काळजाच्या या तळाशी राहशी तू
सारखी स्वप्नात माझ्या नांदशी तू.
मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!"
काय सांगू? प्राण माझा मागशी तू.
प्रेम ना माझे तुझ्यावर सांगताना
का गं आता? या टिपाना ढाळशी तू?
एवढी आता कशी ही बदलली तू
वेचुनी काटे, फुलांशी भांडशी तू.
आठवू मी का तुला? म्हणतेस आणिक
चांदण्या मोजीत का या जागशी तू.
प्रतिक्रिया
21 Feb 2023 - 7:48 am | कर्नलतपस्वी
कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे,
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा
शब्द तू,संगीत तू,
म्हणणारे तुम्हीं,आज विराणी का लिहीलीत?
असो, तुमची रचना ती आमची प्रेरणा. 🤣
तहे दिलसे माफी मांगता हूॅ और चार लाईन खरडता हूॅ l उम्मीद है माफ करोगेl
कविता निश्चितच आवडली.
21 Feb 2023 - 10:29 pm | चित्रगुप्त
सांजवेळी आलेल्या 'साजणी' ला "जा जा" सांगणारा कवी हे सांगायला विसरला की काय ?
- साजणी 'सातच्या आत' तू घरी जा
- अन जाताना दार तेवढे लावून जा
सभ्य सुसंकृत शालीन नारी
पोचती सातच्या आत घरी
21 Feb 2023 - 4:01 pm | भागो
प्रेमाचे रंग अनेक. कधी हा कधी तो.
राग अनुराग रुसवा.
म्हणून अधिक आवडली.
21 Feb 2023 - 6:25 pm | Deepak Pawar
कर्नलतपस्वी सर, भागो सर मनःपूर्वक धन्यवाद.
21 Feb 2023 - 10:14 pm | चित्रगुप्त
'शी तू' यमकाची कविता आवडली.
10 Mar 2023 - 12:28 pm | चौथा कोनाडा
मस्त !
सुरेख !
मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!"
काय सांगू? प्राण माझा मागशी तू.
या ओळी खासच !
10 Mar 2023 - 5:42 pm | Deepak Pawar
चौथा कोनाडा सर मनःपूर्वक धन्यवाद.