्वांचे मनोरंजन मूल्य द्विगुणित होते.

https://www.youtube.com/watch?v=dBF7flL06L4

सॉलोमन प्रत्यक्षांत उच्चकोटीचा जादूगार असतो आणि तोच जिन्न ला बाटलींत टाकून समुद्रांत फेकून देतो.

त्यानंतर दोन वेळा जिन्न बाहेर येतो आणि पुंन्हा बाटलींत अडकतो आणि तिसऱ्या वेळी अलिथिया त्याला बाहेर काढते. आता संपूर्ण कथानक सांगितले तर रसभंग होईल. त्यामुळे इथे सांगत नाही.

शेवटी अलिथिया कुठल्या ३ इच्छा मागते ? अलिथिया आणि जिन्न च्या इतिहासाचा काही संबंध आहे का ? जिन्न च्या कथेचे तात्पर्य काय होते ? ते अनेक प्रश्न चित्रपट उभे करतो. शेवटी चाणाक्ष प्रेक्षक "जिन्न खरोखर होता ?" कि तो अलिथिया च्या मेंदूतून निर्माण झालेले एक पात्र होते हा प्रश्न सुद्धा विचारतील (शटर आयलंड, इन्सेप्शन इत्यादी प्रमाणे).

का ठाऊक नाही पण हा चित्रपट आणि त्यातील नेपथ्य माझ्या मनावर कोरले गेले.

चित्रपट हा एक लोकप्रिय पुस्तकावर आधारित आहे. The Djinn in the Nightingale's Eye हे ब्रिटिश महिला लेखिका बायट ह्यांचे पुस्तक किंवा एक लघुकथा आहे.

चित्रपट

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

13 Jun 2023 - 3:06 pm | चित्रगुप्त

.
चित्रपट-परिचय वाचून तो बघण्याची इच्छा जागृत झाली आहे. 'अलिथिया' हे नाव वाचून जीएंची 'इस्किलार' कथा आठवली.या चित्रपटाची हिंदीत ओळख करून देणारा व्हिडियो :

https://www.youtube.com/watch?v=SBouMajNA2Y
लेखात दिलेल्या विडियोत दाखवलेले वाद्य बघून उत्सुकता चाळवली गेली. प्राचीन तीन तारांचे 'ल्यूट' आणि 'हार्प' या दोन्ही वाद्यांचे मिश्रण, पैकी हार्प वाजवणारे अमानवी 'हात' आणि आसनाच्या खालच्या बाजूला पोकळ ओंडक्यात आतून आघात करणारे 'पंजे' मजेशीर आहेत. मात्र पूर्वीच्या हिंदी सिनेमात राजेन्द्रकुमार, धर्मेन्द्र वगैरे ठोकळ्यासार्खे बसून पियानो वाजवायचे तसे वाटले. म्हणजे त्या वादनात ल्यूट-हार्प पेक्षा (बहुधा-) बासरीचे स्वरच जास्त ठळक आहेत. असो. चित्रपट बघून परत लिहीन.
जुन्या काळातील अद्भुत विश्वात घेऊ जाणारे आणखी काही चित्रपट-शिरेली असतील तर त्याबद्दल जरूर लिहावे.
हार्प-गिटार नामक वाद्य :
.

शेर भाई's picture

13 Jun 2023 - 6:56 pm | शेर भाई

छान ओळख, कुठे उपलब्ध आहे?

मनिम्याऊ's picture

13 Jun 2023 - 9:45 pm | मनिम्याऊ

छान परिचय. नक्की बघणार

चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा परिचय आवडला 👍

अवांतरः लेख वाचताना दोन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला!
लहानपणी (उपग्रह वाहिन्या चालू झाल्या तेव्हा) सोनी वर संध्याकाळी लागोपाठ लागणाऱ्या तीन मालिका न चुकता बघायचो, 'डेनिस द मेनेस' (Dennis the Menace), 'द थ्री स्टुजेस' (The Three Stooges) आणि 'आय ड्रीम ऑफ जीनी (I Dream of Jeannie). त्यातली 'आय ड्रीम ऑफ जीनी' हि मालिका माझी विशेष आवडती. त्यात जीनीची भूमिका करणारी 'बार्बरा एडन' हि तर माझी चाइल्डहूड क्रश 😍 त्यामुळे असेल कदाचित पण लेखातला पहिलाच परिच्छेद वाचताना 'आय ड्रीम ऑफ जीनी' हि मालिका आठवली एकदम...

आमच्या कॉलेजमध्ये 'शिबा' आणि 'शिआ' नावाच्या दोन (केरळी) जुळ्या बहिणी होत्या. त्यांच्याशी मैत्री तर होतीच पण आमची घरे एकाच रस्त्यावर आणि जवळजवळ असल्याने कॉलेजच्या बाहेरच जास्त भेटी-गाठी व्हायच्या. शिबा ह्या ऐतिहासिक/पौराणिक पात्रावरून तिचे नाव ठेवण्यात आल्याचे तिच्याकडून समजले होते त्यामुळे ह्या राणीविषयी जुजबी माहिती असली तरी हि जिन्न वाली कथा माहिती नव्हती.
आपल्या मुला-मुलींची नावे त्यांच्या रंग-रूपाशी अगदी विसंगत ठेवणारे आई-बाप जगात कमी नाहीत, पण आज ह्या लेखात "काळीभोर शिबा" असे वर्णन वाचल्यावर त्या राणीच्या नावावरून आपल्या मुलीचे नाव ठेवणाऱ्या तिच्या आई-वडिलांच्या कल्पकतेची आणि वस्तुनिष्ठपणाची खात्री पटली. जुळ्या असल्या तरी दिसायला अगदी हुबेहूब नसलेल्या ह्या शिबा आणि शिआ पण रंगाने काळ्याशार असल्या तरी सुदैवाने तुम्ही दिलेल्या युट्युब वरील व्हिडीओ मधल्या 'शिबा' सारख्या नव्हत्या 😀
शिआ सुद्धा दिसायला आकर्षक असली तरी 'ब्लॅक ब्युटी' कशाला म्हणतात ह्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेली 'शिबा' तिच्यापेक्षा खूपच उजवी होती.

तुषार काळभोर's picture

14 Jun 2023 - 3:21 pm | तुषार काळभोर

पहिल्या अवांतर परिच्छेदातील शब्दा शब्दाशी तंतोतंत सहमत. माझेही सातवी आठवीचे दिवस लागोपाठ त्या तीन मालिका बघण्यात गेले.
अति अवांतर - सोबत स्मॉल वंडर, डिफरंट स्ट्रोक्स, बीवीच्ड.

अरे वाह!
मग वयाच्या ८४ व्या वर्षी 'द टाईमलेस ब्युटी अवॉर्ड' ने सन्मानित झालेल्या आपल्या (९२ वर्षीय 😀) 'चाइल्डहूड क्रश' जीनीला शतायुषी होण्याच्या शुभेच्छा देणे अगत्याचेच ठरते कि हो 'संत' तुकाशेठ!

Barbara Eden

बाकी स्मॉल वंडर आणि बीवीच्ड पण आवडायच्या, डिफरंट स्ट्रोक्स मात्र नाही बघायचो.
साहनाजी, तुमच्या धाग्यावर केलेल्या अवांतर आणि अति अवांतरासाठी क्षमस्व!

> अति अवांतरासाठी क्षमस्व!

अजिबात गरज नाही. हृदयातून आलेले कमेंट्स अपेक्षित आहेतच. मागे एका विषयावर मी लिहिले तेंव्हा एका मिपाकरांनी टारझन पुस्तकाबद्दल अवांतर असला तरी जो प्रतिसाद दिला होता तो वाचून मला रडू कोसळले होते.

टारझन पुस्तकाबद्दल अवांतर असला तरी जो प्रतिसाद दिला होता तो वाचून

'टारझन' हे माझे अगदी लहानपणापासूनचे आवडते पात्र असल्याने हे वाचून कुतुहल निर्माण झाले आहे. कोणता बरे तो लेख आणि प्रतिसाद ?

तो प्रतिसाद बहुतेक करून आपलाच होता. टारझन ची मूळ पुस्तकें टिकेकर ह्यांनी अनुवादित केली होती (सध्या किंडल वर उपलब्ध आहेत) त्यांतील जुनी चित्रे मूळ ब्रिटिश चित्रकाराचीच होती त्या विषयास धरून तो प्रतिसाद होता.

हा प्रतिसाद म्हणता का?

साहना's picture

15 Jun 2023 - 12:40 pm | साहना

होय

'टारझन' बद्दल प्रतिसाद म्हणजे बहुधा माझाच असावा, असा तर्क करून मी तो लेख किंवा प्रतिसाद हुडकण्याचा थोडासा प्रयत्न केला, पण यश आले नाही. तुम्ही सांगितलेला दुवा उघडताच साक्षात तोच प्रतिसाद बघून अवाक झालो. हे कसेकाय केले बुवा ?
या निमित्ताने साहना यांचा लायबेरीबद्दलचा सुंदर लेख, प्रतिसाद हे सगळे नव्याने वाचले. माझी स्मृती आता किती क्षीण झालेली आहे, याची जाणीव झाली, पण वाचताना खूप आनंद झाला. साहना आणि गवि यांचे अनेक आभार.
या निमित्तने टारझनची थोडी चित्रे इथे डकवतो.
.
.
चित्रकारःBurne Hogarth ( 1911 - 1996, USA)
Hogarth had a breakthrough when the United Feature Syndicate hired him to take over the 'Tarzan' strip from Harold Foster. He drew the 'Tarzan' Sunday page for twelve years, from 1937 to 1945 and from 1947 to 1950, bringing it to new artistic heights.

वर उल्लेखित हेरॉल्ड फास्टरची चित्रे:
.

.
चित्रकारःHarold Rudolf Foster (१८९२-१९८२)
Hal Foster was one of the major artists of American newspaper comics, and one of the medium's great innovators. He was the first to adapt Edgar Rice Burroughs' 'Tarzan of the Apes' into comic format (1929, 1931-1937)

वरील चित्रे बघितल्यावर टारझनच्या अलिकडल्या 'कार्टुनिकरणा'मुळे किती नुकसान झालेले आहे, याची कल्पना यावी.
(अति अवांतर) काही वर्षांपूर्वी पॅरिसच्या जुन्या बाजारात होगार्थने चित्रित केलेल्या मूळ १९३७-४५ सालचे टारझनच्या कॉमिक्स चे एक खोके भरून अंक मिळत होते, तेही इंग्लिश मधे. परंतु विक्रेत्याची अट म्हणजे मी ते पूर्ण खोके दीडशे युरोत घ्यावे. त्यावेळी तेवढे पैसे नसल्याने ते घेऊ शकलो नाही याची आता फार हळहळ वाटते. अलिकडे मी त्याजागी जाऊन पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण आता तिथे मुळात पुस्तकांचे स्टॉल्सच लागेनासे झालेले आहेत.
जुन्या कॉमिक्स-प्रेमींसाठी उपयुक्त दुवा:
https://www.lambiek.net

गूगल सर्च मध्ये योग्य शब्द आणि मिसळपाव असे टाकले की येतो रिझल्ट.

बाकी चित्रगुप्त काका, माझ्या लहानपणाशी तुमची आठवण जोडली गेली आहे. मी लहानपणी चंपकचा रेग्युलर वाचक होतो. माझ्या आजोबांनी मला भेट म्हणून ते चालू केले होते वर्गणी भरून. त्यात मिकू, चीकू या पात्रांसोबत तुमचेही एक पात्र आणि तुमचे नाव दिसत असे ते आठवणीत आहे.

सहज गवि आणि मिसळपाव सर्चमध्ये टाकून बघितले तर खूपच उत्कृष्ट लेख दिसले. तुम्ही हल्ली लिहित का नाही हो?

कॉमी's picture

15 Jun 2023 - 5:03 pm | कॉमी

तुम्ही पेपरबॅक्स फ्रॉम हेल पुस्तक बघितले आहे काय ? त्यात जुन्या हॉरर पल्प पुस्तकांची माहिती आणि भरपूर मुखपृष्ठे आहेत. तुम्हाला आवडेल असे वाटते.

चित्रगुप्त's picture

15 Jun 2023 - 6:24 pm | चित्रगुप्त

@ कॉमी: आत्ताच जालावर या पुस्तकाचे कव्हर बघितले. रोचक वाटते आहे. तसे मला भयानक कथा/चित्रांपेक्षा प्राचीन काळात घेऊन जाणार्‍या साहसकथा -चित्रे जास्त आवडतात.
आत्ताच मी अ‍ॅमॅझॉन वरून Prince Valiant, Vol. 3: 1941-1942 Hardcover हे पुस्तक मागवले आहे या प्रकारची ही माझी पहिलीच खरेदी आहे. बघूया कसेकाय वाटते.
पुस्तकाच्या माहितीबद्दल अनेक आभार

तुम्हाला हे मूळ खंड पाहिजे आहेत का ? (सेकंड हॅन्ड). माझ्या ओळखीचा एक जुन्या पुस्तकांचा व्यापारी आहे (अमेरिकन). मी भारत किंवा अमेरिकेत पाठवून देऊ शकते.

होगार्थ आणि फॉस्टरच्या टारझनचे मूळ खंड घ्यायला मला नक्कीच आवडेल. सध्या अमेरिकेतच असल्याने इथेच मागवेन. उपलब्धता आणि किंमत याबद्दल कळवावे.

साहना's picture

16 Jun 2023 - 2:10 am | साहना

इबे वर उपलब्ध आहेत ;

https://www.ebay.com/itm/125413802869

यश राज's picture

14 Jun 2023 - 12:35 pm | यश राज

काल हा लेख वाचल्यानंतर मी प्राईम वर चित्रपट पहिला सुद्धा, चित्रपट आवडला. टिल्डा स्वसोन आणि इद्रिस अल्बा दोघेही हरहुन्नरी कलाकार आहेतच. यातही दोघांची ॲक्टिंग कमाल आहे.
चित्रपटातील VFX ही आणखी एक जमेची बाजू.
चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही.

सालोमान वाजवत असलेले वाद्य एकदम भन्नाट दाखवले आहे आणि त्याबरोबर वाजवताना निर्माण होणारे संगीत. क्षणभर मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले.

चांदणे संदीप's picture

15 Jun 2023 - 4:23 pm | चांदणे संदीप

चित्रपट परिचय आवडला. लिंकवर जाऊन पाहिल्यावर जे काही दिसले त्याने चित्रपट पाहण्याविषयीची उत्सुकता अजूनच वाढलेली आहे. बघूया, कधी योग येतो बघायचा.

सं - दी - प