(प्रपोज डे) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in लेखमाला
27 Feb 2023 - 4:47 pm

प्रेरणा...
प्रपोज डे: लघु कथा - विवेकपटाईत

(प्रपोज डे)

आंग्ल भाषेत फतवा आला
पाश्चात्त्य संस्कृतीला खड्ड्यात घाला
वालेनटाईन दिन,हग दिन म्हणून पाळा
सनातन संस्कृतीचे अधःपतन टाळा

बुचकळ्यात पडलो.......मी तर रोजच......
पण मग टिव्हीवर दाखवलं,
इंग्रज लई हुश्शार,
काऊ हग दिन पाळत्यात
आणी होणारे रोग कसे टाळत्यात

आमचे शेजारी बी लई हुश्शार,
मोक्कार रात्र झाली होती,
उद्या विचारू म्हणत घोरू लागलो
मुंगेरीलाल ची स्वप्ने बघू लागलो.....

शेजारचे शर्माजी स्वप्नात आले
हग दिनाला काय करणार
म्हणून विचारू लागले,
"मुबंईत कुठं भेटेल काऊ?
आपण दोघं मिळून जाऊ....",

मी शर्माजीला प्रपोज केलं,

"शर्माजी, तुमची तर गरीब गाय
आमची मारकी म्हसं हाय
काऊ हग डे ला, भाभीजीला
अलिंगन दिलं तर चालल काय.???????".

मराठी दिन

प्रतिक्रिया

काऊ हग डे ला, भाभीजीला
अलिंगन दिलं तर चालल काय.???????".

अय्यय्यो! असे (स्वप्नात) विचारल्यावर शर्माजींचा चेहरा कसा झाला असेल ह्याची कल्पना करुनच बेक्कार हसलो 😂

श्वेता व्यास's picture

1 Mar 2023 - 4:54 pm | श्वेता व्यास

हा हा हा !

कर्नलतपस्वी's picture

1 Mar 2023 - 7:10 pm | कर्नलतपस्वी

टर्मिनेटर भौ,श्वेता प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

शब्दा शब्दात विडंबन ठासून भरले आहे.

गाय दिसल्यावर तिला स्पर्श करणे,वंदन करणे हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. लहानपणी परीक्षेला जाताना जरूर गाईला स्पर्श करून जा म्हणून मोठे लोक सांगायचे.
गोग्रास वाढणे व गाईला खाऊ घालणे हा रोजचा नित्यनेम होता.

सरकारने हुकुम काढला व त्याचे महत्त्व सांगताना पाश्चिमात्य लोक काऊ हग का करतात हे टिव्हीवर दाखवले.

वालेनटाईन दिनाला काऊंटर करण्यासाठी काऊ हग डे चे अवाहन करताना भारतीय संस्कृतीचा कुठल्याच प्रकारे उल्लेख नसणे हे अजब वाटले.

तुमच्याकडे ते आहे तर आमच्याकडे हे आहे.
तुमचा मदर्स डे तर आमचा मातृदिन..
तुमचा फादर्स डे तर आमचा अख्खा पितृ पक्ष!!
असेल विचित्र प्रकार करून (न बुडणारी) संस्कृती बळेच वाचवायचा प्रयोग करून झालेच तर आहे ती संस्कृती सुद्धा अजून खोलात जाईल...

चांदणे संदीप's picture

2 Mar 2023 - 3:35 pm | चांदणे संदीप

जोरदार विडंबन! आवडले.

सं - दी - प

Nitin Palkar's picture

3 Mar 2023 - 7:26 pm | Nitin Palkar

लई बेक्कार हसलो.

तुषार काळभोर's picture

4 Mar 2023 - 11:40 am | तुषार काळभोर

वाक्या वाक्यात विडंबन ठासून भरलंय!!
शेवटाला एकदम उत्तुंग षटकार!!

कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2023 - 9:19 am | कर्नलतपस्वी

मिपावर दमदार विडंबनकार म्हणून मला केशवसुमार,पैजारबुवा यांचे विडंबन लेखन फार आवडले.

प्रतिसादक सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात हे पण मस्तच.

वाचकाच्या चेहर्‍यावर हसू आले असेल गृहीत धरतो.

विवेकपटाईत's picture

7 Mar 2023 - 10:00 am | विवेकपटाईत

मस्त
वर्षातून एक दिवस ते काऊला हॅग करतात
बाकी दिवस तिला पोटात गिळतात.

कर्नलतपस्वी's picture

10 Mar 2023 - 1:34 pm | कर्नलतपस्वी

नितीन,विवेक पटाईत, तुषार ,संदीप भौ सर्वांचे मनापासून आभार.