(कालवून टाक भात) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

चहाबाज's picture
चहाबाज in लेखमाला
27 Feb 2023 - 4:44 pm

प्रेरणा...
सुप्रसिद्ध मराठी गीत - "मालवून टाक दीप... चेतवून अंग अंग"

(कालवून टाक भात)

कालवून टाक भात चिरडून कर भंग !
राक्षसा, किती भातात कोंबला तू हात थंड !

त्या तिथे उभ्या पिंपात
घातले तू दोन्ही हस्त
हाय तू मागू नकोस एवढ्यात पिण्या भांग !

गार गार या दह्यात
घालुनी बोटे सुखात
चाटुनी करून टाक पात्र सर्व शुभ्ररंग !

भुर्र भुर्र आवाजात
ढोसला सांबार मस्त
सावकाश घे गिळून एक दोन तीन वांगं !

हे तुला कधी कळेल ?
कोण उपाशी मरेल ?
थांब, का चालू असेच माकडा तुझे हे छंद ?

काय हा तुझाच त्रास ?
मरगळे, इथे उपवास !
उठ रे हळू, फाटेल तंग विजारीचा बंध !

मराठी दिन

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

1 Mar 2023 - 1:24 pm | टर्मीनेटर

😀 😀 😀
असले खादाड लोक पाहिले असल्याने विडंबन पटले 😂

चांदणे संदीप's picture

1 Mar 2023 - 10:09 pm | चांदणे संदीप

मजा आली हे विडंबन वाचून!

सं - दी - प